A bird sitting on the Branch of a Tree doesn’t get frightened by the shaking Branch, Because the Bird Trusts not the Branch, But its Wings.
यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षेच्या पूर्वपरीक्षेत अंतिम यादीत स्थान मिळविण्यासाठी पेपर २ हा मुख्य भूमिका बजावतो. पेपर २ मधील आकलन या घटकाचा त्यात सिंहाचा वाटा असतो. नवीन बदललेल्या अभ्यासक्रमानुसार राज्य सेवा पूर्वपरीक्षा २०१३मध्ये पेपर २ हा आयोगाचा पहिलाच प्रयोग होता. विद्यार्थ्यांनी या पेपरसाठी चांगली तयारी केली होती, मात्र प्रत्यक्षात काही विद्यार्थी मात्र गोंधळले होते, कारण आकलन या घटकावर जवळजवळ ५० टक्के प्रश्न विचारले गेले, जवळजवळ ८० टक्के विद्यार्थ्यांना वेळेचे नियोजन करण्यास अपयश आले. थोडक्यात परीक्षेच्या दृष्टीने आकलन हा महत्त्वाचा घटक आहे.
आकलन म्हणजे एखादी गोष्ट समजून त्यावर योग्य निर्णय घेणे. आकलन या घटकावर उताऱ्यांवर आधारित ५ ते ६ प्रश्न दिले असतात. आकलन या घटकावर दोन प्रकारचे उतारे असतात – आकलन (Comprehension) आणि इंग्रजी भाषेचे आकलनकौशल्य (English Language Comprehension ). इंग्रजी भाषेचे आकलनकौशल्य यांसाठी जो उतारा दिलेला असतो तो फक्त इंग्रजीत असतो, त्याचे मराठीत भाषांतर केलेले नसते. प्रशासकीय क्षेत्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांचे इंग्रजी भाषेचे ज्ञान तपासून पाहण्यासाठी हा उतारा असतो. साधारणत: याचा स्तर दहावी ते बारावी इयत्तेपर्यंत असतो. हे उतारे सरळ व सोपे असतात. त्यामुळे हा उतारा प्रथम सोडविण्याचा प्रयत्न करावा. कारण या ठिकाणी हक्काचे गुण प्राप्त करण्याची संधी असते.
परीक्षेमध्ये आकलनविषयक उतारे सोडवताना खालील मुद्दे लक्षात ठेवावेत-
* परीक्षा कक्षात प्रचंड मानसिक ताण असतो. त्यामुळे अनेकदा घाईघाईत माहिती असलेल्या गोष्टींतदेखील चुका होतात. जर विचार केला तर आकलन हा घटक असा आहे की जेथे अधिक गुण मिळविण्याची संधी असते. या घटकाच्या तयारीसाठी कोणत्याही पूर्वज्ञानाची आवश्यकता नसते. दिलेल्या उताऱ्यातून उत्तरांची निवड करायची असते. त्यामुळे सर्वप्रथम उताऱ्यांची संख्या किती आहे, लहान उतारे किती व मोठे उतारे किती आहेत, इंग्रजी उतारे किती आहेत हे पाहून वेळेचे नियोजन करावे.
* उतारा योग्य गतीने एकाग्र होऊन वाचावा. उतारा असा वाचावा की, तो पुन्हा वाचण्याची गरज पडणार नाही.
* उतारा वाचताना महत्त्वपूर्ण वाक्य पेन किंवा पेन्सिलने अधोरेखित करून ठेवावेत. उताऱ्यात लेखकाला काय मांडायचे आहे ते समजून घ्यावे.
* सर्वप्रथम उतारा वाचून नंतर प्रश्न सोडवावेत, की प्रश्न वाचून उतारा सोडवावा, याबाबत मतमतांतरे आहेत. आपला ज्या पद्धतीने सराव असेल व ज्या पद्धतीने वेळ वाचत असेल ती पद्धत स्वीकारावी, मात्र प्रश्न वाचून उतारा सोडविल्यास आपल्याला काय माहिती उताऱ्यातून जाणून घ्यावयाची आहे हे समजते व आपला वेळ वाचतो. तसेच प्रश्न वाचून घेतल्याने उतारा समजणे जास्त सोपे जाते.
* आकलनविषयक प्रश्नांना प्राधान्य द्यावे, की सामान्य मानसिक क्षमतेवरील प्रश्न आधी सोडवावेत, याही बाबतीत
विद्यार्थ्यांना संभ्रम असतो. त्यामुळे ज्यांना मानसिक क्षमता तसेच गणिती प्रक्रियेवरील प्रश्न यांवर गती नसेल
त्यांनी आकलनविषयक घटक सर्वप्रथम व अचूक सोडविण्याचा प्रयत्न करावा.
सरावासाठी काही उतारे खालीलप्रमाणे –
१) खालील उताऱ्याचे आकलन करून खालील विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे द्या.
‘माणसाचे मन म्हणजे तळाचा ठाव न लागणारा खोल जलाशय. रहस्यमय, गूढ असे मन केव्हा कसे वागेल हे सांगणे जेवढे कठीण तेवढेच ते तसे का वागले याचे स्पष्टीकरण देणेही अवघड. पण रवींद्रनाथांना माणसाच्या मनाची समज उत्तम असावी, असे दिसते. एखाद्या निष्णात मानसशास्त्रज्ञाच्या कौशल्याने ते माणसाच्या मनाचा ठाव घेऊ पाहतात. त्यामुळे सखोलता प्राप्त झालेली त्यांची कथा एक उंची गाठते.
माणसाचे मन सर्वत्र सारखेच. मग तो शहरात राहणारा असो की लहानशा गावात, वात्सल्य, मत्री, श्रद्धा, द्वेष, मोह, सूड या भावना तर शाश्वत. म्हणूनच रवींद्रनाथांच्या कथेला नागर – ग्रामीण अशी खूण-चिठ्ठी लावता येत नाही. ती कथा असते- माणसांची.
रवींद्रनाथांनी एके ठिकाणी म्हटलं आहे, प्रत्येकाच्या जीवनाचा एक मूळ स्वर असतो, त्यांच्या जीवनाचा असा स्वर होता निसर्ग. निसर्गाशी त्यांचा होता एक नाडीयोग. त्यांच्या जीवनाचा निसर्ग हा अविभाज्य घटक असल्यामुळे त्यांच्या साहित्यातही त्याला अढळ स्थान आहे. त्यांच्या साहित्यात तो फक्त वर्णनासाठी वा अलंकारासाठी येत नाही तर तो त्यात पूर्णपणे एकजीव झालेला असतो. ‘बलाई’ या कथेतील लहानगा बलाई हा मानव रूपातील निसर्गपुत्रच आहे. ज्या दिवशी सागराच्या गर्भातून नुकत्याच वर आलेल्या ओल्या मातीतून अरण्यानं प्रथम टाहो फोडला, त्याच दिवशी या पोराचा जन्म झाला असावा. त्याचं खरं वय कोटय़वधी वर्षांचं असावं. – त्या वेळी पशुपक्षी नव्हते; जीवनाचा कोलाहल नव्हता. चहुकडे होते दगड, चिखल आणि पाणी. काळाच्या प्रवाहाचा विचार केला तर सर्वप्रथम निर्माण झाल्या वनस्पती. सूर्याला हात जोडून झाड म्हणाले, मी आहे. मी जगेन. मी आहे निरंतर प्रवासी. मृत्यूमधल्या चिरंतन जीवनाच्या विकासतीर्थाकडे मी रात्रंदिवस, उन्हापावसातून जात राहीन. हा घोष आजही वनावनातून, डोंगरदऱ्यांतून दुमदुमत असतो. पानापानांतून, फांद्याफांद्यातून धरतीच्या प्राणाचे बोल घुमतात, मी आहे मी आहे. विश्वचतन्याची ही मूक धात्री वनस्पती युगापासून द्युलोकाला दोहत आहे; पृथ्वीच्या अमृतभांडारात जीवनाचं तेजल रस व लावण्य साठवत आहे; तिचे सतत उचंबळून येणारे अधीर बोल असतात. मी आहे मी आहे. हे बोल बलाईच्या देहातून, रक्तातून घुमत. त्याला ऐकू येत. या वर्णनातून बलाईच्या जीवनाचा मूळ स्वर तरूपल्लवच कसा होता, हे रवींद्रनाथ दाखवतात. त्याग, अतिथी वगरे कथांतून आलेले निसर्गवर्णन मानवी भावनांशी पूर्णपणे एकरूप झालेले असते.
