जगातील अनेक विद्यापिठांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आयइएलटीएस (IELTS) म्हणजेच परीक्षेत इंटरनॅशनल इंग्लिश लँग्वेज टेस्टिंग सिस्टिम परीक्षेत उत्तीर्ण होणे आवश्यक असते. त्यामुळे या परीक्षेचे स्वरूप समजुन घेणे आणि त्याचा अभ्यास त्यानुसार करणे आवश्यक आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना प्रमाण इंग्रजी भाषेचे ज्ञान आहे की नाही हे तपासले जाते. या परीक्षेचा अभ्यास करताना अभ्यासक्रम जाणून घेऊन अभ्यासाची योजना आखली नाही, तर परीक्षा पास करणे कठीण जाऊ शकते. यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या जाणून घ्या.
ही परीक्षा दोन विभागांमध्ये घेतली जाते, जनरल ट्रेनिंग आणि अकॅडमिक. पदवीचे शिक्षण घेणाऱ्या किंवा पदवीचे शिक्षण पुर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना जर युनिव्हर्सिटी किंवा महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर त्यासाठी अकॅडमिक टेस्ट उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. जर माध्यमिक शिक्षणासाठी महाविद्यालयामध्ये किंवा शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश हवा असेल किंवा इंग्रजी भाषिक देशात स्थलांतरीत व्हायचे असेल, तर जनरल ट्रेनिंग परीक्षा पास होणे आवश्यक आहे.
आणखी वाचा: CBSC 2023: ‘१० वी’, ‘१२ वी’च्या परीक्षांना ‘या’ दिवसापासून होणार सुरूवात
परीक्षेचे स्वरूप आणि पद्धत
ही परीक्षा चार विभागामध्ये होते. वाचन, लेखन, ऐकणे, बोलणे या चार विभागात ही परीक्षा होते. वाचन आणि लेखन यांची वेळ ६० मिनिटांची असते. ऐकणे ३० मिनिटे आणि बोलणे ११-१४ मिनिटे इतकी वेळ असते.
ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन पद्धतीने ही परीक्षा देता येते. परीक्षेचा अभ्यासक्रम, कालावधी, प्रश्नांचे स्वरूप दोन्ही पद्धतीमध्ये सारखेच असतात. बँड स्कोर पद्धतीनुसार या परीक्षेचे गुण मोजले जातात.
लेखन आणि ऐकणे या विभागासाठी प्रत्येकी ४० प्रश्न आणि एकुण ४० गुण असतात. या विभागांमध्ये सगळ्यात जास्त गुण मिळवण्याची संधी असते. त्यामुळे या विभागावर जास्त लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला तज्ञ देतात.
वाचन आणि बोलणे या विभागासाठी खुप सरावाची आवश्यकता असते. त्यामुळे जितका जास्त सराव केला जाईल, तितके हे विभाग सोपे वाटतील. यासाठी शब्दसंग्रह वाढवण्याचा प्रयत्न करा. जर एखादा नवा शब्द वाचनात आला, तर त्याचे समानार्थी, विरुद्धार्थी शब्द शोधून त्याची यादी बनवा. यामुळे शब्दसंग्रह वाढण्यास मदत मिळेल.