आर्थिक घोटाळ्यांचा पर्दाफाश करणाऱ्या ‘फॉरेन्सिक अकाऊंटिंग’ या अनोख्या क्षेत्राची ओळख-
वर्तमानपत्रात कोळसा, थ्रीजी, कॉमनवेल्थ, आदर्श, सिंचन असे नवनवीन घोटाळे उघडकीस आले की सुन्न व्हायला होते, भ्रष्टाचारासमोर प्रशासनाला हतबल होताना पाहिले की हे घोटाळे म्हणजे देशासमोरील मोठी आपत्ती भासू लागते. याला आळा घालण्यासाठी फॉरेन्सिक अकाऊंटिंग हे क्षेत्र उदयाला आले आहे. अकाऊंटिंग, तंत्रज्ञान आणि तपासकार्य अशी सर्व प्रकारची कौशल्ये एकत्रितरीत्या उपयोगात आणून न्यायालयात सादर करता येईल असा ठोस पुरावा शोधणे वा मिळवणे म्हणजे ‘फॉरेन्सिक अकाऊंटिंग’.
इंडिया फॉरेन्सिक सेंटर ऑफ स्टडीज या पुण्यातील संस्थेने केलेल्या पाहणीनुसार येत्या तीन वर्षांत हजारो फॉरेन्सिक अकाऊंटंट्सची गरज आपल्याला भासणार आहे. सत्यमचा घोटाळा २००९ मध्ये उघडकीस आला आणि अवघा देश आíथक घोटाळय़ांबद्दल बोलू लागला. वृत्तपत्रांमधून अनेक नवीन कंपन्यांची नावे सत्यमचे वारसदार म्हणून जाहीर व्हायला लागली आणि मग सुरू झाले ते आíथक घोटाळ्यांचा विरोधातील एक नवीन पर्व. कॉर्पोरेट जगतातील या महाघोटाळ्याने इतर कंपन्यांना या गोष्टीची पूर्ण जाणीव झाली, आíथक गुन्हे कंपनीला खूप मोठे नुकसान करू शकतात. अनेक कंपन्या या नवीन समस्येशी लढण्याकरिता सरसावल्या. पण या लढाईत लढणाऱ्या शिलेदारांची ताकद कमी पडू लागली. अकाऊंटिंग म्हणल्यावर पहिले डोळ्यासमोर येतात, ते सनदी लेखापाल. त्यामुळे कोणी सनदी लेखापालांकडे धाव घेतली तर कोणी फौजी अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. आज अनेक चार्टर्ड अकाऊंटंट फॉरेन्सिक अकाऊंटंट म्हणून काम करीत आहेत, पण या क्षेत्रात येण्यासाठी चार्टर्ड अकाऊंटंट असणे बंधनकारक नाही. त्यासाठी अकाऊंट्सचे सखोल ज्ञान, न्यायव्यवस्थेचे ज्ञान (छीॠं’ टं३३ी१२), तंत्रज्ञानाची माहिती, अन्वेषणाचा दृष्टिकोन (कल्ल५ी२३्रॠं३्र५ी र‘्र’’२) इत्यादी गुण अंगभूत असलेली कुणीही व्यक्ती या क्षेत्रात प्रवेश करू शकते. शोधाचा ध्यास घेण्याची वृत्ती मात्र हवी!  फोरेन्सिक अकाऊंटिंग या विषयावर प्रशिक्षण देणारा ‘सर्टिफाइड फॉरेन्सिक अकाऊंटिंग प्रोफेशनल’ हा देशामधील एकमेव व्यावसायिक अभ्यासक्रम आहे.  हा अभ्यासक्रम सध्या फ्रौडेक्स्प्रेस या संस्थेद्वारे संचालित केला जातो.
व्यावसायिक अभ्यासक्रमाचेी७३ील्ल२्रल्ल म्हणता येईल असा हा पर्याय आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करायला तीन वर्षांचा अनुभव आíथक क्षेत्रात असणे आवश्यक आहे. अननुभवी विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात. या क्षेत्रात व्यावसायिक शिक्षण घेतलेल्या उमेदवारांची मागणी सतत वाढत आहे. इंडिया फॉरेन्सिक सेंटर ऑफ स्टडीज या पुण्यातील संस्थेने केलेल्या पाहणीनुसार येत्या तीन वर्षांत  हजारो फॉरेन्सिक अकाऊंटंट्सची गरज आपल्याला भासणार आहे.  
सनदी लेखापाल (उँं१३ी१ी िअूू४ल्ल३ंल्ल३) जेव्हा हिशेबाच्या पुस्तकांचे परीक्षण करतो, तेव्हा अत्यंत वित्तीय गरव्यवहार आढळल्यास त्याच्या मुळाशी जाणे ही त्याची जबाबदारी असते, आíथक घोटाळे शोधण्यासाठी जे  हिशेबाच्या पुस्तकांचे परीक्षण केले जाते, त्याला फोरेन्सिक अकाऊंटिंग म्हणले जाते. ‘फॉरेन्सिक अकाऊंटंट’ आकडय़ांचा पुढे जातो व लेखापरीक्षणाच्या कक्षेबाहेरील बाबींचा शोध घेतो. फॉरेन्सिक अकाऊंटिंगमध्ये हिशाबाचे दंडक व धोरणे यांवर कमी भर असतो; परंतु वित्तीय गरव्यवहारांची कुठलीही शक्यता पडताळून ती उघड करण्याकडे संपूर्ण जोर असतो.
या क्षेत्राला भारतात दिवसेंदिवस मागणी वाढतच आहे. वित्तीय संस्था, बँका, विमा संस्था, रीटेल, टेलिकॉम अशा अनेक ठिकाणी फॉरेन्सिक अकाऊंटिंगमधील तज्ज्ञांची सध्या गरज भासत आहे. आज भारतातल्या प्रत्येक खासगी बँकेमध्ये ‘फ्रॉड कंट्रोल’ नावाचा वेगळा विभाग आहे, जो केवळ संशयास्पद व्यवहार, आíथक घोटाळे शोधणे आणि थांबवणे अशा पद्धतीची काम करतो, अनेक कंपन्यांमध्ये इंटर्नल ऑडिट विभाग पण फॉरेन्सिक अकाऊंटिंगचे काम करू लागले आहेत. पण असं असून पण भारतीय बँकांमध्ये गेल्या दहा वर्षांत आíथक घोटाळे लक्षणीय प्रमाणात वाढले आहेत, सप्टेंबर २००९ मध्ये रिझर्व बँकेने एक पत्रक काढून सर्व बँकांना खडे बोल सुनावले आहेत, की आता आíथक घोटाळे थांबवण्यासाठी फॉरेन्सिक अकाऊंटिंग मधल्या तज्ज्ञांची मदत घ्यायला लागा. आतापर्यंत चालू असलेले प्रयत्न जास्तीत जास्त शास्त्रशुद्ध करायचा प्रयत्न करा.
गरव्यवहाराचा शोध व अटकाव अशा स्वरूपाचे हे क्षेत्र अत्यंत थरार असलेले आहे. यात प्रसंगी पोलिस खात्याची पण मदत घ्यावी लागते. पुराव्यांचा आधार घेत घेत गरव्यवहाराच्या मुळाशी जाण्याची ही प्रक्रिया आहे. काळासोबत नवनवीन घोटाळ्यांच्या पद्धती जन्माला येऊन फॉरेन्सिक अकाऊंटंट्सना कामाचा तुटवडा भासणार नाही, हे निश्चित.
नेहमीच्या वाटा न चोखाळता स्वत:च्या अनुभवांची पायवाट करून आपले उद्दिष्ट गाठायचे असेल, तर ‘फॉरेन्सिक अकाऊंटिंग’चे क्षेत्र विद्यार्थ्यांसाठी खुले आहे!            ल्ल
               

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा