यूपीएससीची तयारी : श्रीकांत जाधव

nana patekar amitabh bachchan KBC 16
नातवाच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन मिठाई घेऊन आले अन्…, नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा; ‘ती’ भेटवस्तू अजूनही ठेवलीये जपून
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Indian communities Unity in Diversity
भारतात खरोखरच ‘विविधतेत एकता’ आहे का?
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
Amitabh Bachchan talks about intercultural marriages in his family
“भावाचं लग्न सिंधी मुलीशी, मुलगी पंजाबी कुटुंबात अन् मुलगा…”; अमिताभ बच्चन यांचे कुटुंबातील सदस्यांच्या लग्नाबाबत वक्तव्य
positive artificial intelligence
कुतूहल : भारताला गरज सकारात्मक कृत्रिम बुद्धिमत्तेची!
PM Modi
PM मोदींचा ‘मेक इन इंडिया’ पाठोपाठ आता ‘वेड इन इंडिया’वर भर; देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दलही केलं मोठं वक्तव्य
Loksatta sanvidhanbhan Historical background of Jammu and Kashmir
संविधानभान: जम्मूकाश्मीरची ऐतिहासिक पार्श्वभूमी

प्रस्तुत लेखामध्ये आपण यूपीएससी पूर्व परीक्षेतील पहिल्या पेपरमधील ‘भारतीय इतिहास आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळ’ या घटकाची सविस्तर चर्चा करणार आहोत. या घटकामध्ये प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत आणि आधुनिक भारत तसेच भारतीय कला आणि संस्कृती या घटकांचाही समावेश होतो.

२०११पासून ते २०१९ पर्यंत या घटकावर वर्षनिहाय विचारण्यात आलेल्या प्रश्नांची संख्या पुढीलप्रमाणे – २०११(१३ प्रश्न), २०१२ (१८ प्रश्न), २०१३ (१५ प्रश्न), २०१४ (२० प्रश्न), २०१५ (१८ प्रश्न), २०१६ (१६ प्रश्न), २०१७ (१४ प्रश्न), २०१८ (२१ प्रश्न) आणि २०१९ (१५ प्रश्न) अशी आहे. या प्रश्नांच्या संख्येवरून परीक्षा उतीर्ण होण्यासाठी या घटकाचा अभ्यास किती महत्त्वाचा आहे हे लक्षात येते. या घटकाचा परीक्षाभिमुख आवाका लक्षात घेऊन त्याचे योग्य नियोजन करणे महत्त्वाचे आहे.

भारतीय इतिहास आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळ या घटकाचे परीक्षाभिमुख आकलन करताना साधारणत: ‘प्राचीन भारत’ या घटकामध्ये प्राचीन भारताच्या इतिहासाचे महत्त्व आणि अभ्यासाची साधने, प्रागतिहासिक भारत, ताम्रपाषण, कृषी संस्कृती, सिंधू संस्कृती, वैदिक संस्कृती, बौद्धयुग अथवा महाजनपदाचा कालखंड, मौर्य कालखंड, मौर्यतर कालखंड, गुप्त कालखंड आणि गुप्तोत्तर कालखंड इत्यादी उपघटकांचा अभ्यास करावा लागतो. ‘मध्ययुगीन भारत’ या घटकामध्ये प्रारंभिक मध्ययुगीन कालखंड (इ.स. ७५० ते १२००), दिल्ली सल्तनत, उत्तर भारतातील प्रादेशिक देशी सत्ता, विजयनगर साम्राज्य, बहामनी राजघराणे, मुघल साम्राज्य, मराठा कालखंड आणि मध्ययुगीन भारतातील धार्मिक चळवळी इत्यादी घटकांचा समावेश होतो.

‘आधुनिक भारत’ यामध्ये युरोपियनांचे आगमन आणि ब्रिटिशसत्तेची भारतात स्थापना, ब्रिटिशसत्तेचा भारतावरील परिणाम, ब्रिटिशसत्तेच्या विरोधातील उठाव, एकोणिसाव्या शतकातील सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळी, शिक्षण आणि वृतपत्रे यांची वाढ आणि विकास, भारतीय राष्ट्रवादाचा उदय आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ, क्रांतिकारी चळवळी, कामगार चळवळ, भारतातील सांप्रदायिकतेची वाढ, गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय, भारतातील घटनात्मक विकास, महत्त्वपूर्ण व्यक्ती इत्यादी घटकांचा समावेश होतो. तर ‘भारतीय कला आणि संस्कृती’ यामध्ये भारतीय स्थापत्यकला आणि शिल्पकला, भारतीय चित्रकला, भारतीय संगीत, नृत्य आणि नाटय़, भारतीय साहित्य, भारतीय हस्तकला इत्यादींचा समावेश होतो.