रवींद्रनाथांची कथा ही काव्यात्म आहे. कवी रवींद्रनाथ कथाकार रवींद्रनाथांमध्येही दिसतात. त्यांच्या काव्यात पुन्हा पुन्हा येणाऱ्या सोनं, बासरी नदी, झाडांची सळसळ वगरे प्रतिमा कथांमधूनही येतात. ‘अपरिचिता’ या कथेतील ‘अरे आवाजा, अनोळखी कंठातून निघालेल्या नादा, तू तर क्षणार्धात माझ्या चिरपरिचित आसावर विराजमान झालास की! आश्चर्य! तू तर किती परिपूर्ण आहेस! चंचल काळाच्या अधीर हृदयावर तो आवाज फुलासारखा उमलला होता. काळाची झुळूक त्याची पाकळीसुद्धा हलवू शकत नव्हती. त्याच्या अपरिमित कोमलतेवर यित्कचितही डाग पडत नव्हता… ’
* खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?
अ. रवींद्रनाथांचे काव्य कथात्मक आहे.
इ. रवींद्रनाथांची कथा कविता ग्रामीण आहेत, त्यावर शहरांचा प्रभाव आहे.
१) अ व इ बरोबर २) अ बरोबर ३) फक्त इ बरोबर ४) दोन्ही चूक
* रवींद्रनाथांची कथा-कविता एक उंची का गाठते?
अ. त्या कथा कवितांना ग्रामीण भागाचा टच आहे.
इ. त्या कथा कवितांमध्ये मानवी मनाचा ठाव घेतला आहे, तसेच त्यांच्या कथेमध्ये निसर्ग हा अविभाज्य भाग आहे.
१) अ व इ बरोबर २) अ बरोबर ३) फक्त इ बरोबर ४) दोन्ही चूक
* उताऱ्यात रवींद्रनाथांच्या किती कथांचा उल्लेख आला आहे?
१. एक २) दोन ३) तीन ४) चार
* वरील उताऱ्यात, वनावनातून, डोंगरदऱ्यातून आजही घोष दुमदुमत असतो, असे वर्णन आले आहे. हे वर्णन कशाच्या संदर्भात आहे?
१. कथेच्या संदर्भात २. कवितेच्या संदर्भात
३) कथा व कवितेच्या संदर्भात ४) यांपकी नाही.
* उताऱ्यात बलाई म्हणून उल्लेख कशाच्या संदर्भात आलेला आहे?
१. निसर्गाच्या संदर्भात २) मानवी मनाच्या संदर्भात ३) आवाजाच्या संदर्भात ४) यांपकी नाही.
२) खालील उताऱ्याचे आकलन करून खालील विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे द्या.
