सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांना आता टपाल विभागात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय टपाल विभागाकडून तेलंगणा सर्कलमधील क्लर्क आणि पोस्टमन यासह विविध पदांसाठी बंपर भरती जाहीर करण्यात आल्या आहेत. एकूण ५५ पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. टपाल विभागाने मल्टी टास्किंग स्टाफ, लोअर डिव्हिजन क्लर्क, पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन/मेल गार्ड या पदांसाठी भरती सुरू करण्यात येणार आहे. दरम्यान या भरतीची जाहिरात ही रोजगार वृत्तपत्रात प्रकाशित करण्यात आली आहे. ही भरती क्रीडा कोट्याअंतर्गत केली जात आहे.

टपाल विभागात भरती होण्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ सप्टेंबर २०२१ असून यासाठी https://tsposts.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. टपाल विभागात १०वी आणि १२वी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनी सरकारी नोकरीची ही मोठी संधी आहे.

तेलंगणा पोस्ट ऑफिस भरती रिक्त जागा

पोस्टल असिस्टंट – ११ पदे

सॉर्टिंग असिस्टेंट – ०८ पदे

पोस्टमन – २६ पदे

एमटीएस- १० पदे

भरती करिता आवश्यक शैक्षणिक पात्रता

पोस्टल/सॉर्टिंग असिस्टेंट या पदाकरिता उमेदवारांना कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

पोस्टमन या पदाकरिता उमेदवारांना कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराने १० वीच्या वर्गात तेलगू भाषेचा अभ्यास केला पाहिजे. किमान तीन वर्षांचे वाहन चालविण्याचा परवाना देखील असावा.

एमटीएस या पदाकरिता १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.त्या उमेदवाराला तेलगू भाषा येणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

१८ ते २७ वयवर्षे असलेल्या वरच्या वयोमर्यादे मध्ये ओबीसी असलेले उमेदवारांना तीन वर्षे आणि एससी/एसटी असलेले उमेदवारांना पाच वर्षे सूट असणार आहे. तसेच एमटीएस पदासाठी १८ ते २५ वर्षे वयोमर्यादा आहे.