यूपीएससीची तयारी : श्रीकांत जाधव

प्रस्तुत लेखामध्ये आपण स्वातंत्र्योत्तर भारत या विषयावर चर्चा करणार आहोत. या विषयाची तयारी करताना भारताची फाळणी, फाळणीचे परिणाम, संस्थानांचे विलीनीकरण, भाषावार प्रांत रचना, विकासासाठी आखली गेलेली धोरणे व नियोजन, नेहरूंचे परराष्ट्र धोरण आणि भारताची आंतरराष्ट्रीय भूमिका, कृषी, विज्ञान आणि तंत्रज्ञान यामधील भारताची प्रगती, चीन आणि पाकिस्तान या देशांनी भारतासोबत केलेली युद्धे व याच्याशी निगडित करार व त्याचे परिणाम, इंदिरा गांधी यांचा कालखंड-बांग्लादेशमुक्ती, आणीबाणी व जयप्रकाश नारायण यांचे आंदोलन, जमीन सुधारणा धोरण व जमीन सुधारणा, नक्षलवाद व माओवाद, नवीन सामाजिक चळवळी-वांशिक चळवळी, पर्यावरण चळवळ व महिला चळवळ इत्यादी, पंजाब व आसाममधील दहशतवाद व पूर्वोत्तर राज्यातील घुसखोरी, राजकीय क्षेत्रातील बदल व प्रादेशिक वादाचे राजकारण तसेच या सर्व घटकाशी संबंधित घटना, व्यक्ती आणि मुद्दे या अनुषंगाने याची तयारी करावी लागते. या घटकातील अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर प्रश्न विचारण्यात आलेले नाहीत, म्हणजे येथून पुढे होणाऱ्या मुख्य परीक्षेत या घटकावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणून या घटकाची सर्वप्रथम मूलभूत माहिती अभ्यासणे गरजेचे आहे.

Indian communities Unity in Diversity
भारतात खरोखरच ‘विविधतेत एकता’ आहे का?
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
mamata banerjee latest marathi news
विश्लेषण : ‘इंडिया’ आघाडीचे नेतृत्व ममतांकडे? राज्यांतील पराभवानंतर काँग्रेसच्या स्थानाला धक्का…
Sharad Pawar News
Uday Samant : “शरद पवारांचं इंडिया आघाडीबाबतचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे काँग्रेसचा अपमान, राहुल गांधीचं नेतृत्व..” उदय सामंत काय म्हणाले?
allahabad highcourt
“हे हिंदुस्थान आहे, बहुसंख्याकांच्या इच्छेनुसारच देश चालणार”, न्यायाधीशांच्या वक्तव्याची चर्चा!
Maharashtra Breaking News Updates
Maharashtra News : “राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली ‘इंडिया’ निवडणुका जिंकत नसल्याचा शरद पवारांकडून ठपका”, उदय सामंतांचं वक्तव्य
issue of Kashmir
संविधानभान : संविधानसभेत काश्मीरचा मुद्दा
Amol Mitkari On Jayant Patil :
Amol Mitkari : “जयंत पाटील योग्य वेळी योग्य निर्णय घेणार”, अजित पवार गटाच्या नेत्याचा मोठा दावा, चर्चांना उधाण

गतवर्षीय परीक्षेमधील प्रश्नांचा विश्लेषणात्मक आढावा

विनोबा भावे यांच्या भूदान व ग्रामदान आंदोलनाच्या उद्देशाची चिकित्सा करा आणि त्याच्या यशाची चर्चा करा. आणि ‘जय जवान जय किसान’ नाऱ्याचा (घोषवाक्य) उदय आणि महत्त्व यावर चिकित्सक पद्धतीने लेख लिहा. या दोन्ही प्रश्नांचे विश्लेषणात्मक पद्धतीने आकलन करून यांची तत्कालीन सामाजिक आणि आर्थिक विकासामध्ये नेमकी उपयुक्तता काय होती आणि यामुळे काय साध्य झाले अशा महत्त्वाच्या पैलूंचा विचार करून चिकित्सक पद्धतीने उत्तराची मांडणी करणे अपेक्षित होते.

लेनिनच्या १९२१ च्या नवीन आर्थिक धोरणाने, भारताने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लागलीच आखलेल्या धोरणांना प्रभावित केले होते. मूल्यांकन करा. या प्रश्नाचे उत्तर लिहिताना भारताने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जो नियोजन पद्धतीने आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी जे धोरण आखलेले होते त्यावर लेनिनच्या १९२१ च्या नवीन आर्थिक धोरणाचा प्रभाव कसा होता हे उदाहरणासह चर्चा करून याचे मूल्यांकन उत्तरामध्ये करणे अपेक्षित होते.

