उपयुक्ततावाद आणि कान्टने मांडलेला नितांत आवश्यकतावाद यांच्यातील विरोधाभासाविषयी..
या लेखात आपण कान्टच्या नीतीविषयक चौकटीचा व त्यावर आधारित एका प्रकरणाचा विचार करणार आहोत. हे करत असतानाच उपयुक्ततावाद व कान्टने मांडलेला नितांत आवश्यकतावाद (Categorical Imperative) यांच्यातील विरोधाभास आपण पाहणार आहोत.
इमॅन्युअल कान्ट (१७२४- १८०४)
मूळच्या जर्मन असलेल्या कान्टने नीतीनियमविषयक अनेक महत्त्वाच्या सद्धांतिक मांडण्यांमध्ये मोलाची भर घातली. मनुष्याने स्वत:तील पशुत्व इच्छा आपल्याला मिळालेल्या ताíकक विचाराच्या साहाय्याने नष्ट कराव्यात, असा प्रमुख विचार कान्टने मांडला. हे करत असतानाच संतुलित समाज व्यवस्था निर्माण करण्याकरता उच्च नतिक व नीतिनियमविषयक चौकट (Moral and ethical framework) निश्चित करावी. कान्टचे नतिक विचारांच्या क्षेत्रातील महत्त्वाचे योगदान म्हणजे उपयुक्ततावादाचे त्याने केलेले खंडन होय.
उपयुक्तता वादातील मुख्य त्रुटी म्हणजे त्यातील संख्यात्मक मुद्दय़ांना दिलेले महत्त्व व गुणात्मक आणि नतिक मूल्यांकडे केलेला कानाडोळा ऐरणीवर आणण्याचे महत्त्वाचे काम कान्टने केले. नतिकतेचा कोणताही आधार नसलेली समाजव्यवस्था केवळ संख्यात्मक बळावर प्रगती करू शकत नाही व म्हणूनच नतिक मूल्ये जोपासणे हे समाजहितासाठी अत्यावश्यक असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. याच त्रुटीचा आणखी खोलवर अभ्यास करून त्यातील जास्त बारकाव्यांकडे लक्ष देत जॉन रॉल्स यांनी Distributive Justic नियमित न्याय वाटप याची मांडणी केली.
प्रकरण – २
सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आवश्यक सामग्री विकत घेण्यासाठीचे अधिकार देते. अली नावाच्या वरिष्ठ अभियंत्याने या संधीचा पुरेपूर वापर करत स्वत:च्या घराच्या बांधकामासाठी आवश्यक सामग्री कार्यालयाच्या अधिकारातून व पशातून मागवली. महेश जो अलीच्या विभागात काम करणारा कनिष्ठ अभियंता आहे ज्याला या सर्वाबाबत कुणकुण होती, त्यावर अली आणि कॉन्ट्रक्टर यांच्यातील संभाषणाने शिक्कामोर्तब झाले. महेशने याबाबत प्रत्यक्ष अलीशी किंवा अलींच्या वरिष्ठांशी संपर्क करणे टाळून सरळ मध्यवरती अन्वेषण शाखेकडे तक्रार केली. मात्र स्वत:चे नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर त्याने अशा प्रकारच्या काळ्या कृत्यांची माहिती अन्वेषण विभागास दिली. कालांतराने याचा परिणाम म्हणून अलीला चौकशीस सामोरे जावे लागले. अलीने याचा राग आपल्या कनिष्ठ अधिकाऱ्यावर काढत सर्व कनिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावले. यावेळेस महेशने आपल्याला याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. मात्र घरी गेल्यानंतर अशा प्रकारे खोटे बोलायला लागल्याबद्दलची खंत त्यांने पत्नीजवळ बोलून दाखवली. वरील प्रकरणात कोणते नतिक व नीतीनियमविषयक मुद्दे उपस्थित होतात? विविध नतिक विचारसरणींचा उपयोग करून चर्चा करा.
प्रतिसाद
उपयुक्ततावादी मांडणी ही अशा प्रकारचे नतिक द्विधा प्रश्न समजून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरू शकते. निर्णयाचे गुणात्मक मूल्य गृहीत न धरण्याचे उपयुक्ततावादी मांडणीचे अंग लक्षात घेतल्यास त्यातील मर्यादा आपल्या लक्षात येतात. परंतु, उपयुक्ततावादी चौकट ही सार्वत्रिक कल्याणकारी स्वरूपाचे निर्णय घेण्यात व त्यांची अंमलबजावणी करण्यात अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडते.
वरील प्रकरणामध्ये महेशने अभियंता अली यांच्या निर्णयाचे खंडन करत असताना वापरलेला दृष्टिकोन हा पूर्णत: उपयुक्तता वादाच्या बाजूला झुकणारा निर्णय आहे. सरकारी निधीतून खरेदी केलेल्या वस्तूंचा केवळ वरिष्ठ अभियंता अली यांच्या वैयक्तिक लाभाकरता उपयोग केला जाणे हे जास्त लोकांच्या लाभाचा विचार धुडकावून केलेले कृत्य आहे. त्याच निधीचा उपयोग जास्त लोकांच्या लाभाकरता व म्हणून त्यातून निर्माण होणाऱ्या आनंदाकरता केला जावा हा महेशचा आग्रह उपयुक्ततावादी विचारसरणीला धरून आहे. प्रशासकीय अधिकारी म्हणून आपण अधिकाधिक लोकांच्या सुखासाठी कार्यरत असणे आवश्यक आहे. या बांधीलकीतून स्वत: खोटे बोलून महेशने या निर्णयाची अंमलबजावणी केली आहे.
परंतु कान्टच्या उच्च नतिक मूल्यांच्या मोजपट्टीवर महेशचा निर्णय तपासून पाहिल्यास महेशने स्वत:च्या नतिक मूल्यांचे अध:पतन करण्याचा मार्ग स्वीकारलेला दिसून येतो. याच वेळी महेशने व्यावसायिक जीवनातील नतिक मूल्यांना खासगी जीवनातील नतिक मूल्यांपेक्षा अधिक महत्त्व दिल्याचे जाणवते. म्हणूनच कमी दर्जाचा वाटणारा वैयक्तिक निर्णय एकंदर सामाजिक स्वास्थ्याचा विचार करता उच्च नतिकतेचा आदर्श समोर ठेवणारा असू शकतो.
अशा प्रकारे काही प्रकरणामध्ये एकापेक्षा जास्त नतिक विचारसरणींचा वापर करून दिलेल्या प्रकरणांचे आकलन व विश्लेषण केले जाऊ शकते. कान्टने मांडलेल्या उच्च नतिक विचारांचे मूल्य कोणत्याही प्रशासकीय प्रक्रियाकरता अतिशय महत्त्वाचा आहे. त्यांचा वापर इतर लोकशाही प्रक्रियांशी जुळवून घेताना कसा करता येऊ शकतो हे अशा प्रकरणांसाठी प्रभावीरीत्या मांडता येऊ शकते.
admin@theuniqueacademy.com
कान्टची विचारसरणी व उपयुक्ततावाद
उपयुक्ततावाद आणि कान्टने मांडलेला नितांत आवश्यकतावाद यांच्यातील विरोधाभासाविषयी..
आणखी वाचा
First published on: 21-10-2013 at 08:20 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thinking and utilitarianism of kant