आज राज्यव्यवस्था या घटकाच्या अभ्यासधोरणाविषयी जाणून घेऊयात. राज्यव्यवस्था म्हणजे भारतीय राज्यघटनेतून निर्माण झालेली राज्यसंस्था- शासन संस्थेची चौकट आणि भारतीय समाज या दोहोंतील आंतरसंबंध होय. राजकीय पक्ष, दबाव गट, आंदोलने, सामाजिक चळवळी (जुन्या-नव्या) तसेच प्रदेश, जात, वर्ग, धर्म, िलगभाव हे घटक आणि शासन यातील देवाणघेवाण, त्यांचा परस्परावर होणारा परिणाम, त्यातून निर्माण होणारे कळीचे मुद्दे आणि आव्हाने याचा सविस्तर अभ्यास. गेल्या मुख्य परीक्षेत विचारण्यात आलेले पक्षांतरबंदी कायदा, दबाव गटाची रचना व कार्य मूल्यमापन, स्वयं साहाय्यता गट आणि छोटय़ा राज्यांची मागणी (प्रदेशवाद) हे राज्यव्यवस्थेतील विविध घटकांवर आधारित प्रश्न होते. त्यामुळेच राज्यव्यवस्थेतील सर्व घटकांची तयारी करणे महत्त्वाचे ठरते.
अर्थात व्यवस्थेतील विविध घटकांची तयारी करताना त्यांच्या अभ्यासाची व्याप्ती ठरवणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, दबावगटांचा अभ्यास करताना अर्थ, प्रकार, वैशिष्टय़े, कार्य, तंत्रे आणि त्यांची भूमिका या महत्त्वपूर्ण आयामांचा अभ्यास करणे क्रमप्राप्त ठरते. त्याखेरीज दबावगटांच्या कार्यातील उणिवा आणि त्यावरील भाष्य याही बाबी अवगत असाव्यात. एखादा दबाव गट चच्रेत असल्यास त्याची कारणे, परिणाम, त्यातून पुढे आलेले मुद्दे आणि त्याविषयीचे वाद-विवाद व चर्चा यांचे सूक्ष्म अवलोकन करावे. आपल्याकडे उपलब्ध संदर्भ साहित्याच्या आधारे या सर्व आयामांविषयी टिपणे तयार करावीत. ही अभ्यासचौकट राज्यव्यवस्थेतील उर्वरित घटकांनाही लागू करावी आणि त्या सर्व घटकांच्या संभाव्य आयामांची सविस्तर तयारी करावी. या संदर्भात एक महत्त्वाची बाब म्हणजे त्या-त्या घटकांची सद्यस्थिती अथवा वर्तमान स्थितीत त्याविषयी निर्माण झालेला कळीचा मुद्दा होय. थोडक्यात, त्यासंबंधी चालू घडामोडींचा अभ्यास महत्त्वपूर्ण ठरतो. उदाहरणार्थ, तेलंगणा आंदोलन हा प्रदेशवादाचा एक आविष्कार आहे. मात्र त्यानिमित्ताने थेट तेलंगणाविषयी प्रश्न न विचारता छोटय़ा राज्यांची निर्मिती आणि त्यामागील सुशासनाचा तर्क असा प्रश्न विचारण्यात आला. म्हणजे छोटी राज्ये ही सुशासनासाठीची उपाययोजना होऊ शकते का? अशा आशयाचा हा प्रश्न होता. या प्रकारच्या प्रश्नाचे नेमके व अर्थगर्भ उत्तर लिहिण्यासाठी छोटय़ा राज्यांच्या निर्मितीविषयी जो वादविवाद गेल्या दोन-तीन वर्षांत पुन्हा एकदा सुरू झाला, त्याचे बारकाईने केलेले अवलोकनच साहाय्यभूत ठरते. त्यामुळे एखादा घटक चच्रेत आल्यास त्याचा चौफेर विचार करणे अत्यावश्यक ठरते.
लोकपाल संस्थेविषयी विचारलेला प्रश्नदेखील व्यापक स्वरूपाचा व विचाराची समग्रता तपासणारा होता. त्या प्रश्नात समाजातील अनतिकतेची समस्या व लोकपाल याविषयी स्पष्टीकरण अपेक्षित होते. त्यासाठी एका बाजूला लोकपालचे अधिकार, कार्यकक्षा आणि त्याचा संभाव्य परिणाम याचे आकलन तर दुसऱ्या बाजूला समाजातील अनतिकतेची समस्या, तिचे स्वरूप, कारणे व संभाव्य उपाय याविषयक नेमका विचार करणे महत्त्वाचे ठरते. या दोहोंचे योग्य आकलन झाल्यासच अनतिकतेची समस्या सोडवण्यात व त्यावर मात करण्यात लोकपाल कितपत उपयुक्त ठरेल याचे उत्तर देणे शक्य होते. एकंदर अशा प्रकारचे प्रश्न विद्यार्थ्यांचे सभोवतालच्या समस्येविषयीचे ज्ञान कसे आहे? त्यातील मध्यवर्ती बाब समजली आहे का? आणि त्यावर कोणती उपाययोजना साहाय्यभूत ठरेल? अशा विविध अंगांविषयी विद्यार्थ्यांने विचार केला आहे का? याची जणू तपासणी केली जाते. म्हणूनच अभ्यासक्रमातील प्रत्येक घटकाचा अभ्यास करताना चौफेर व चौकस नजर असणे गरजेचे आहे. वाचनाबरोबरच सतत विचार, चिंतन व मननाची सवय विकसित करणे फलदायी ठरेल.
उपरोक्त चíचलेल्या काही आव्हानात्मक व विचारप्रवर्तक प्रश्नांची उत्तरे निर्धारित वेळेत व प्रभावीपणे लिहिता यावीत यासाठी तशा प्रश्नांचा भरपूर सराव करणे उपकारक ठरेल. स्वत: तसे प्रश्न तयार करून उत्तरे लिहून, तपासून घ्यावीत. त्यामुळे विचाराची चौकट, त्यातील मुख्य मुद्दे यांची नेमकी मांडणी करण्याबरोबरच वेळेचे योग्य नियोजन करणेही सुलभ ठरेल. अशा अभ्यासपद्धतीमुळे आपल्या तयारीची गती वाढेल आणि तिला धारही येईल. मग पुढील घटकांच्या/प्रकरणांच्या अभ्यासात केवळ मुद्दे अधोरेखित करत राहिल्यास उत्तरांचा अंदाज येत जाईल. परिणामी, तयारीचा वेग वाढून उत्तरात प्रभावीपणा व नेमकेपणाची हमी देता येईल. राज्यव्यवस्थेतील घटकांच्या तयारीसाठी ‘एनसीईआरटी’चे बारावीचे पाठय़पुस्तक  उपयोगी पडते, त्याबरोबरच वर्तमानपत्रांचे तसेच स्पर्धापरीक्षाविषयक नियतकालिकांचे नियमित वाचन करावे.
 admin@theuniqueacademy.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा