यूपीएससी परीक्षेत देदीप्यमान यश प्राप्त केलेले आणि आज प्रशासनात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पेलत असलेले अधिकारी या परीक्षेला कसे सामोरे गेले, याचे दाखले देत यूपीएससीच्या तयारीचे केलेले मार्गदर्शन –

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भारतीय प्रशासकीय सेवेत मानाचे आणि उच्च स्थान असलेल्या आणि कुशाग्र बुद्धिमत्तेच्या अधिकाऱ्यांची निवड करणाऱ्या संघ लोकसेवा आयोगाच्या प्राथमिक परीक्षा, लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा अशा अत्यंत दिव्यातून होत असते. जिद्द, आत्मविश्वास आणि कठोर मेहनतीच्या जोरावर विद्यार्थी आपल्या बुद्धिमत्तेचा कस लावतात आणि यश खेचून आणतात. मागील वर्षी अमृतेश औरंगाबादकर देशात दहावा आणि राज्यात पहिला आला. या वर्षी कौस्तुभ दिवेगावकर देशात पंधरावा आणि राज्यात पहिला आला. पहिल्या दहांत आतापर्यंत राज्यातून भूषण गगराणी (गुणानुक्रमांक  ३), श्रावण हर्डीकर (गुणानुक्रमांक  ७), विशाल सोलंकी (गुणानुक्रमांक  ८), श्रीकर परदेशी (गुणानुक्रमांक  १०) आणि आता अमृतेश औरंगाबादकर (गुणानुक्रमांक  १०) आहे. राज्यातून जरी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा टक्का वाढला तरी गुणानुक्रमे पहिल्या २० मधील संख्या मात्र अद्याप कमीच आहे. या बाबतीत केरळ राज्याची प्रगती थक्क करणारी आहे आणि अनुकरणीय देखील. यंदा पहिल्या चारमध्ये तीनजण केरळचे आहेत. आपल्याकडे इच्छा आहे, मार्गदर्शक आहेत तरी आपली टक्केवारी का वाढत नाही, याचा अभ्यास वेगळा आहे. पण आहे त्या परिस्थितीत कठोर शिस्त आणि परिश्रम आणि योग्य मार्गदर्शन, चिकाटी आणि चिंतन, मनन आणि सराव या मंत्रांचा वापर करून यश मिळवता येते, हे वर नमूद अधिकारी वारंवार सांगतात.
या परीक्षांची तयारी करताना अनेक मार्गाने यश आणता येते, हे लक्षात घायला हवे. नोकरी करून अभ्यास होतो का, आधी राज्यसेवा द्यावी का, भाषा कोणती निवडावी आणि अभ्यास कसा करावा, या प्रश्नांचा ऊहापोह या लेखात केला आहे.
अमृतेश हा मूळचा पुण्यातील राहणारा. त्याने फग्र्युसन महाविद्यालयातून अर्थशास्त्र या विषयात पदवी घेतली आहे. मोठय़ा बहिणीचा आदर्श घेऊन त्याने यूपीएससीची परीक्षा देण्याचे निश्चित केले आणि पहिल्याच प्रयत्नात अवघ्या २१व्या वर्षी तो यूपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला. त्याने अभ्यास, सातत्य, मनन, चिंतन आणि सराव या पद्धतीवर भर दिला आहे. यूपीएससी करण्याचा निर्णय जरी त्याने बारावीत घेतला असला, तरी त्याची तयारी २००९ पासून करायला सुरुवात केली. कला शाखेचा विद्यार्थी असल्यामुळे त्याला अवांतर वाचनाला जास्त वेळ मिळाला. त्यात अभ्यासक्रमाचे भाग केले. त्यासाठी विशिष्ट लक्ष्य ठेवले. प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी स्वत:चे व्यक्तिमत्त्व आणि विचार करण्याची पद्धत स्पष्ट ठेवावी लागते. अधिकारी बनताना त्याच्यात आवश्यक ठरणारी अचूकता, अतिशय स्वच्छपणे व्यक्त होण्याची ताकद आणि मला जे बोलायचे आहे तेच दुसऱ्यापर्यंत पोचवणे या व्यक्तिमत्त्व विकासाच्या बाबींवर त्याने जास्त विचार केला, असेही तो सांगतो.
यूपीएससीच्या २०१२च्या परीक्षेत देशात १५वा आणि एमपीएससीत प्रथम क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केलेल्या कौस्तुभ दिवेगावकरला नियमित अभ्यास, वाचनाची आवड, स्वत: नोट्स काढण्याची सवय आणि मराठी भाषेतील गती यामुळे या परीक्षेत यश मिळणे सोईचे झाले. इयत्ता बारावीमध्ये मराठी भाषा विषयात सर्वाधिक गुण मिळाल्यामुळे कला शाखेत प्रवेश घेऊन मराठी विषयात पदवी संपादन केली. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त  विद्यापीठाचा पदवी अभ्यासक्रम चांगला असल्याचे जाणवल्याने बी.ए.साठी याच विद्यापीठाची निवड केली. शिवाय इथला अभ्यासक्रम यूपीएससीशी सुसंगत असल्याचे दिसून आले. दूरशिक्षण पद्धतीमुळे मुक्त विद्यापीठात शिक्षण घेताना यूपीएससी परीक्षेचा अभ्यास करणेही शक्य झाले. कौस्तुभने यूपीएससीच्या परीक्षेबरोबर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या, बँकेच्या आणि स्टाफ सिलेक्शन कमिशनच्याही परीक्षा दिल्या होत्या, हे तो आवर्जून सांगतो. अमृतेशने मात्र फक्त आणि फक्त यूपीएससीच्या परीक्षेची तयारी केली. बहिणीचे सखोल मार्गदर्शनाचा सदुपयोग, कठोर परिश्रम आणि शिस्त या जोरावर तो यशस्वी झाला.
यूपीएससी आणि इतर पर्याय
इथे काही गोष्टी आपण लक्षात ठेवायला हव्यात. अनेकदा असे होते की, आपल्या मार्गदर्शनाचा स्रोत असला तरी बऱ्याचदा सुयोग्य नियोजनाचा अभाव, आळस (शॉर्ट कट- जसे नोट्स) किंवा फक्त मार्गदर्शकावर/ क्लासवर भिस्त यामुळेही अपयश येत असते. आता यूपीएससीच्या अभ्यासाची खोली, व्याप्ती आणि स्पर्धा इतकी वाढली आहे की, कोणताही क्लास किंवा नोट्स हे पूर्णपणे पूरक ठरत नाही. अजूनही एक मेंटर आणि स्वयंशिस्तीत राबविलेले नियोजन हेच यशस्वी ठरू शकते. ज्यांना असे मेंटर मिळाले असतील व घरातून किंवा स्वत:हून भक्कम मानसिक आणि आíथक पाठिंबा असेल तर पहिल्यांदा यूपीएससीचा एक तरी प्रयत्न करावा. पण जर आपण स्वत:हून असे प्रयत्न करणार असू आणि लगेच नोकरी मिळणे गरजेचे असेल तर नक्की इतर सर्व परीक्षा अभ्यास करून आणि अगदी निश्चयपूर्वक इतर नोकरी मिळवा आणि मग आयएएसचा ध्यास धरा. पर्यायी प्लान म्हणून राज्यसेवा, एसटीआय, मंत्रालय सहायक, बँक ढड किंवा स्टाफ सिलेक्शन परीक्षा नक्की द्याव्यात. प्रशांत पाटील, राहुरीचे शिवप्रसाद नकाते हे सध्या आयएएस असलेले अधिकारी आधी राज्यसेवेत होते .अगदी आयएएस नाही मिळाले तरी कोणते तरी पद मिळाले तरी मग पुढे लढता येते. क ौस्तुभने हा मार्ग धरला होता, पण शेवटी त्याने आयएएसपदाला गवसणी घातलीच. या वर्षीची यूपीएससी सीएसई परीक्षेत प्रथम आलेल्या केरळच्या हरीथा यादेखील आधी आयआरएस होत्या, पण त्यांनी निश्चयपूर्वक प्रयत्न केले आणि आयएएस हे पद मिळाले. इतर खासगी नोकरी सांभाळून किंवा सोडून या परीक्षेचा अभ्यास करणारेही अनेक आहेत. शैलेश बलकवडे (गुणानुक्रमांक  १६६- २००९, आयपीएस), रवींद्र बिनावाडेने (गुणानुक्रमांक  ३०- २०११, आयएएस) नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर या स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. किरण गीते (गुणानुक्रमांक  ८९- २००४), अजय कुमार (गुणानुक्रमांक  १३५- २०१२) यांनी तर खासगी नोकरी सांभाळून आयएएसपद मिळवले. इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत उशिरा निर्णय घेणे, अभ्यास कमी होणे किंवा अन्य कुठलाच नकारात्मक विचार मनात येऊ दिला नाही. रवींद्रला यश चौथ्या आणि अजयला दुसऱ्या प्रयत्नात आयएएसपद मिळाले. त्याला पहिल्या प्रयत्नात आयपीएस मिळाले होते.
भाषा
परीक्षेची भाषा हा एक विषय सध्या परीक्षार्थीच्या मनात घोळत असतो. कौस्तुभचे उज्ज्वल यश पाहून मराठीतून अभ्यास करण्याऱ्याना हुरूप आलेला आहे. मराठीतून आयएएसची तयारी करून झालेले अधिकारी पाहा, पण त्यांची अभ्यास पद्धती समजून घ्या. अजूनही मराठीतून उत्तम अभ्यास साहित्य उपलब्ध नाही. मासिकेही त्या दर्जाची नाहीत. तरी आहे त्यांचा आधी अभ्यास करावा आणी मग मुक्त विद्यापीठ (यशवंतराव आणि इंदिरा गांधी) यांची पुस्तके वाचावी. एनसीईआरटीच्या पुस्तकांना पर्याय नाही. आघाडीच्या वृत्तपत्रांचे वाचन करावे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सराव परीक्षा नक्की द्या. नोकरी असेल, गावात मार्गदर्शन नसेल तर पोस्टल टेस्ट सीरिज महत्त्वाचे ठरतात. पण त्या टेस्ट सीरिज यूपीएससीच्या दर्जाच्या जवळपास असाव्यात आणि तज्ज्ञ अध्यापकांनी फीडबॅक दिलेला असावा.
 फाऊंडेशन आणि नवीन वेळापत्रक
नवीन वेळापत्रकनुसार आता यूपीएससी सीएसई प्रीलिम्स ऑगस्टमध्ये आणि मुख्य परीक्षा डिसेंबरमध्ये होणार आहे. आत्तापर्यंत मेमध्ये पूर्व परीक्षा देऊन मग मुख्य परीक्षेची तयारी करणे शक्य होते. आता मात्र हे शक्य होणार नाही आहे. त्यामुळे नवीन नियोजन आणि त्यानुसार संपूर्ण अभ्यास करणे अनिवार्य आहेच. पदवीनंतर अभ्यास करायला सुरुवात करण्यापेक्षा बारावीनंतर अभ्यास करणे गरजेचे आहे. पण अभ्यास नक्की काय करावा हेही ठरवून घ्यावे. एनसीईआरटी पुस्तकांचे संपूर्ण वाचन, मनन, चिंतन सोबत वृत्तपत्र/पुस्तके/ लेख वाचण्याची सवय, बठक लावून अभ्यास करणे, वाचन वेग, अक्षर आणि लिखाण वेग वाढवणे हे शक्य आहे. अभ्यासाबद्दल आपल्या पुस्तकात अमृतेश म्हणतो, स्वत:ला ओळखा, समाजाला ओळखा आणि व्यवस्थेला ओळखा. या तीनही बाबी आपल्या अभ्यासाची तयारी करताना लक्षात घ्याव्यात. भारतीय स्वातंत्र्य दिवस साजरा करताना देशसेवेत रुजू होण्यासाठी लगेच नियोजनाला सुरुवात करा आणि उज्ज्वल यश मिळवा.                               