रँडस्टँड वर्कमॉनिटर सव्र्हे २०१२ – वेव्ह ४ या आपल्या देशात प्रकाशित झालेल्या अहवालात भारतीय कर्मचारीवर्गासाठी आगामी वर्ष आशादायक असेल, असा आशावाद व्यक्त केला गेला आहे. हा अहवाल तिमाही असून त्यात नोकरी शोधणाऱ्या वर्गाचा आत्मविश्वास तपासला गेला आहे तसेच नोकऱ्यांच्या बाजारपेठेतील नवनव्या प्रवाहांचा अभ्यास रोजगार संधीच्या अनुषंगाने केला गेला आहे.
या अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की, भारतातील ७२ टक्के प्रतिसादकांनी सध्याची आíथक परिस्थिती चांगली आहे, असे म्हटले आहे तर सुमारे ८३ टक्के लोकांनी ही आíथक परिस्थिती अधिक सुधारेल, असा आशावाद जागवला आहे. जगातील एकूण आशावादी लोकांच्या तुलनेत हे प्रमाण खचितच जास्त आहे. ९० टक्के कर्मचाऱ्यांनी त्यांच्या संस्थेची आर्थिक स्थिती चांगली होती, असे या अहवालात नमूद केले आहे. हे प्रमाणही जगाच्या तुलनेत म्हणजेच ७२ टक्क्यांच्या तुलनेत जास्त आहे.
सर्वेक्षण केलेल्या ८७ टक्के कर्मचाऱ्यांच्या मते, २०१२ साली कर्मचाऱ्यांवरील कामाचा भार मोठय़ा प्रमाणात वाढला असून ९३ टक्के लोकांनी २०१३ साली काम आणि आयुष्यातील समतोल चांगला साधला जाईल, असा आशावाद व्यक्त केला आहे.
या सर्वेक्षणातील अहवालांबाबत बोलताना रँडस्टँड इंडिया संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ई. बालाजी म्हणाले की, जागतिक स्तरावर आíथक परिस्थिती तितकीशी बरी नसताना भारतीय कर्मचारीवर्ग मात्र देशाची आíथक परिस्थिती आणि आपल्या मालकांच्या आíथक स्थर्याबाबत आशावादी आहेत, ही अत्यंत आनंददायी गोष्ट आहे. लाइन मॅनेजर आणि मनुष्यबळ विकास व्यावसायिकांसाठी कर्मचाऱ्यांचे धर्य उंचावून उत्पादकता वाढवण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे.
बालाजी पुढे म्हणाले की, कर्मचारी आणि कंपन्या या दोघांसाठीही २०१२ हे वर्ष अत्यंत आव्हानात्मक होते. या वर्षांत कर्मचाऱ्यांवरील कामाचा बोजा वाढला, यात कोणत्याही प्रकारचे दुमत नाही. रोजगार देणाऱ्यांनी या गोष्टीची दखल घेऊन कर्मचाऱ्यांचे कामातील मन कायम ठेवण्यासाठी काम तसेच आयुष्याचा समतोल साधण्याच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. तसेच नोकऱ्यांची बाजारपेठ वाढते तेव्हा या गोष्टींकडे लक्ष दिल्यास त्याचा लाभ मिळू शकतो.
देशासंबंधीची महत्त्वपूर्ण माहिती :
– आíथक परिस्थिती : ७२ टक्के भारतीय कर्मचाऱ्यांच्या मते, या वर्षी देशातील आíथक परिस्थिती चांगली होती. या वर्षांच्या तुलनेत पुढील वर्षी आíथक परिस्थिती अधिक सुधारेल, असे मत ८३ टक्के कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले आहे. ही टक्केवारी जगाच्या तुलनेत (४१ टक्के) चांगली आहे आणि २०१२च्या तुलनेत २०१३ साली आíथक परिस्थिती चांगली असेल, असे ४७ टक्के कर्मचाऱ्यांना वाटते.
