युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टल, इंग्लंड
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
प्रथमेश आडविलकर itsprathamesh@gmail.com
विद्यापीठाची ओळख –
औद्योगिक क्रांतीच्या परिणामांमुळे एकोणिसाव्या शतकात इंग्लंडमध्ये स्थापन झालेल्या प्रमुख औद्योगिक शहरांमध्ये तेथील नागरी समुदायाच्या एकूण वाटचालीसाठी शैक्षणिक व संशोधन संस्थांची नितांत गरज भासू लागली. तत्कालीन विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्णयानुसार नऊ विद्यापीठांची स्थापना या शहरांमध्ये करण्यात आली. या विद्यापीठांना ‘रेड ब्रिक युनिव्हर्सिटीज’ असे संबोधले जाते. या रेड ब्रिक विद्यापीठांपैकी एक असलेले ब्रिस्टल विद्यापीठ (युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टल) हे २०१९ सालच्या क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगनुसार जगातले एक्कावनव्या क्रमांकाचे विद्यापीठ आहे. या विद्यापीठाची रॉयल चार्टर संस्थेला १९ं०९ साली मिळाली. मात्र तरीही, विद्यापीठाच्या स्थापनेची मुळे इसवी सन १५९५ साली, ब्रिस्टल शहरात स्थापन झालेल्या ‘र्मचट वेन्च्युर्स स्कूल’पर्यंत जातात. ब्रिस्टल विद्यापीठ हे शासकीय संशोधन विद्यापीठ आहे. इंग्लंडमधील ब्रिस्टल शहरामध्ये विद्यापीठाचा मुख्य कॅम्पस आहे. ब्रिस्टल विद्यापीठामध्ये सध्या जवळपास सहा हजार तज्ज्ञ प्राध्यापक-संशोधक आपले अध्यापन-संशोधनाचे कार्य करत असून तेवीस हजार पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थी येथे त्यांचे शिक्षण व संशोधन पूर्ण करत आहेत. विद्यापीठामध्ये एकूण सहा प्रमुख शैक्षणिक-संशोधन विभाग आहेत. मुख्य कॅम्पसमध्येच सर्व पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम या सहा शैक्षणिक-संशोधन विभागांद्वारे चालतात. ब्रिस्टल विद्यापीठ युरोपमधील ‘महत्त्वाच्या ३०’ विद्यापीठांपैकी एक असून इंग्लंडमधील पहिल्या दहा विद्यापीठांमध्ये या विद्यापीठाचा समावेश आहे.
अभ्यासक्रम –
ब्रिस्टल विद्यापीठामध्ये एकूण सहा प्रमुख शैक्षणिक विभाग म्हणजे फॅकल्टीज आहेत. या विभागांतर्गत विषयांनुसार इतर अनेक उपविभाग आहेत, त्यांना स्कूल्स असे संबोधले जाते. विद्यापीठातील कला, आरोग्यशास्त्र, विज्ञान, अभियांत्रिकी, समाजशास्त्र आणि कायदे, जैवविज्ञान या सहा प्रमुख विभागांमार्फत इतर शेकडो पदवी व पदव्युत्तर विभागातील स्कूल्स चालवले जातात. ब्रिस्टल विद्यापीठातील बहुतांश पदवी अभ्यासक्रम तीन वर्षांचे आहेत, तर पदव्युत्तर अभ्यासक्रम एक वर्षांपासून ते चार वर्षांपर्यंतच्या वेगवेगळ्या कालावधीचे आहेत. विद्यापीठामध्ये पदव्युत्तर स्तरावर अध्यापनातून पदव्युत्तर अभ्यासक्रम (Taught Programme) आणि संशोधनातून पदव्युत्तर अभ्यासक्रम (Research Programme) असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना या दोन्हींमधून एक पर्याय निवडायचा आहे. विद्यापीठातील वर उल्लेख केलेल्या विभागांकडून अध्यापन केल्या जाणाऱ्या विषयांमध्ये प्रामुख्याने, मानववंशशास्त्र आणि पुरातत्त्वशास्त्र, तत्त्वज्ञान, जीवशास्त्र, संगणक अभियांत्रिकी, एअरोस्पेस इंजिनीअरिंग, स्थापत्य आणि यंत्र अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी, व्यवस्थापन, लोकसंख्या शास्त्र, गणित, मानवता, अर्थशास्त्र, इतिहास, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित, संगीत, नृत्य, इंग्रजी भाषा, मानसशास्त्र, भूगर्भशास्त्र, पर्यावरणशास्त्र यांसारख्या अनेक आंतरविद्याशाखीय विषयांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना कोणत्याही शाखेतील पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळविण्यासाठी त्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक पार्श्वभूमीसह सॅट व टोफेल या दोन परीक्षा तर पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी जीआरई आणि टोफेल या प्रवेश परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
सुविधा-
ब्रिस्टल विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी दोन वसतिगृहांची म्हणजेच ‘हॉल्स ऑफ रेसिडन्सेस’ची सोय केलेली आहे. ब्रिस्टल विद्यापीठाकडून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, पाठय़वृत्ती, शैक्षणिक शुल्कामध्ये कपात यांसारख्या माध्यमातून आर्थिक मदत दिली जाते. विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये आरोग्य केंद्र, पदवी वा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पदवीपूर्व तयारी अभ्यासक्रम, करिअर मार्गदर्शन केंद्र, बँक, कॅफेज यांसारख्या इतर सुविधा उपलब्ध आहेत. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर या सर्व गोष्टींबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. विद्यापीठाच्या आवारात सांस्कृतिक आणि क्रीडा मंडळे आहेत.
वैशिष्टय़
ब्रिस्टल विद्यापीठातील प्राध्यापकवर्गामध्ये ख्यातनाम तज्ज्ञ आणि संशोधकांचा समावेश आहे. विद्यापीठातील विविध विभागांमध्ये अध्यापन करणाऱ्या सध्याच्या संशोधक-प्राध्यापकांपैकी अनेक जण शैक्षणिक क्षेत्रात प्रतिष्ठित असलेल्या ब्रिटिश अॅकॅडमी, रॉयल सोसायटी यांसारख्या जागतिक संस्थांचे सदस्य आहेत. विद्यापीठातील सध्याच्या प्राध्यापकांपैकी एकवीस प्राध्यापक ‘अॅकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेस’चे, तर तेरा प्राध्यापक ब्रिटिश अॅकॅडमीचे सदस्य आहेत. यांशिवाय, रॉयल अॅकॅडमी ऑफ इंजिनीअरिंगचे तेरा फेलोज, रॉयल सोसायटीचे ४४ फेलोज या विद्यापीठामधील प्राध्यापकवर्गामध्ये समाविष्ट आहेत. जागतिक पटलावर आपला ठसा उमटवणाऱ्या महान व्यक्तिमत्त्वांपैकी पॉल डिरॅक, सर विल्यम रॅमसे, सेसिल फ्रँक पॉवेल, विन्स्टन चर्चिल, डोरोथी हॉजकिन, हंस अल्ब्रेक्ट बेथे, मॅक्स डेलब्रेक, गेरहर्ड हर्झबर्ग, सर नेव्हिल फ्रान्सिस मोट, सर पॉल नर्स यांच्यासह तेरा नोबेल पुरस्कार विजेते या विद्यापीठाशी संबंधित आहे.
ब्रिस्टल विद्यापीठ हे सखोल संशोधन करणाऱ्या ब्रिटिश विद्यापीठांच्या (Research-Intensive British Universities) ‘रसल ग्रुप’चे सदस्य आहे. त्याशिवाय विद्यापीठ european wide coimbra group AFd¯F worldwide universities network या इतर प्रमुख आंतरराष्ट्रीय विद्यापीठीय संस्थांचे सदस्य आहे. त्यामुळे ब्रिस्टल विद्यापीठ युरोपमधील भागीदार संस्थांना दरवर्षी पाचशेहून अधिक विद्यार्थी पाठवते.
संकेतस्थळ https://www.bristol.ac.uk/