यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षेच्या पूर्वपरीक्षेत अंतिम यादीत स्थान मिळविण्यासाठी पेपर २ हा मुख्य भूमिका बजावतो. पेपर २ मधील आकलन या घटकाचा त्यात सिंहाचा वाटा असतो. नवीन बदललेल्या अभ्यासक्रमानुसार राज्य सेवा पूर्वपरीक्षा २०१३मध्ये पेपर २ हा आयोगाचा पहिलाच प्रयोग होता. विद्यार्थ्यांनी या पेपरसाठी चांगली तयारी केली होती, मात्र प्रत्यक्षात काही विद्यार्थी मात्र गोंधळले होते, कारण आकलन या घटकावर जवळजवळ ५० टक्के प्रश्न विचारले गेले, जवळजवळ ८० टक्के विद्यार्थ्यांना वेळेचे नियोजन करण्यास अपयश आले. थोडक्यात परीक्षेच्या दृष्टीने आकलन हा महत्त्वाचा घटक आहे.
आकलन म्हणजे एखादी गोष्ट समजून त्यावर योग्य निर्णय घेणे. आकलन या घटकावर उताऱ्यांवर आधारित ५ ते ६ प्रश्न दिले असतात. आकलन या घटकावर दोन प्रकारचे उतारे असतात – आकलन (Comprehension) आणि इंग्रजी भाषेचे आकलनकौशल्य (English Language Comprehension ). इंग्रजी भाषेचे आकलनकौशल्य यांसाठी जो उतारा दिलेला असतो तो फक्त इंग्रजीत असतो, त्याचे मराठीत भाषांतर केलेले नसते. प्रशासकीय क्षेत्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांचे इंग्रजी भाषेचे ज्ञान तपासून पाहण्यासाठी हा उतारा असतो. साधारणत: याचा स्तर दहावी ते बारावी इयत्तेपर्यंत असतो. हे उतारे सरळ व सोपे असतात. त्यामुळे हा उतारा प्रथम सोडविण्याचा प्रयत्न करावा. कारण या ठिकाणी हक्काचे गुण प्राप्त करण्याची संधी असते.
परीक्षेमध्ये आकलनविषयक उतारे सोडवताना खालील मुद्दे लक्षात ठेवावेत-
* परीक्षा कक्षात प्रचंड मानसिक ताण असतो. त्यामुळे अनेकदा घाईघाईत माहिती असलेल्या गोष्टींतदेखील चुका होतात. जर विचार केला तर आकलन हा घटक असा आहे की जेथे अधिक गुण मिळविण्याची संधी असते. या घटकाच्या तयारीसाठी कोणत्याही पूर्वज्ञानाची आवश्यकता नसते. दिलेल्या उताऱ्यातून उत्तरांची निवड करायची असते. त्यामुळे सर्वप्रथम उताऱ्यांची संख्या किती आहे, लहान उतारे किती व मोठे उतारे किती आहेत, इंग्रजी उतारे किती आहेत हे पाहून वेळेचे नियोजन करावे.
* उतारा योग्य गतीने एकाग्र होऊन वाचावा. उतारा असा वाचावा की, तो पुन्हा वाचण्याची गरज पडणार नाही.
* उतारा वाचताना महत्त्वपूर्ण वाक्य पेन किंवा पेन्सिलने अधोरेखित करून ठेवावेत. उताऱ्यात लेखकाला काय मांडायचे आहे ते समजून घ्यावे.
* सर्वप्रथम उतारा वाचून नंतर प्रश्न सोडवावेत, की प्रश्न वाचून उतारा सोडवावा, याबाबत मतमतांतरे आहेत. आपला ज्या पद्धतीने सराव असेल व ज्या पद्धतीने वेळ वाचत असेल ती पद्धत स्वीकारावी, मात्र प्रश्न वाचून उतारा सोडविल्यास आपल्याला काय माहिती उताऱ्यातून जाणून घ्यावयाची आहे हे समजते व आपला वेळ वाचतो. तसेच प्रश्न वाचून घेतल्याने उतारा समजणे जास्त सोपे जाते.
* आकलनविषयक प्रश्नांना प्राधान्य द्यावे, की सामान्य मानसिक क्षमतेवरील प्रश्न आधी सोडवावेत, याही बाबतीत
विद्यार्थ्यांना संभ्रम असतो. त्यामुळे ज्यांना मानसिक क्षमता तसेच गणिती प्रक्रियेवरील प्रश्न यांवर गती नसेल
त्यांनी आकलनविषयक घटक सर्वप्रथम व अचूक सोडविण्याचा प्रयत्न करावा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा