श्रीकांत जाधव

आजच्या लेखामध्ये आपण ‘मध्ययुगीन भारत’ या घटकाची चर्चा करणार आहोत. या घटकावर २०११ ते २०२१ मध्ये एकूण २५ प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. इतिहासातील इतर घटकांच्या तुलनेत या घटकावर कमी प्रश्न विचारले जातात.

loksatta lokrang article
भारतीय संविधानातील भारतीयतेचा प्रश्न!
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
What Chhagan Bhujbal Said About Ajit Pawar
Chhagan Bhujbal : छगन भुजबळांचा अजित पवारांना सवाल, “ओबीसी समाजाचे प्रश्न निर्माण होतील तेव्हा संरक्षणाची ढाल…”
priyanka gandhi bag controversy
प्रियांका गांधींच्या संसदेतील बॅगेवरून नवा वाद; नेमकं प्रकरण काय?
Top Tech Technologies Launched in 2024 in Marathi
Top Technologies in 2024: आर्टिफिशियल इंटेलिजेंस ते सायबर सिक्युरिटी ‘या’ आहेत यंदाच्या टॉप १० टेक्नॉलॉजी
Dattatreya Jayanti 2024
Datta Jayanti 2024: एकमुखी ते त्रिमुखी दत्तमूर्ती; सिंधू संस्कृती, वेद ते गुरुचरित्र त्रिमूर्तीचा विकास कसा झाला?
Year Ender Best AI Advancements 2024
Top AI Developments 2024 : २०२४ मध्ये AI मध्ये कोणते पाच मोठे बदल दिसून आले?
Top 5 Gadgets Launched in 2024 in Marathi Best New Gadgets 2024
Year Ender 2024: चर्चा तर होणारच! ‘या’ हटके गॅजेट्सने गाजवले २०२४ वर्ष; पाहा टॉप ५ गॅजेट्स

अभ्यासाच्या दृष्टीने मध्ययुगीन कालखंडाची सुरुवात साधारणत: इ.स. ७५० पासून झाली असल्याचे मानले जाते. सुरुवातीचा कालखंड (इ.स. ७५०-१२०० पर्यंत) ह्य कालखंडाची महत्त्वाची दोन वैशिष्टय़े पाहावयास मिळतात. यातील पहिले म्हणजे भारतात सरंजामशाही स्वरूपाच्या राजकीय शासनव्यवस्थेचा उदय आणि दुसरे म्हणजे भारतात इस्लाम धर्माचे आगमन व सिंध प्रांतातून सुरू झालेली अरबांची व तुर्काची आक्रमणे होय. या कालखंडामध्ये भारताच्या विविध भागांमध्ये प्रादेशिक- राजकीय सत्तांचा उदय झालेला होता. उत्तर भारतामधील राजपूत सत्ता-प्रतिहार, परमार, चौहान व चंदेला; पूर्व भारतामध्ये पाल यांची सत्ता तसेच मध्य भारतात राष्ट्रकुट आणि दक्षिण भारतात चोल, चालुक्य इत्यादीच्या सत्ता होत्या.

यानंतरचा कालखंड हा दिल्ली सल्तनत व समकालीन प्रादेशिक सत्तांचा होता. दिल्ली सल्तनतीस  समकालीन असणाऱ्या सत्तांमध्ये देवगिरीचे यादव, होयसळ, काकतीय विजयनगर साम्राज्य, बहामनी राजघराणे तसेच काश्मीर, बंगाल, गुजरात या प्रांतांतील प्रादेशिक राजकीय सत्ता यांचा मुख्यत्वे समावेश होता.  दिल्ली सल्तनतीनंतर भारतात मुघल साम्राज्याची सत्ता स्थापन झालेली होती. या सत्तेला समकालीन असणाऱ्या सत्तांमध्ये राजस्थानमधील राजपूत सत्ता तसेच दक्खन भागातील आदिलशाही, निजामशाही व महाराष्ट्रातील मराठा साम्राज्य इत्यादीचा समावेश होतो. याचबरोबर मध्ययुगीन भारतात भक्ती चळवळ आणि सुफी चळवळ या दोन धार्मिक चळवळी अस्तित्वात आलेल्या होत्या आणि यांचा तत्कालीन समाजजीवनावर खूप मोठा प्रभाव पडलेला होता. तसेच यातील भक्ती चळवळ हिंदू धर्माशी संबंधित होती आणि सुफी चळवळ इस्लाम धर्माशी संबंधित होती. याव्यतिरिक्त शीख चळवळीच्या माध्यमातून शीख धर्माची स्थापना झालेली होती. जी गुरू नानक यांनी केलेली होती.

अशा पद्धतीने या घटकाचा अभ्यास करावा लागतो.

मागील परीक्षांतील प्रश्न

  • २०२१ मध्ये मध्ययुगीन भारताच्या इतिहासाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते एक अनुक्रम चढत्या आकाराच्या दृष्टीने योग्य आहे आणि यासाठी (अ) परगणा-सरकार-सुभा, (ब) सरकार-परगणा-सुभा, (क) सुभा-सरकार-परगणा आणि (ड) परगणा-सुभा-सरकार असे पर्याय देण्यात आलेले होते.

