श्रीकांत जाधव
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
प्रस्तुत लेखामध्ये आपण स्वातंत्र्योत्तर भारत या विषयावर चर्चा करणार आहोत. या विषयाची तयारी करताना भारताची फाळणी व फाळणीचे परिणाम, संस्थानांचे विलीनीकरण, भाषावार प्रांतरचना, विकासासाठी आखली गेलेली धोरणे व नियोजन, नेहरुंचे परराष्ट्र धोरण व भारताची आंतरराष्ट्रीय भूमिका, कृषी, विज्ञान आणि तंत्रज्ञान यामधील भारताची प्रगती, चीन आणि पाकिस्तान या देशांनी भारतासोबत केलेली युद्धे व याच्याशी निगडीत करार व त्याचे परिणाम, इंदिरा गांधी यांचा कालखंड-बांग्लादेश मुक्ती, आणीबाणी व जयप्रकाश नारायण यांचे आंदोलन, जमीन सुधारणा धोरण व जमीन सुधारणा, नक्षलवाद व माओवाद, नवीन सामाजिक चळवळी -वांशिक चळवळी, पर्यावरण चळवळ व महिला चळवळ इत्यादी, पंजाब व आसाममधील दहशतवाद व पूर्वोत्तर राज्यातील घुसखोरी, राजकीय क्षेत्रातील बदल व प्रादेशिकवादाचे राजकारण तसेच या सर्व घटकांशी संबंधित घटना, व्यक्ती आणि मुद्दे या अनुषंगाने याची तयारी करावी लागते. या घटकातील अनेक महत्त्वाच्या मुद्दय़ांवर प्रश्न विचारण्यात आलेले नाहीत म्हणजे येथून पुढे होणाऱ्या मुख्य परीक्षेत या घटकावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणून या घटकाची सर्वप्रथम मूलभूत माहिती अभ्यासणे गरजेचे आहे.
२०२१ मध्ये खालील प्रश्न विचारण्यात आलेला होता.
भारतीय संस्थानांच्या एकीकरणातील मुख्य प्रशासकीय मुद्दे आणि सामाजिक-सांस्कृतिक समस्यांचे मूल्यांकन करा. या प्रश्नाचे उत्तर लिहिताना भारतीय संस्थाने यांचे स्वरूप तसेच सामाजिक-सांस्कृतिक परीस्थिती नेमकी काय होती, याची थोडक्यात माहिती देऊन भारतीय संस्थानांच्या एकीकरणातील मुख्य प्रशासकीय मुद्दे आणि सामाजिक-सांस्कृतिक समस्यांचे आढाव्यासह मूल्यांकन येथे देणे अपेक्षित आहे.
२०१३-२० गतवर्षीय परीक्षेमधील प्रश्न
विनोबा भावे यांच्या भूदान व ग्रामदान आंदोलनाच्या उद्देशाची चिकित्सा करा आणि त्याच्या यशाची चर्चा करा. आणि ‘जय जवान जय किसान’ नाऱ्याचा (घोषवाक्य) उदय आणि महत्त्व यावर चिकित्सक पद्धतीने लेख लिहा. या दोन्ही प्रश्नांचे विश्लेषणात्मक पद्धतीने आकलन करून यांची तत्कालीन सामजिक आणि आर्थिक विकासामध्ये नेमकी उपयुक्तता काय होती आणि यामुळे काय साध्य झाले, अशा महत्त्वाच्या पैलूंचा विचार करून चिकित्सक पद्धतीने उत्तराची मांडणी करणे अपेक्षित होते.
लेनिन याच्या १९२१च्या नवीन आर्थिक धोरणाने, भारताने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लगोलग आखलेल्या धोरणांना प्रभावित केलेले होते. मूल्यांकन करा. ह्या प्रश्नाचे उत्तर लिहिताना भारताने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर नियोजन पद्धतीने आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी जे धोरण आखलेले होते, त्यावर लेनिनच्या १९२१ च्या नवीन आर्थिक धोरणांचा प्रभाव कसा होता, हे उदाहरणासह चर्चा करून याचे मूल्यांकन उत्तरामध्ये करणे अपेक्षित होते.
