Sample Question No. 1 (CASE STUDY)
You have been working with your team for almost a year. One of your subordinates Mr. A is very effective and hard working. He takes responsibility and gets things done. However, you have heard that Mr. A makes loose comments about women. Mrs. X who is working under A, comes to you, she is visibly disturbed. She tells you that Mr. A has been making undue advances towards her and has even asked her to go out for dinner with him. She wants to give a written complaint seeking action against Mr. A. what would you do and why?

या प्रश्नाचा विचार करत असताना काही मुद्दे लक्षात घ्यावे लागतील. ते म्हणजे तुमच्या कनिष्ठ कर्मचाऱ्याची कार्यक्षमता आणि त्या महिला कर्मचाऱ्यावर होणारा अन्याय. त्या पुरुष कर्मचाऱ्याच्या कार्यक्षमतेमुळे संस्थेचा कितीही फायदा होत असला तरीही तो फायदा हा त्या महिला कर्मचाऱ्याच्या मानसिक छळवणुकीकडे दुर्लक्ष करून झालेला आहे, हे लक्षात घ्यावे लागेल. त्या पुरुष कर्मचाऱ्याच्या अशा वर्तणुकीमुळे त्याची Integrity ही वादग्रस्त ठरली आहे, म्हणून त्याची efficiencyया ठिकाणी निरुपयोगीच ठरते. हे लक्षात ठेवावे लागेल की Efficiency can not be substitute for Integrity. किंवा There is no substitute for Integrity म्हणून त्या कनिष्ठ पुरुष कर्मचाऱ्याची नि:पक्षपाती चौकशी करून त्या महिला कर्मचाऱ्याला न्याय देणे हे तुमचे प्रथम कर्तव्य बनते.
या ठिकाणी तुमच्या संस्थेच्या/टीमच्या उत्पादकतेवर नकारात्मक परिणाम झाला तरी चालेल. मात्र तुमच्या टीममधील कोणत्याच कर्मचाऱ्याची छळवणूक होता कामा नये. विशेषत: महिला कर्मचाऱ्यांबद्दल निर्णयकर्त्यांने अधिक संवदेनशील राहायला हवे. या ठिकाणी उत्तर लिहीत असताना ‘विशाखा विरूद्ध राजस्थान सरकार’ या केसचा उल्लेख केला जाऊ शकतो. जी केस कामाच्या ठिकाणी होणाऱ्या महिलांच्या लैंगिक छळवणुकीसंबंधित आहे. या मुद्दय़ांचा विचार करून योग्य तो निर्णय घेणे अपेक्षित आहे.
Sample Question No. 2 (CASE STUDY)
You have grown up with X, who has been your best friend since childhood. You have shared your joys and sorrows and have been each other’s confidant. Both of you are in your final year graduation and writing your final exams. In the exam you notice that your friend is copying and cheating a lot. what would you do and why?

– या ठिकाणी निर्णय घेत असताना पुन्हा एकदा कल्ल Integrity हे मूल्य महत्त्वाचे ठरते. निर्णयकर्त्यांने निर्णय घेत असताना आपले खाजगी/वैयक्तिक संबंध निर्णयप्रक्रियेवर परिणाम करणार नाहीत, याची काळजी घेणे आवश्यक आहे.
तुमचा जीवलग मित्र कॉपी करताना तुम्हाला आढळला आहे आणि आता तुम्ही काय कराल असे विचारले आहे. या प्रश्नाचे उत्तर लिहीत असताना आपणाला दिलेल्या परिस्थितीची पूर्ण जाणीव असणे गरजेचे आहे. उदा. तुम्ही परीक्षा हॉलमध्ये आहात. परीक्षा चालू आहे. म्हणजेच इतर शांतपणे परीक्षा देत आहेत. तसेच समोर पर्यवेक्षकदेखील असणार आहे. या सर्व परिस्थितीचा  विचार करून आपणाला या प्रश्नाचे उत्तर लिहावे लागणार आहे.
या ठिकाणी निर्णय घेताना काही जण असा विचार करतील की, तो आपला मित्र आहे. जवळचा मित्र आहे आणि तो चुकीचे काम करत आहे आणि याचे दुष्परिणाम इतरांना तसेच त्यालादेखील भोगावे लागतील. म्हणून आपण त्या ठिकाणी त्याला कॉपी करू नको, असे सांगणे गरजेचे आहे. मात्र हा निर्णय चुकीचा ठरेल. कारण एकतर परीक्षा चालू असताना तुम्ही असे करू शकत नाही. कारण त्यामुळे परीक्षा हॉलमधील शांतता भंग पावेल. तसेच तो कॉपी करतोय म्हणजे गुन्हा घडत आहे. अशा वेळी गुन्हा थांबविण्याची जबाबदारी तुमची असली तरी त्या वेळी तुम्ही ते काम करणे उचित नाही. तर त्या कामासाठी नेमलेल्या पर्यवेक्षकाचे ते काम आहे. म्हणून तो कॉपीचा प्रकार पर्यवेक्षकाच्या निदर्शनास आणून देणे हाच योग्य निर्णय असू शकतो.
या प्रश्नाचे उत्तर लिहीत असताना कॉपी करणे हे अनतिक कृत्य तर आहेच. तसेच एखाद्याने कॉपी करण्यामुळे इतर परीक्षार्थीच्या Right to equality तसेच Right to fair Competition या अधिकारांचे उल्लंघन होते, अशी भाषा वापरणे उपयुक्त ठरेल. एकंदरीत या प्रश्नांचा सराव व्हावा म्हणून अधिकाधिक Case Studies सोडविणे, चर्चा करणे आवश्यक आहे.   

Story img Loader