‘भाषावार राज्य निर्मितीमुळे भारतीय एकतेच्या उद्देशाला मजबुती मिळालेली आहे का?’ हा प्रश्न योग्य पद्धतीने समजून घेण्यासाठी भाषावार प्रांत रचना का करण्यात आलेली होती तसेच याची नेमकी कोणती कारणे होती आणि याचा नेमका इतिहास काय आहे आणि यासाठी सरकारमार्फत कोणत्या उपाययोजना आखण्यात आलेल्या होत्या. तसेच १९६२ मध्ये स्थापन करण्यात आलेली राष्ट्रीय एकता परिषद व याची उद्दिष्ट्ये यासारख्या पैलूंचा एकत्रित विचार करून उदारणासह उत्तर लिहिणे अपेक्षित आहे आणि भाषावार राज्य निर्मितीमुळे भारतीय एकतेच्या उदेशाला मजबुती मिळालेली आहे का याचे संतुलित पद्धतीने विश्लेषण उत्तरामध्ये असणे अपेक्षित आहे.

कोणत्या परिस्थितीमुळे १९६६ चा ताश्कंद करार करण्यात करण्यात आला, त्याचे विश्लेषण करा. करारातील प्रमुख वैशिष्ट्यांची चर्चा करा. आणि कोणत्या अटळ परिस्थितीमुळे भारताला तत्परतेने बांगलादेशाच्या उद्यामध्ये निर्णायक भूमिका बजावावी लागली, याचे चिकित्सक पद्धतीने परीक्षण करा. हे दोन प्रश्न हे भारतासोबत पाकिस्तानने केलेल्या दोन युद्धाच्या पा श्र्वभूमीला ग्राह्य धरून विचारण्यात आलेले आहेत आणि या दोन्ही प्रश्नाचे योग्य आकलन होण्यासाठी आपणाला भारताची फाळणी व फाळणीचे परिणाम, संस्थानांचे विलीनीकरण याची योग्य माहिती असणे गरजेचे आहे.  त्यानंतर घडलेल्या घडामोडी याचीही माहिती असणे गरजेचे आहे. तत्कालिक नेमकी कोणती कारणे होती, इत्यादीची सखोल माहिती असणे गरजेचे आहे. त्याशिवाय या प्रश्नाची मुद्देसूद उत्तरे लिहिता येत नाहीत.

‘स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अनुसूचित जमाती (रळ२) विरोधात होणारे भेदभाव दूर करण्यासाठी, कोणते दोन मुख्य कायदेशीर पुढाकार राज्याद्वारे घेण्यात आले?’  हा प्रश्न थेट वस्तुनिष्ठ माहितीवर विचारण्यात आलेला आहे आणि यासाठी घेण्यात आलेले दोन मुख्य कायदेशीर पुढाकार कोणते होते व यांची अनुसूचित जमाती (रळ२) विरोधात होणारे भेदभाव दूर करण्यासाठी उपयुक्तता काय राहिली, याची उत्तरामध्ये थोडक्यात माहिती देणे आवश्यक आहे. २०१८, २०१९ आणि २०२० मध्ये या घटकावर थेट प्रश्न विचारण्यात आलेला नाही.   वरील जवळपास सर्व प्रश्न हे भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या पुढील दोन दशकांतील महत्त्वाच्या घडामोडींशी संबंधित आहेत. म्हणून भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या दोन दशकांतील घडामोडीची योग्य माहिती असणे गरजेचे आहे. या घटकाची तयारी  करताना सर्वप्रथम एनसीईआरटीच्या शालेय पुस्तकांचा आधार घ्यावा लागतो. इयत्ता १२ वीचे राज्यशास्त्राचे  ‘पॉलिटिक्स इन इंडिया सिन्स इंडिपेंडन्स’ हे पुस्तक सर्वप्रथम अभ्यासणे गरजेचे आहे. तसेच या घटकाची सखोल आणि सर्वांगीण तयारी करण्यासाठी बिपीन चंद्र लिखित ‘इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स’ आणि रामचंद्र गुहा यांचे ‘इंडिया आफ्टर गांधी’ हे संदर्भ ग्रंथ उपयुक्त ठरतात.

Story img Loader