‘भाषावार राज्य निर्मितीमुळे भारतीय एकतेच्या उद्देशाला मजबुती मिळालेली आहे का?’हा प्रश्न योग्य पद्धतीने समजून घेण्यासाठी भाषावार प्रांत रचना का करण्यात आलेली होती तसेच याची नेमकी कोणती कारणे होती व याचा नेमका इतिहास काय आहे आणि यासाठी सरकारमार्फत कोणत्या उपाययोजना आखण्यात आलेल्या होत्या. तसेच १९६२ मध्ये स्थापन करण्यात आलेली राष्ट्रीय एकता परिषद व याची उद्दिष्टे या सारख्या पैलूंचा एकत्रित विचार करून उदाहरणांसह उत्तर लिहिणे अपेक्षित आहे आणि भाषावार राज्य निर्मितीमुळे भारतीय एकतेच्या उद्देशाला मजबुती मिळालेली आहे का, याचे संतुलित पद्धतीने विश्लेषण उत्तरामध्ये असणे अपेक्षित आहे.
कोणत्या परिस्थितीमुळे १९६६ चा ताश्कंद करार करण्यात करण्यात आला, त्याचे विश्लेषण करा. करारातील प्रमुख वैशिष्टय़ाची चर्चा करा. आणि कोणत्या अटळ परिस्थितीमुळे भारताला तत्परतेने बांगलादेशाच्या उद्यामध्ये निर्णायक भूमिका बजावावी लागली, याचे चिकित्सक पद्धतीने परीक्षण करा. हे दोन प्रश्न हे भारतासोबत पाकिस्तानने केलेल्या दोन युद्धाच्या पार्श्वभूमीला ग्राह्य धरून विचारण्यात आलेले आहेत आणि ह्या दोन्ही प्रश्नांचे योग्य आकलन होण्यासाठी आपणाला भारताची फाळणी व फाळणीचे परिणाम, संस्थानांचे विलीनीकरण याची योग्य माहिती असणे गरजेचे आहे आणि त्यानंतर घडलेल्या घडामोडी याचीही माहिती असणे गरजेचे आहे, तसेच तात्कालिक नेमकी कोणती करणे होती इत्यादीची सखोल माहिती असणे गरजेचे आहे. त्याशिवाय या प्रश्नांची मुद्देसूद उत्तरे लिहिता येत नाहीत तसेच ताश्कंद कराराची वैशिष्टय़े नेमकी काय होती याची संकीर्ण माहिती असणेही गरजेचे आहे. थोडक्यात, हे प्रश्न विषयाची सखोल माहिती आणि संकीर्ण माहिती या दोन्ही बाबींचा एकत्रित विचार करून सोडवावेत.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अनुसूचित जमाती ( रळ२)विरोधात होणारे भेदभाव दूर करण्यासाठी कोणते दोन मुख्य कायदेशीर पुढाकार राज्याद्वारे घेण्यात आले? हा प्रश्न थेट वस्तुनिष्ठ माहितीवर विचारण्यात आलेला आहे आणि यासाठी घेण्यात आलेले दोन मुख्य कायदेशीर पुढाकार कोणते होते व यांची अनुसूचित जमाती ( रळ२)विरोधात होणारे भेदभाव दूर करण्यासाठी उपयुक्तता कशी होती याचीही उत्तरामध्ये थोडक्यात माहिती देणे आवश्यक आहे.
२०१८, २०१९ आणि २०२० मध्ये या घटकावर थेट प्रश्न विचारण्यात आलेला नाही. प्रश्नाचे योग्य आकलन केल्यास आपणाला असे दिसून येते की, यातील जवळपास सर्व प्रश्न हे भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या पुढील दोन दशकातील महत्त्वाच्या घडामोडींशी संबंधित आहेत. म्हणून भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या दोन दशकातील घडामोडींची योग्य माहिती असणे गरजेचे आहे. या सर्व प्रश्नांच्या चर्चेमुळे या विषयावर विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांचे स्वरूप आणि याची उत्तरे नेमकी कशी लिहावी, याची एक योग्य दिशा मिळते. याचबरोबर या विषयाची तयारी कशी करावी याची एक स्पष्ट आखणी करता येते. या घटकाची तयारी करताना सर्वप्रथम एनसीईआरटीच्या शालेय पुस्तकांचा आधार घ्यावा लागतो. इयत्ता बारावीचे राज्यशास्त्राचे ‘पोलिटिक्स इन इंडिया सिन्स इंडिपेंडस’ हे पुस्तक सर्वप्रथम अभ्यासणे गरजेचे आहे तसेच या घटकाची सखोल आणि सर्वागीण तयारी करण्यासाठी बिपिन चंद्र लिखित ‘इंडिया आफ्टर इंडिपेंडस’ आणि रामचंद्र गुहा यांचे ‘इंडिया आफ्टर गांधी’ हे संदर्भ ग्रंथ उपयुक्त ठरतात.