प्रवीण चौगले

प्रस्तुत लेखामध्ये आपण सामान्य अध्ययन पेपर तीनमधील जैवविविधता आणि पर्यावरण या अभ्यासघटकावर चर्चा करणार आहोत. जगातल्या संपन्न जैवविविधता असलेल्या मोजक्याच प्रदेशांपैकी भारत एक आहे. सध्या भारतीय अर्थव्यवस्था जगात सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. परिणामी, भारतातील उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर मोठय़ा प्रमाणात होत असून याचा भारतातील पर्यावरण आणि जैवविविधतेवर नकारात्मक परिणाम होत आहे. याचबरोबर आधुनिकीकरणाच्या युगात नैसर्गिक साधनसंपत्तीवर मोठय़ा प्रमाणावर दबाव येत आहे. त्यात शहरीकरण, वाढत जाणारी लोकसंख्या, जंगलतोड, नष्ट होत चाललेले वन्यजीवांचे अधिवास, जैविक संपत्तीचा अमर्याद वापर यामुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे जैविक उत्पादने व साधन संपत्तीवर अवलंबून असलेली लोकसंख्या, तसेच एकूण जैवविविधतेच्या संपत्तीवर विपरीत परिणाम होत आहे. शाश्वत विकासाकडे वाटचाल करताना जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन वेळीच करणे गरजेचे आहे, अन्यथा भविष्यात खूप मोठयम पर्यावरणीय समस्यांना सामोरे जावे लागेल आणि याचे गंभीर परिणाम जैवविविधता आणि पर्यावरणावर होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर हा घटक अभ्यासावा लागणार आहे.

chemical manufacturing industries in india stock market share prices
क्षेत्र अभ्यास अजब रसायन बाजार
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
tripurari
लक्ष्य दिव्यांनी उजळले दगडूशेठ गणपती मंदिर! लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी पुणेकरांची गर्दी, पाहा सुंदर Video
sixth mass extinction earth currently experiencing a sixth mass extinction
पृथ्वीवरील बहुतेक जीवसृष्टी नष्ट होण्याच्या मार्गावर? काय सांगतो ‘सहाव्या महाविलोपना’चा सिद्धान्त?
review of ramachandra guha s speaking with nature book
दखल : मानवी भविष्यासाठी…
article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र :  राज्य सेवा मुख्य परीक्षा – मानवी हक्क विकासात्मक मुद्दे
Uran, air pollution Uran,temperature, humidity Uran,
हवा प्रदूषणाचा मुद्दा निवडणुकीतून गायब? उरणमधील वाढते हवा प्रदूषण, तापमान आणि आर्द्रतेचा नागरिकांच्या शरीरावर परिणाम

सर्वप्रथम आपण या घटकामध्ये नमूद असलेल्या मुद्दय़ांचा आढावा घेऊ. यात जैवविविधता आणि पर्यावरण यांचे संरक्षण, पर्यावरणीय प्रदूषण आणि ऱ्हास, पर्यावरणीय आघाताचे मूल्यमापन इत्यादी मुद्दे अभ्यासावे लागणार आहेत. पर्यावरण आणि जैवविविधतेच्या ऱ्हासासाठी जबाबदार असणारे घटक, जैवविविधतेला निर्माण झालेला धोका, पर्यावरणीय प्रदूषण, नदी प्रदूषण, हवा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण व यामुळे उत्पन्न झालेल्या समस्या, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जैवविविधता आणि पर्यावरण संरक्षणासाठी केल्या जाणाऱ्या विविध उपाययोजना, भारत सरकारमार्फत जैवविविधता आणि पर्यावरण संरक्षित करण्यासाठी संमत करण्यात आलेले विविध कायदे व त्यांची उपयुक्तता तसेच पर्यावरणासंबंधी करावयाचे पर्यावरणीय आघाताचे मूल्यमापन आणि ते का अनिवार्य करण्यात आलेले आहे, तसेच त्याची उपयुक्तता यासारख्या एकत्रित बाबींचा विचार करून या घटकाचे परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारे नियोजन करावे लागणार आहे. २०२१च्या मुख्य परीक्षेत या घटकावर पुढील प्रश्न विचारण्यात आले.

Q.  Explain the purpose of the Green Grid Initiative launched at World Leaders Summit of the COP 26  UN Climate Change Conference in Glasgow in November, 2021.  When was this idea first floated in the International Solar Alliance ( ISA)?

 Q.  Describe the key points of the revised Global Air Quality Guidelines ( AQGs)  recently released by the World Health Organisation ( WHO).  How are these different from its last update in 2005?  What changes in Indial s National Clean Air Programme are required to achieve these revised standards?

 Q. Describe the major outcomes of the 26 th session of the Conference of the Parties ( COP)  to the United Nations Framework Convention on Climate Change ( UNFCCC).  What are the commitments made by India in this conference?

या प्रश्नांची आपण थोडक्यात उकल करून घेऊ. हे प्रश्न विषयाच्या पारंपरिक ज्ञानापेक्षा या घटकाशी संबंधित चालू घडामोडींवर आधारित आहेत. सर्वप्रथम आपल्याला या घटकाचे मूलभूत ज्ञान असल्याखेरीज परीक्षेत गुण मिळविणे अवघड जाते हे ध्यानात घ्यावे. यातून या घटकाच्या पारंपरिक ज्ञानाची व्याप्ती अधिक विस्तृत आहे हे लक्षात येते. वरील प्रश्नांमध्ये संकल्पना, तसेच संबंधित कार्यक्रम आणि त्यापासून झालेला फायदा आणि त्यांची जैवविविधता आणि पर्यावरण यांचे संवर्धन करण्यासाठीची उपयुक्तता यांसारख्या बाबींचा प्रामुख्याने विचार केलेला दिसून येतो. या घटकाचे स्वरूप सायंटिफिक पद्धतीचे आहे आणि यात वेगवेगळय़ा प्रकारच्या संकल्पनांची मूलभूत माहिती व समकालीन घडामोडी यांचा मागोवा घेत राहणे गरजेचे आहे.

उपरोक्त प्रश्नामध्ये कार्बन क्रेडिट, स्वच्छ विकासप्रणाली आणि पर्यावरणीय आघात मूल्यमापन, UNFCC, आंतरराष्ट्रीय सौरऊर्जा आघाडी, जागतिक हवा गुणवत्ता निर्देशांक यांसारख्या संकल्पना, उपक्रम आणि यासोबत भारत सरकारमार्फत राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ  हवा कार्यक्रम यासारख्या उपाययोजना, याचबरोबर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत संस्था इत्यादींवर आधारित प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. उत्तरे अधिक समर्पक व नेमकेपणाने लिहिण्यासाठी हा घटक अभ्यासताना नोट्स तयार करणे आवश्यक ठरते.

या घटकासाठी आवश्यक संदर्भ साहित्याचा थोडक्यात आढावा घेऊ. प्रथम एन.सी.ई.आर.टी.ची पर्यावरणासंबंधित पुस्तके वाचावीत आणि बाजारात या घटकासाठी अनेक गाईडस्वरूपात पुस्तके उपलब्ध आहेत यातील कोणतेही एक पुस्तक जे सोप्या पद्धतीने या घटकाची माहिती देईल ते वाचावे, उदाहरणार्थ  TMH चे डी. आर. खुल्लर लिखित पर्यावरणाचे पुस्तक. तसेच ‘इंडिया इअर बुक’मधील पर्यावरणाचे प्रकरण याचाही अभ्यास करावा.

या घटकाचा चालू घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी इंग्रजी दैनिके, योजना, कुरुक्षेत्र आणि डाऊन टू अर्थ ही मासिके, तसेच पर्यावरण आणि वन मंत्रालय, जैवविविधता प्राधिकरण यांच्या संकेतस्थळांचा वापर करून माहिती संकलित करावी आणि सोबत भारत सरकारच्या आर्थिक पाहणी अहवालातील जागतिक तापमानवाढ आणि शाश्वत विकास हे प्रकरण अभ्यासावे.