याव्यतिरिक्त दिल्ली सल्तनत, मध्ययुगीन कालखंडात भारतात आलेले परकीय प्रवासी यावर प्रश्न विचारण्यात आलेले होते.

  • २०२० मध्ये प्रतिहार, चोळ, व पाल या राजकीय सत्ता, त्याचबरोबर हुंडी हा हर्षोत्तर कालखंडामधील (Post Harsha Period) काय प्रकार होता हे प्रश्न विचारण्यात आलेले होते. हे प्रारंभिक मध्ययुगीन कालखंड याच्याशी संबंधित प्रश्न आहेत.
  • २०१९ मध्ये मुघलकालीन जहागीरदार आणि जमीनदार यांच्यात काय फरक होता; याचबरोबर दिल्ली सल्तनतमधील महसूल अधिकारी, इक्ता पद्धत, मीर बक्श व त्याचे कार्य इत्यादी वर प्रश्न विचारण्यात आलेले होते.
  • २०१८ मध्ये खालीलपैकी कोणत्या परकीय प्रवाशाने विस्तृतपणे भारतातील हिरे आणि हिऱ्यांच्या खाणी याविषयी चर्चा केलेली आहे? असा प्रश्न विचारलेला होता. त्यासाठी अनुक्रमे फ्रँकोइस बर्नियर, जीन बाप्टिस्टे टेवर्नियर, जेंन दी थेवेनोत व अब्बे बार्थलेमी कारे हे चार पर्याय देण्यात आलेले होते.
  • २०१७ मध्ये काकतीय राज्यामधील खालीलपैकी कोणते महत्त्वाचे बंदर (seaport) होते? असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. यासाठी काकिनाडा (Kakinada), मोतुपल्ली (Motupalli), मसुलीपत्तनम (Masulipatanam/Machalipatnam) व नेल्लुरू (Nelluru) असे चार पर्याय देण्यात आलेले होते.
  • २०१६ मध्ये मध्ययुगीन भारताच्या आर्थिक इतिहासासंदर्भात अराघत्ता (Araghatta) हे काय दर्शविते, असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. यासाठी – वेठबिगार, सैनिक, अधिकाऱ्यांना दिले जाणारे भूदान, जमीन सिंचनासाठी वापरले जाणारे जलचक्र आणि पडीक जमिनीचे सुपीक जमिनीमध्ये केले जाणारे रूपांतर असे चार पर्याय दिलेले होते.
  • २०१५ मध्ये बाबरच्या भारतातील आगमनामुळे काय झाले आणि यासाठी पर्याय होते – उपखंडामध्ये दारूगोळा वापरण्यास सुरुवात झाली, स्थापत्यकलेमध्ये कमान आणि घुमट बनवण्यास सुरुवात झाली आणि तैमूर राजवंशाची स्थापना करण्यात आली.
  • २०१४ मध्ये मध्ययुगीन भारतात महत्तर आणि पट्टीकल पदनाम कशाशी संबंधित होते? यासाठी पर्याय होते- सैनिक अधिकारी, ग्राम प्रमुख, वैदिक कर्मकांडामधील विशेषज्ञ आणि कारागीर श्रेणी प्रमुख असे चार पर्याय देण्यात आलेले होते.
  • २०१२ मध्ये सुफी चळवळीवर प्रश्न विचारण्यात आलेला होता. हा प्रश्न गूढ सुफीवाद पुढीलपैकी कोणत्या मार्गाचा पुरस्कार करणारे म्हणून ओळखले जातात आणि यासाठी ध्यान आणि श्वासावर नियंत्रण, एकांतात खडतर संन्याशी जीवन आणि धार्मिक गीताद्वारे श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणे, असे तीन पर्याय दिलेले होते.

उपरोक्त स्वरूपाचे प्रश्न या घटकावर विचारले जातात. साधारणत: या प्रश्नाचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ पद्धतीचे आहे. या घटकावर विचारण्यात येणाऱ्या प्रश्नावरून असे लक्षात येते की,हा घटक मुद्देनिहाय माहितीचे संकलन करून अभ्यासणे गरजेचे आहे; पण यासाठी सर्वप्रथम या घटकाचे मूलभूत ज्ञान असणे गरजेचे आहे. या घटकाची मूलभूत माहिती अभ्यासण्यासाठी सर्वप्रथम एनसीईआरटीच्या शालेय पुस्तकांचा आधार घ्यावा लागतो.

यामध्ये Our past part II इयत्ता ७ वी आणि इयत्ता १२ वीचे Themes in Indian History part- II ही दोन पुस्तके अभ्यासावी लागतात. त्यासोबतच सतीश चंद्र लिखित मध्ययुगीन भारतावरील जुने एनसीईआरटीचे पुस्तक वाचावे, जेणेकरून या घटकाची योग्य परीक्षाभिमुख तयारी आपणाला करता येते.

Story img Loader