यूपीएससी नागरी सेवा मुख्य परीक्षेमध्ये बदललेल्या अभ्यासक्रमात भारतीय संस्कृती व भारतीय वारसा हा घटक समाविष्ट करण्यात आलेला आहे. वस्तुत यापूर्वीच्या अभ्यासक्रमात हा घटक अप्रत्यक्षपणे अभ्यासावा लागत असे. पण प्रस्तुत बदलानुरूप भारतीय वारसा याचा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे. अर्थात, वारसा या घटकामध्ये सांस्कृतिक (मानवनिर्मित) आणि नसíगक दोन्ही निर्मितीचा अंतर्भाव होतो. थोडक्यात बदललेल्या अभ्यासक्रमानुसार या घटकाची व्याप्ती वाढवण्यात आलेली आहे. याचा परामर्श आपण या लेखात घेणार आहोत.
२०१३ मधील मुख्य परीक्षेत या घटकांवर २ प्रश्न (२० गुण) विचारण्यात आलेले होते.  
यावर्षीचा महत्त्वाचा बदल म्हणजे प्रश्नांसाठी विकल्प देण्यात आलेले नव्हते. अर्थात, प्रश्न सोडवण्याची सक्ती करण्यात आलेली होती. याबरोबर ठरावीक शब्दमर्यादा नमूद करण्यात आलेली होती. २० गुणांसाठी ४०० शब्दांची मर्यादा होती. यापूर्वी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत विकल्प उपलब्ध होता.
या वर्षी विचारण्यात आलेले प्रश्न साहित्य, मंदिर स्थापत्य आणि नृत्य यांसारख्या सांस्कृतिक घटकावर विचारण्यात आलेले होते. यातील पहिला प्रश्न संगम साहित्याच्या आधारावर तत्कालीन सामाजिक-आíथक स्थितीचे वर्णन यांवर भाष्य करणे असा होता. हा प्रश्न सोडवताना संगम साहित्याचा कालखंड, संगम म्हणजे काय, याची माहिती असणे उपयुक्त ठरते. सिलप्पडिकरम व मणिलेखा ही दोन महाकाव्ये संगम युगातील सामाजिक आणि आíथक जीवनाविषयी माहिती देतात. उत्तरात या दोन महाकाव्यांचा संदर्भ देत उत्तर लिहिणे अपेक्षित होते. तांडव नृत्यावर विचारण्यात आलेला प्रश्न सुरुवातीच्या शिलालेखात नमूद माहितीच्या आधारे चर्चात्मक पद्धतीने लिहायचा होता. तांडव नृत्य हा वैश्विक नृत्याचा प्रकार आहे. हा नृत्य प्रकारातील जोशपूर्ण नृत्य प्रकार आहे. तसेच मर्दानी अथवा पौरुषी पलूचे प्रतिनिधित्व करतो. अर्थात शिलालेखातील माहितीच्या आधाराने या नृत्य शैलीची वैशिष्टय़े लिहिणे क्रमप्राप्त होते. थोडक्यात हा प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपाचा होता. चोल मंदिर स्थापत्यकलेशी संबंधित प्रश्न हा चोल मंदिर स्थापत्याच्या वैशिष्टय़ांच्या आधारे चर्चात्मक पद्धतीने लिहायचा होता. प्राचीन भारतामध्ये नागर आणि द्राविड या दोन प्रमुख मंदिर शैलींचा विकास झालेला होता. द्राविड मंदिर शैली दक्षिण भारतातील मंदिर शैलीचे प्रतिनिधित्व करते. या शैलीचा विकास पल्लवांच्या काळापासून पाहायला मिळतो. चोल ही पल्लवांनंतरची राजसत्ता होती, ज्या काळात द्राविड मंदिर शैली अधिक उत्तम होती. चोल यांनी बांधलेली मंदिरे उदा.- गंगाईकोंडाचोलापुरम, ऐरावतेश्वर आणि तंजावरचे बृहद्दीश्वर मंदिर ही चोल मंदिर स्थापत्य कलेच्या उत्कृष्टतेची आजही साक्ष देतात. नंतरच्या कालखंडात दक्षिण भारतात अनेक मंदिरांची निर्मिती चोल मंदिर स्थापत्य कलेला आधारभूत मानून करण्यात आलेली दिसते.
अभ्यासाचे नियोजन
थोडक्यात २०१३ च्या मुख्य परीक्षेत या घटकांवर विचारण्यात आलेल्या प्रश्नाची उत्तरे विषयाचे पारंपरिक ज्ञान असल्याशिवाय लिहिता येण्यासारखी नव्हती. भारतीय वारसा आणि संस्कृती हा घटक बदललेल्या अभ्यासक्रमानुसार अधिक व्यापक करण्यात आलेला आहे. २०१३ पर्यंत या घटकांवर विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे स्वरूप हे विषयाच्या संकीर्ण माहितीच्या आधारावर चर्चा करणे, भाष्य करणे, विश्लेषण करणे, विशिष्ट प्रकारच्या पलूचा विचार यांसारख्या आयामावर आधारित होते. व्याप्ती अधिक असल्यामुळे अभ्यासाच्या दृष्टीने हा विषय अधिक गुंतागुंतीचा वाटतो. या घटकावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे व्यवस्थित आकलन केल्यास असे निदर्शनास येते की, काही मोजक्याच सांस्कृतिक घटकावर जास्तीत जास्त प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. उदा.- भारतीय स्थापत्य व शिल्प कला, भारतीय नृत्य, संगीत व नाटक, भारतीय चित्रकला, भारतीय साहित्य याचबरोबर उत्सव व सणावळी इत्यादी.
या घटकाचा अभ्यास करत असताना त्या-त्या  कलेच्या उदयाचा इतिहास, वैशिष्टय़े व वेगवेगळे प्रकार, संबंधित ऐतिहासिक ठिकाणे, पुरातत्त्वीय आणि सांस्कृतिक साधने यांसारख्या पलूंचा एकत्रितपणे विचार केल्यास अभ्यास र्सवकष पद्धतीने करता येईल. त्याचप्रमाणे सरकारमार्फत हा वारसा जतन करण्यासाठी राबवले जाणारे उपक्रम, संबंधित संस्था व संघटना यांसारख्या गोष्टींची माहिती ठेवावी लागते. याबरोबरच भारतीय वारसा आणि संस्कृती जतन व वाढ करण्यासाठी दिले जाणारे विविध पुरस्कार यांसारख्या सांस्कृतिक चालू घडामोडींच्या नोंदी अभ्यासाच्या दृष्टीने उपयुक्त ठरतात. उदा. – नॅशनल मिशन ऑन लायब्ररी (२०१२), संगीत नाटक अकादमीने किती नृत्य प्रकारांना अभिजात दर्जा दिलेला आहे (२०११), यासारखे प्रश्न हे संबंधित चालू घडामोडींच्या आधारे विचारण्यात आलेले आहेत. प्रस्तुत बदलानुरूप हा घटक अधिक व्यापक करण्यात आलेला आहे. कारण प्रत्येक भारतीयाला आपल्या सांस्कृतिक व नसíगक वारशाच्या इतिहासाची जाण असावी, हा उद्देश यामागे आहे. म्हणूनच त्याची समग्र तयारी करणे अत्यावश्यक ठरते.    
 admin@theuniqueacademy.com