तुम्हाला मागे थोपवून धरणारा मोठा अडथळा एकदा तुम्ही निश्चित केला की, तो अडथळा एक सकारात्मक ध्येय म्हणून लिहून काढा. उदाहरणार्थ, तुम्ही आता म्हणू शकता, ‘माझी कौशल्ये आणि क्षमता अद्ययावत करणे हे माझे ध्येय आहे, ज्यामुळे मी माझ्या क्षेत्रातील सर्वाधिक पैसे मिळवणाऱ्या सर्वोच्च अशा पहिल्या दहा व्यक्तींमध्ये असेल.’ त्यानंतर तुम्ही, तुमचे ज्ञान आणि कौशल्य अद्ययावत करण्यासाठी, तुमच्या वेळेचे नियोजन करण्यासाठी, तुमची कार्यक्षमता आणि परिणामकारकता सुधारण्यासाठी आणि तुमच्या कंपनीसाठी जास्त विक्री करण्याकरिता जी पावले उचलू शकता त्याची एक यादी तयार करा.
तुम्ही प्रत्येक टप्प्यावर कालमर्यादा आणि मोजमापे ठरवता. त्यानंतर तुम्ही एक महत्त्वाचे काम निवडता आणि त्यावर तातडीने कृती करता. त्यानंतर तुम्ही स्वत:च तुमचे पाय आगीवर धरता. तुम्ही स्वत:च स्वत:कडून कामे करून घेता. तुम्ही स्वत:ला शिस्त लावता आणि तुमच्यासाठी ठरवलेली ध्येये मिळवण्यासाठी ज्या प्रकारची व्यक्ती बनली पाहिजे त्याकरिता तुम्ही स्वत:ला उद्युक्तकरता.
तुम्हाला काय मागे थोपवून धरत आहे हे ओळखणे आणि नंतर तो अडथळा नष्ट करण्यासाठी स्पष्ट लेखी ध्येय निश्चित करणे पुन्हा तुमच्या आयुष्यावर नियंत्रण मिळवून देते. तुमच्या संकल्पनाप्रमाणे वागून तुम्ही तुमच्या अंतिम यशाची आणि तुम्ही तुमच्यासाठी निश्चित केलेल्या बहुतेक कुठल्याही ध्येयाच्या प्राप्तीची खात्री मिळवता.
गोल्स – ब्रायन ट्रेसी, अनुवाद – गीतांजली गीते, साकेत प्रकाशन,    पृष्ठे – २५६, मूल्य – २२५ रु.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा