काही महिन्यांपूर्वी यू. पी. एस. सी. ने जो नवीन अभ्यासक्रम घोषित केला, त्यात ‘सामान्य अध्ययन’ या घटकामध्ये एका नवीन विषयाचा समावेश केला गेला. परीक्षार्थीचा या पेपरसंदर्भातील संभ्रम दूर व्हावा यासाठी संघ लोक सेवा आयोगाने नुकतीच एक मॉडेल प्रश्नपत्रिका जारी केली. त्यामुळे परीक्षार्थीचा संभ्रम दूर होण्यास मदत झाली आहे. त्याविषयी..

काही महिन्यांपूर्वी यू. पी. एस. सी.ने नवीन अभ्यासक्रम घोषित केला. या नव्या अभ्यासक्रमामध्ये सामान्य अध्ययन या घटकामध्ये एका नवीन विषयाचा समावेश केला गेला. तो म्हणजे Ethics-Integrity and Aptitude होय. संपूर्णपणे नवीन असणाऱ्या या विषयामुळे या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झाले होते, परंतु परीक्षार्थीचा हा संभ्रम दूर व्हावा या कारणास्तव संघ लोक सेवा आयोगाने नुकतीच एक मॉडेल प्रश्नपत्रिका जारी केली. यामुळे परीक्षार्थ्यांचा संभ्रम दूर होण्यास मदत झाली आहे.
मुळात हा विषय नक्की काय आहे, याची आधी चर्चा करू. Ethics Integrity and Aptitude असे या विषयाचे नाव आहे. सर्वात आधी प्रश्न असा पडतो की, हा विषय अभ्यासक्रमामध्ये का ठेवण्यात आला किंवा नतिकता हा विषय अभ्यासक्रमामध्ये ठेवून प्रशासन नतिक होणार आहे का? एखाद्या विद्यार्थ्यांची नतिकता ही अशा प्रकारच्या परीक्षा पद्धतीमध्ये तपासता येऊ शकते काय, इत्यादी. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, या विषयाच्या जरी शंका उपस्थित होत असतील, तरीसुद्धा प्रशासनामध्ये येणाऱ्या उमेदवारांमध्ये कमीत कमी Ethics आणि  Integrity म्हणजे काय, त्याचे विविध पलू कोणते – निर्णय प्रक्रियेमध्ये Ethics – Integrity असणे का महत्त्वाचे आहे, Decision Making म्हणजे नक्की काय, निर्णय प्रक्रियेतील नतिकतेमुळे समाजाचा कसा फायदा होणार आहे, ती नतिकता नसल्यामुळे समाजाचे, देशाचे कसे नुकसान होणार आहे, या विविध बाबींची चर्चा आणि अभ्यास उमेदवारांनी करणे आवश्यक आहे. नतिकता पूर्णपणे शिकवली जाऊ शकत नाही किंवा नतिकतेचा अभ्यासक्रमामध्ये समावेश केल्याने निवडले जाणारे उमेदवार नतिकच असतील असेही नाही. मात्र या उमेदवारांना जर मुळात नतिकता काय आहे, हे जर व्यवस्थित समजते, जर अधिकारी म्हणून काम करताना ते नतिकतेचे पालन करण्याची शक्यता निश्चितपणे आधीच आहे, म्हणून या विषयाचा समावेश अभ्यासक्रमामध्ये करण्यात आला आहे.
संघ लोक सेवा आयोगाने जी मॉडेल प्रश्नपत्रिका दिली आहे. तिच्यानुसार जवळपास निम्मे प्रश्न हे सद्धांतिक किंवा विश्लेषणात्मक असतील तर बाकीचे प्रश्न हे केस स्टडीज असतील, म्हणून अभ्यास करताना या दोन्ही घटकांचा समतोल अभ्यास करावा लागणार आहे.
उदाहरणादाखल आपण एका प्रश्नाची या ठिकाणी चर्चा करू, मॉडेल प्रश्नपत्रिका प्रश्न पहिला आपण पाहू :
द. 1 – What do you understand by Ethical Human Conduct? In what way is it important to be ethical along with being professionally competent?
आता या प्रश्नाचे उत्तर लिहीत असताना पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवावी लागणार आहे की, हा प्रश्न किती गुणांसाठी आहे. गुंणांच्या संख्येवरून उत्तराची मर्यादा आपणाला ठरवावी लागेल. (साधारणपणे २ गुणांसाठी २० शब्द लिहिणे अपेक्षित आहे.) आता प्रश्न विचारला आहे की Ethical Human Conductम्हणजे काय? तसं पाहायला गेलं तर अशा प्रश्नांच्या उत्तरासाठी काही विशिष्ट अभ्यासाची गरज नाही. हा प्रश्न  कॉमन सेन्सने सोडवता येऊ शकतो. समाजामध्ये वावरताना, एखाद्या संस्थेमध्ये काम करताना आपण नतिक असावं म्हणजे नक्की काय असावं, असा प्रश्न विचारला गेला आहे. थोडा विचार केला असता याचं उत्तर आपणाला आपोआप मिळेल.
नतिक वर्तवणुकीमध्ये अनेक मुद्दय़ांचा समावेश करता येऊ शकतो. उदाहरणादाखल पुढे काही मुद्दे दिले आहेत :
१. आपण आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडणे.
२. कर्तव्य पार पाडतानाच ते कर्तव्य का पार पाडायचे, त्याने कोणाला फायदा होणार आहे, त्याने एकंदरीत समाजाचा फायदा होतो आहे की नाही याचा विचार करणे.
३. मी कर्तव्य पार पाडतो आहे ते केवळ ‘कर्तव्य पार पाडणे’ हे माझे कर्तव्य आहे म्हणून की मी ते काम एका सेवेच्या प्रेरणेमधून करतो आहे? (सेवेच्या प्रेरणेमधून कर्तव्य पार पाडणे हे या ठिकाणी अपेक्षित आहे.)
४. मी माझे काम करताना सर्व संस्थेचा विचार करणे अपेक्षित आहे. माझे काम हे पूर्ण संस्थेच्या डोलाऱ्याचा एक भाग आहे ही भावना असायला हवी.
५. केवळ माझे काम/कर्तव्य पार पाडणे म्हणजे नतिकता नव्हे, तर ते काम पार पाडत असताना संस्थेतील इतरांना त्रास होणार नाही, अडचण होणार नाही याचीही काळजी घेणे आवश्यक आहे.
६. मी इतरांशी कसा वागतो, मी काम करताना इतरांना दुखावतो का, केवळ माझेच काम व्हावे अशी माझी भूमिका आहे का, संस्थेच्या प्रगतीपेक्षा मला माझीच प्रगती आवश्यक वाटते का, आपापसात हेवेदावे करून मी फक्त माझेच महत्त्व कसे वाढेल याचा प्रयत्न करतो का, मी काम करताना ‘माझेच खरे’ असा हेकटपणा करतो का, संस्थेमध्ये, समाजामध्ये केवळ आपलेच महत्त्व वाढावे असा मी वागतो का, माझ्या प्रत्येक कृतीचा संस्थेवर, समाजावर परिणाम होणार आहे याची मला जाणीव आहे का, इत्यादी बाबी निर्णयकर्त्यांने किंवा अधिकाऱ्याने लक्षात घेणे गरजेचे आहे.
७. एखाद्या शासकीय संस्थेमध्ये, काम करत असताना आपण जबाबदारपणे वागायला हवे, आपण समाजाला उत्तरदायी असतो. आपल्या वर्तुवणुकीचा समाजावर उचित-अनुचित परिणाम होतो याची आपणाला जाणीव असायला हवी.
८. माझी बुद्धिमत्ता, कौशल्य याचा सदुपयोगच करायला हवा – याला  Intellectval Integrity असे म्हणतात.
९. माझी वागणूक ही न्यायाधिष्ठित आणि कायद्याला धरून असावी, पण केवळ ‘कोरडी’ भूमिका नको. त्या भूमिकेमध्ये एक संवेदनशील मनसुद्धा व्यक्त व्हायला हवं. समाजातील दीन-दलित, दुबळे, वंचित घटक, स्त्रिया यांच्याकडे नेहमीच सहानुभूतीने पाहणे आवश्यक आहे.
१०. Ethical Human Conduct बद्दल थोडक्यात सांगायचे म्हणजे आपला दृष्टिकोन हा मानवतावादी आणि कल्याणकारी असायला हवा, म्हणजे आपली इतरांशी वर्तवणूक ही अशी असायला हवी की, जी वर्तवणूक आपण दुसऱ्यांकडून आपल्याविषयी अपेक्षित करतो.
उदाहरणार्थ – दुसऱ्यांनी आपल्याला बरोबरीचा दर्जा द्यावा. आदर, प्रेम आणि आपुलकीने आपला विचार करावा, आपली फसवणूक करू नये. आपल्याशी खोटारडेपणाने वागू नये. मानसिक आणि आíथक छळवणूक होऊ नये इत्यादी. असे अनेक मुद्दे आपणाला मांडता येऊ शकतात.
(क्रमश:)
              

Story img Loader