या घटकातील नेमका कोणता भाग परीक्षेच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचा आहे, याचे स्वरूप आपल्याला मागील परीक्षांमध्ये या घटकांवर विचारण्यात आलेल्या प्रश्नांवरून लक्षात येते. या घटकाची व्याप्ती खूप मोठी आहे तसेच याचे स्वरूप पारंपरिक पद्धतीचे आहे. त्यामुळे हा घटक प्रथम सखोल पद्धतीने अभ्यासणे गरजेचे आहे आणि त्यानंतर या घटकावर स्वत:ची  उजळणी स्वरूपातील टिप्पणे तयार करावीत, जेणेकरून परीक्षेच्या दृष्टीने कमीत कमी वेळात हा घटक अभ्यासता येऊ शकतो.

सर्वसाधारणपणे या घटकामध्ये प्राचीन भारत, आधुनिक भारत, भारतीय कला आणि संस्कृती यावर सर्वाधिक प्रश्न विचारले जातात. त्यातही भारतीय कला आणि संस्कृती यावर अधिक प्रश्न विचारण्यात येत आहेत, असे दिसते. त्यामुळे हा भाग व्यवस्थित अभ्यासणे गरजेचे आहे. या घटकावर ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वाची स्थळे, सामाजिक आणि आर्थिक  घडामोडी आणि संकल्पना, राजकीय घडामोडी, व्यक्ती संबंधित माहिती, साहित्य, विविध कला इत्यादी घटकांशी संबंधित प्रश्न वस्तुनिष्ठ पद्धतीने विचारले जातात आणि अशा प्रकारच्या प्रश्नांची संख्या अधिक असते.

तसेच विश्लेषणात्मक प्रश्न विचारले जातात पण त्यांची संख्या तुलनेने कमी असते. त्यामुळे हा घटक अभ्यासताना वस्तुनिष्ठ माहितीचा अचूक अभ्यास करणे गरजेचे आहे. चुकीच्या पर्यायासाठी पेनल्टी गुण असल्यामुळे अचूक पद्धतीने अभ्यास करणे अपरिहार्य बनलेले आहे.

२०१५ पासून यूपीएससीने पूर्व परीक्षेमध्ये परीक्षा उतीर्ण होण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बदल केलेला आहे. पूर्व परीक्षेतील सी-सॅट हा पेपर दुसरा पात्रता पेपर केलेला आहे (यात एकूण ८० प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नासाठी २.५ गुण असतात).

यामध्ये उत्तीर्ण होण्यासाठी कमीत कमी एकूण गुणांपकी ३३% गुण प्राप्त करणे अनिवार्य आहे. या पेपरमध्येही चुकीचा पर्याय निवडल्यास एका प्रश्नासाठी एकूण मिळविलेल्या मार्क्‍समधून ०.३३ इतके पेनल्टी गुण वजा केले जातात.  तसेच या पेपरचे गुण गुणवत्ता यादी ठरविण्यासाठी ग्राह्य धरले जात नाहीत. पहिल्या पेपरमध्ये प्राप्त केलेल्या गुणांवरून अंतिम मेरीट ठरविले जाते.

संदर्भ साहित्य

या घटकासाठी सर्वप्रथम एन.सी.ई.आर.टी. बोर्डाची शालेय पुस्तके वाचावीत. याधून या घटकांविषयी मूलभूत माहिती आपणाला मिळते. बाजारात या घटकासाठी अनेक गाइड्स स्वरूपातील पुस्तके उपलब्ध आहेत. यातील नेमकी कोणती पुस्तके या घटकाची परीक्षाभिमुख तयारी करण्यासाठी महत्त्वाची आहेत, याची माहिती असणे गरजेचे आहे.

Story img Loader