‘१८५९ मध्ये जॉनने आपल्या एका सहकाऱ्यासमवेत – मॉरिस क्लार्क – त्यांचा पहिला तेल शुद्धीकरण प्रकल्प बांधला. क्लीव्हलँडच्या औद्योगिक क्षेत्रात तयार झालेला तो पहिला औद्योगिक तेल प्रकल्प होता. अँड्रय़ूज, क्लार्क आणि कंपनीकडे त्याची मुळातली मालकी होती. १८६५ मध्ये एका ऐतिहासिक लिलावात ७२,५०० डॉलर्स एवढी घवघवीत रक्कम देऊन जॉनने क्लार्क बंधूंचे समभाग खरेदी केले आणि प्रकल्प पूर्णपणे रॉकफेलर आणि अँड्रय़ूज या नावाने काम करू लागला. १८६६ मध्ये जॉनच्या भावाने विल्यमने आणखी एक तेल शुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित केला.
जानेवारी १८७० मध्ये या सर्व छोटय़ा-मोठय़ा प्रकल्पांचे विलीनीकरण करून ओहोयो स्टँडर्ड ऑइल या नव्या मोठय़ा कंपनीची स्थापना करण्यात आली. रेल्वेचे जाळे ओहोयो प्रांतात विणले जात होते. तेलाची वाहतूक करण्यासाठी रेल्वे मार्गाचा वापर सुरू झाला. रेल्वे त्यासाठी स्टँडर्ड ऑइलला खास सवलत देऊ लागले. स्टँडर्ड ऑइल ही आता देशातील सर्वात मोठी तेल कंपनी बनली होती. रेल्वेचे भाव भडकल्यावरही फक्त स्टँडर्ड ऑइलला किफायतशीर सवलतीचा दर लावला गेला. यावर खूप वादंग झाला. जॉन रॉकफेलर या वादविवादामुळे जराही विचलित झाला नाही. स्पर्धा करायची, प्रतिस्पध्र्याचे प्रकल्प विकत घ्यायचे, ते स्टँडर्ड ऑइलमध्ये विलीन करायचे, त्यांचा विकास करायचा आणि उत्पादन वाढवायचे हा त्याचा खाक्या होता. १८७२ मध्ये क्लीव्हलँडमधील २६ पकी २२ प्रकल्प स्टँडर्ड ऑइलच्या ध्वजाखाली काम करत होते. एकेकाळचे त्याचे कट्टर विरोधक प्रँट आणि रॉजर्सही त्याच्याबरोबर काम करू लागले. स्टँडर्ड ऑइलमध्ये त्यांना सन्मानाच्या जागा मिळाल्या. प्रतिस्पर्धी जॉन रॉकफेलरची आíथक ताकद पाहूनच गर्भगळीत होत आणि शरणागतीचे पांढरे निशाण फडकवत. विलीनीकरणाचा प्रस्ताव हा दिवाळखोरीपेक्षा सुज्ञतेचा असल्यामुळे ते त्याचा स्वीकार करीत.
कालांतराने अमेरिकेतल्या संपूर्ण तेलनिर्मिती क्षेत्रावर स्टँडर्ड ऑइलचेच अधिराज्य होते. मार्केटमध्ये दुसऱ्या कोणत्याही कंपनीला शिरकाव करणे अशक्य झाले. ‘हम करे सो कायदा’ अशी एकाधिकारशाही निर्माण झाल्यामुळे भाववाढ होईल, इतरांना संधीच उरणार नाही, असे अनेक दावे – प्रतिदावे ओहोयो प्रांताच्या कोर्टातून सुरू झाले. कायद्यात बदल घडवले गेले. प्रचंड साम्राज्य झालेल्या स्टँडर्ड ऑइलने तेल शुद्धीकरण उद्योगात मूलभूत सुधारणा केल्या होत्या. तेलाची प्रत वाढली होती. केरोसिनचा भाव कमी केला होता. इडा टारबेल नावाच्या एका मुक्त कार्यकर्तीने रॉकफेलरवर दिवाणी दावे लावून स्टँडर्ड ऑइलच्या साम्राज्याला हादरा दिला. टारबेलच्या वडिलांची काही वर्षांपूर्वी स्टँडर्ड ऑइल ट्रस्ट या न्यासाचे तुकडे करण्यात आले. २९ हजार बॅरल्सपेक्षाही अधिक तेल उत्पादन रोज करणाऱ्या या महाकाय उद्योगाचे छोटय़ा छोटय़ा घटकांमध्ये विभाजन झाले. काँटिनेंटल ऑइल (कोनोको), स्टँडर्ड ऑइल इंडियाना
(अॅमोको), स्टँडर्ड ऑफ कॅलिफोíनया (शेव्हरोन) अशा नव्या कंपन्या तयार झाल्या. जॉन रॉकफेलरकडे त्यांपकी प्रत्येकाचे समभाग होते. ते त्याने तसेच राखून ठेवले.
* खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?
अ) रॉकफेलरचे साम्राज्य शेवटपर्यंत तसेच राहिले.
ब) रॉककेलरचे मित्र प्रँट आणि रॉजर्स यांनी रॉकफेलरला मदत केली.
१) अ बरोबर २) ब बरोबर
३) अ व ब बरोबर ४) दोन्ही चूक
* खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे ?
अ) स्टँडर्स ऑइलमधील ऑइल विकायचे व त्यातून प्रचंड नफा कमवायचा व आपल्या कंपनीचे समभाग दुसऱ्या कंपन्यांना घेण्यास भाग पाडायचे ही रॉकफेलरची पद्धत होती.
ब) रॉकफेलरने आपला साथीदार रॉजर्सबरोबर पहिला तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारला.
१) अ बरोबर २) ब बरोबर ३) अ व ब बरोबर ४) दोन्ही चूक
* स्टँडर्ड ऑइलबाबत सर्वात मोठी भीती कोणती होती?
१) बाजारात एकाधिकारशाही निर्माण होण्याची.
२) तेलाचे भाव वाढण्याची
३) १ व २ दोन्ही बरोबर
४) १ व २ दोन्ही चूक
* खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?
अ) स्टँडर्ड ऑइल ट्रस्टचे समभाग शेवटी रॉकफेलरला विकावे लागले.
ब) इडा टारबेल नावाच्या एका कंपनीच्या मालकिणीने केलेल्या दाव्यामुळे स्टँडर्ड ऑइल कंपनीचे तुकडे झाले.
१) अ बरोबर २) ब बरोबर
३) अ व ब बरोबर ४) दोन्ही चूक
* खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे ?
अ) स्टँडर्ड अॅण्ड ऑइल ही कंपनी रशियातील होती.
ब) स्टँडर्ड अॅण्ड ऑइल या कंपनीची संपूर्ण मालकी रॉकफेलर यांच्याकडेच होती.
१) अ बरोबर २) ब बरोबर
३) अ व ब बरोबर ४) दोन्ही चूक
Passage :-
At this stage of civilisation, when many nations are brought in to close and vital contact for good and evil, it is essential, as never before, that their gross ignorance of one another should be diminished, that they should begin to understand a little of one anotherls historical experience and resulting mentality. It is the fault of the English to expect the people of other countries to react as they do, to political and international situations. Our genuine goodwill and good intentions are often brought to nothing, because we expect other people to be like us. This would be corrected if we knew the history, not necessarily in detail but in broad outlines, of the social and political conditions which have given to each nation its present character.
q According to the author of kMentalityl of a nation is mainly product of its…
1. History 2. International position
3. Politics 4. Present character
q The need for a greater understanding between nations…
1. Was always there
2. Is no longer there
3. Is more today than ever before
4.Will always be there
q The character of a nation is the result of its
1. Mentality
2. cultural heritage
3. Gross Ignorance
4. socio-political conditions
q According to the author his countrymen should
1. read the story of other nations
2. have a better understanding of other nations
3. not react to other actions
4. have vital contacts with other nations n
grpatil2020@gmail.com