– संस्थात्मक कामगिरी : सर्वेक्षण करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांपकी ९० टक्के लोकांच्या मते, त्यांच्या संस्थेचे आरोग्य चांगले आहे आणि ९२ टक्के कर्मचाऱ्यांच्या मते, २०१३ साली त्यांच्या संस्थेचे आरोग्य आणखी चांगले होईल. संपूर्ण जगभरात भारतातील कंपन्यांचे आíथक आरोग्य सर्वोत्तम असून त्यापाठोपाठ चीनमधील कंपन्या (८९ टक्के) आणि जपानची टक्केवारी सर्वात कमी म्हणजे केवळ ४० टक्के कर्मचाऱ्यांना संस्थात्मक कामगिरी चांगली होती, असे वाटते. आपल्या संस्थेची कामगिरी २०१३ साली चांगली होईल, असे मत ९२ टक्के भारतीय कर्मचाऱ्यांना वाटत असून ते जगात सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ हाँगकाँगचे (८६ टक्के) असून सर्वात कमी टक्केवारी ग्रीसची म्हणजे ३२ टक्के आहे.
– मोबदला : २०१२ साली कामाचा मोबदला सर्वाधिक देणाऱ्या देशांमध्ये भारताचा क्रमांक पहिला (२०११ सालासाठी) होता. यातील ८३ टक्के कर्मचाऱ्यांना पगारवाढ मिळाली असून जगातील सरासरी टक्केवारी केवळ ५५ टक्के आहे. हाँगकाँगची टक्केवारी भारतापाठोपाठ म्हणजे ८० टक्के असून ग्रीसची टक्केवारी सगळ्यात कमी म्हणजे केवळ आठ टक्के कर्मचाऱ्यांना पगारवाढ मिळाली आहे. आणखी एका अहवालानुसार भारतात सर्वेक्षण करण्यात आलेल्या लोकांपकी ९३ टक्के लोकांच्या मते, आपल्या कामगिरीसाठी एकाच वेळचा बोनस मिळायला हवा, तर ८८ टक्के लोकांच्या मते आपल्याला यंदाच्या वर्षी बोनस मिळायला हवा. उत्पन्नानुसार सर्वेक्षण करण्यात आलेल्या (१०० टक्के) या प्रतिवर्ष ८० हजार रुपये उत्पन्नवर्गातील कर्मचाऱ्यांनी सांगितले की, त्यांना यंदाच्या वर्षी पगारवाढ मिळाली तर प्रतिवर्ष ९० हजार ते दोन लाख (७५ टक्के) आणि दोन लाख ते पाच लाख रुपये (७८ टक्के) वर्गातील लोकांना मिळालेली पगारवाढ तुलनेने कमी आहे. प्रतिवर्ष पाच लाख रुपये ते १० लाख रुपये किंवा १० लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्नवर्गातील लोकांना (८३ टक्के) मिळालेल्या पगारवाढीचे प्रमाण तुलनेने जास्त आहे. एकूणात सर्व उत्पन्न गटांतील १० पकी नऊ कर्मचाऱ्यांना २०१३ साली पगारवाढ मिळेल, अशी अपेक्षा आहे.
– नवीन वर्षांचा संकल्प : सर्वेक्षण करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये १० पकी आठ भारतीय कर्मचारी म्हणाले की, त्यांनी नवीन वर्षांचा संकल्प केला आहे आणि अशाच प्रकारच्या ८३ टक्के कर्मचाऱ्यांच्या मते, ते आपल्या करिअरबाबत नवीन वर्षांचा संकल्प करतात. नवीन वर्षांचा संकल्प ही विशेषत: भारतीय लोकांमधील संस्कृती असून जगातील संकल्प सोडण्याची आणि करिअरबाबत संकल्प सोडण्याची सरासरी अनुक्रमे केवळ ५१ टक्के आणि ४४ टक्के आहे.
सर्वेक्षण करण्यात आलेल्या सर्व देशांमध्ये नोकरी बदलण्याच्या प्रमाणात भारताचा क्रमांक पहिला असून मोबिलिटी इंडेक्स १५१ आहे. २०१० सालापासून करण्यात आलेल्या ११ तिमाही सर्वेक्षणांमधून आलेल्या अहवालांशी सुसंगत हे अहवाल आहेत. लक्झेम्बर्ग, जर्मनी आणि नेदरलँड्समध्ये हा ‘मोबिलिटी इंडेक्स’ सर्वात कमी असून तेथे कर्मचाऱ्यांच्या नोकरीच्या धरसोडीचे प्रमाण नगण्य आहे. हा अहवाल नवीन नसला तरी गेल्या ११ सर्वेक्षणांमध्ये तो सातत्यपूर्ण असून टॅलेंटसाठीचे युद्ध भारतातील संस्थांसाठी एक मोठे आव्हान आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा