प्रवीण चौगले
आजच्या लेखामध्ये आपण यूपीएससी मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर दोनमधील आंतरराष्ट्रीय संबंध या मुख्य अभ्यासघटकाशी संबंधित, भारताचे उर्वरित जगातील देशांशी असणारे संबंध थोडक्यात अभ्यासणार आहोत. हा घटक अधिक विस्तृत आहे, यामध्ये भारताचे पश्चिम आशिया, मध्य आशिया, आफ्रिका या प्रदेशातील देशांशी व आसियान यासारख्या प्रादेशिक गटाशी असणाऱ्या संबंधांचा थोडक्यात आढावा घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

उपरोक्त घटकांचे अध्ययन करताना संबंधित देश, प्रादेशिक व जागतिक गटांचे भारतासाठी महत्त्व, हे देश आर्थिक, लष्करी दृष्टीने सामथ्र्यशाली आहेत का? यातील काही देशांचे स्थान व्यूहात्मकदृष्टय़ा उपयुक्त आहे का? याबरोबर व्यापार, परदेशी गुंतवणूक, ऊर्जा सहकार्य, परदेशस्थ भारतीयांची उपस्थिती व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये संबंधित देश, प्रादेशिक व जागतिक गटाचे स्थान, विविध देशांशी भारताने केलेले करार व भूतकाळामध्ये काही देशांबरोबर झालेले सघंर्ष व त्यांचा परिणाम आदी बाबी विचारार्थ घ्याव्यात.

सर्वप्रथम आपण भारताचे पश्चिम आशियाई देशांबरोबर असणारे संबंध जाणून घेऊ. पश्चिम आशियातील प्रमुख देशांशी भारताचे अतिशय घनिष्ठ संबंध राहिले असून ते सतत वृद्धिंगत होताना दिसून येतात. भौगोलिक स्थान, धर्म आणि लोक चळवळी, व्यापारी संबंध तसेच अलिप्ततावादाची संकल्पना, लष्करी गटांना विरोध यासारखे महत्त्वाचे घटक भारताचे पश्चिम आशियाबरोबर संबंध घडविण्यात कारणीभूत झाले. हे संबंध व्यावहारिक ( Pragmatic) दिसून येतात. उदा. भारताचे इस्राइल व पॅलेस्टाईन व सौदी अरेबिया व इराण यांच्यासोबतचे संबंध व्यावहारिकता दर्शवतात. भारताला ऊर्जेची नितांत आवश्यकता आहे. पश्चिम आशियायी राष्ट्रे मुख्यत: तेल आणि वायूचा पुरवठा करणारी राष्ट्रे असून ती अर्थव्यवस्थेला साहाय्यभूत ठरू शकतात. भारताने या प्रदेशाशी संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने पश्चिमेकडे पाहा (Look West Policy) या धोरणाची आखणी केली आहे.

Q. The question of Indial s Energy security constitutes the most important part of Indial s economic progress. Analyze Indial s energy policy cooperation with West Asian Countries. (250 words) (2017).
सध्या प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यानंतर बहरीन, कतार, कुवेत, इराण आणि ओमानसह अन्य आखाती देशांमध्ये भारताविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. या देशांमधील भारताविरोधात संताप होणे ही चिंताजनक बाब मानली जाते. ही बाब ओळखून भारताकडून संबंधितांवर कारवाई करण्याचा प्रयत्न केला गेला. उपराष्ट्रपती हे कतार दौऱ्यावर होते. त्यांनी कतारच्या पंतप्रधानांशी यावर चर्चा केली.

आफ्रिका आणि भारत यांच्यामधील संबंधांना शेकडो वर्षांची परंपरा आहे. भारत आणि आफ्रिकेतील अनेक देश वसाहतवाद, वर्णद्वेष, वंशवाद याविरुद्धच्या ऐतिहासिक लढय़ाच्या समान पार्श्वभूमीने जोडले गेले आहेत. आफ्रिका खंडामध्ये उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा लाभ करून घेणे ही भारताची शीघ्रगतीने सुरू असलेल्या विकासाची गरज आहे. २१व्या शतकातील भारत आणि आफ्रिकेची भागीदारी बळकट करण्यासाठी शांतता, स्थिरता आणि सर्वागीण विकासासाठीचे प्रयत्न यांना चालना देण्यासाठी अनेक कार्यक्रम सुरू केले. यामध्ये आफ्रिकी नागरिकांना उच्चशिक्षणाच्या संधी, आफ्रिकेतील देशांसाठी कर्ज योजना, संयुक्त राष्ट्रांच्या मदतीने आफ्रिकेतील देशांमध्ये शांतता प्रक्रियेला हातभार लावणे इत्यादी बाबींचा समावेश होता. आफ्रिकेतील इतिहास, आर्थिक-तंत्रज्ञान विकास, राजकीय व्यवस्था, भाषा, धर्म अशा अनेक निकषांवर त्यांच्यात असणाऱ्या प्रचंड वैविध्यामुळे आफ्रिकेतील देशांशी द्विपक्षीय, बहुपक्षीय, क्षेत्रीय किंवा पूर्ण खंड म्हणून, अशा कोणत्याही पातळीवर संबंध प्रस्थापित करणे अतिशय कठीण आहे. मात्रIndia- Africa Forum Summit ( IAFS) यासारख्या संस्थांमुळे हे आता थोडे सोपे झाले आहे. भारताकडून, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान अशा उच्चपदस्थांकडून २९ आफ्रिकी देशांना भेट देण्यात आली आहे. मार्च २०१८ मध्ये आफ्रिकेत १८ नवीन दूतावास उघडण्याचा निर्णय भारताने घेतला होता. भारताने आफ्रिकेतील क्षेत्रीय आर्थिक समुदायांसोबत तीन बैठका घेतल्या आहेत. २००२ साली सुरू झालेल्या ‘फोकस आफ्रिका’ कार्यक्रमांतर्गत इतर आफ्रिकी देशांशी व्यापारी संबंध वाढवण्याच्या उद्दिष्टांना चांगलेच यश मिळाले आहे.

भारताचे आसियान संघटनेबरोबर गेल्या २० वर्षांपासून संवाद आणि शिखर परिषद भागीदारी निर्माण झाल्याचे तर दोन वर्षांपासून धोरणात्मक भागीदारी निर्माण झाल्याचे आढळते. १२ नोव्हेंबर २०१४ रोजी झालेल्या भारत-आसियान शिखर परिषदेमध्ये गेल्या २० वर्षांदरम्यान दोन्ही बाजूंनी आकाराला आलेल्या राजकीय आणि आर्थिक सहकार्याचे दर्शन झाले. भारत-आसियान यांदरम्यानच्या सहकार्यामध्ये पुढील बाबींचा समावेश होतो – व्यापार आणि गुंतवणूकविषयक करार, दहशतवाद विरोध, क्षमता उभारणी, सागरी सुरक्षा इ. भारताच्या ‘लुक ईस्ट’ धोरणामध्ये ‘अॅक्ट ईस्ट’वर भर दिल्याने आसियान (ASEAN) राष्ट्रांच्या नेत्यांनी स्वागत केले.

Q. Evaluate the economic and strategic dimensions of Indial s Look East Policy in the context of the post cold war international scenario. (2016).
भारतासाठी सामरिकदृष्टय़ा आणि साधनसंपत्तीच्या दृष्टीने मध्य आशियायी प्रदेशातील देशांबरोबरचे संबंध महत्त्वपूर्ण आहेत. भारत आणि मध्य आशिया यांच्यात अनादी काळापासून राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक संबंध आहेत. परंतु स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताची फाळणी आणि पाकिस्तानची निर्मिती यामुळे या प्रदेशाशी आपला प्रत्यक्ष संपर्क संपुष्टात आला; ज्याचा परिणाम आपल्या परस्परसंबंधांवरही झाला. मात्र गेल्या काही वर्षांत भारताने पुनश्च या प्रदेशातील देशांसोबत संबंध प्रस्थापित करण्यास सुरुवात केली. अलीकडे १२-१३ जानेवारी २०१९ रोजी उझबेकिस्तानातील समरकंद इथं ‘भारत- मध्य आशिया संवाद’ आयोजित केला गेला. हा बहुराष्ट्रीय संवाद भारत-मध्य आशिया संबंधांतील एक महत्त्वाचे पाऊल म्हणता येईल.
या घटकाच्या तयारीकरिता समकालीन घडामोडींचा मागोवा घेणे श्रेयस्कर ठरते. पंतप्रधानांचे विदेश दौरे, यामध्ये झालेले करार, शिखर परिषदा इ. बाबींची माहिती हवी. या घटकाच्या तयारीसाठी परराष्ट्र मंत्रालय व IDSAचे संकेतस्थळ, ‘इंडियन एक्स्प्रेस’ आदी वर्तमानपत्रे व ‘वल्र्ड फोकस’ हे नियतकालिक उपयुक्त ठरते.