टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्स
टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्स ही सामाजिक शास्त्रांशी निगडित शिक्षण-प्रशिक्षण देणारी देशातील महत्त्वाची संस्था आहे. या संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला आहे. पदव्युत्तर शिक्षण देण्यासाठी या संस्थेच्या सहा वैशिष्टय़पूर्ण संस्था आणि चार स्वतंत्र केंद्रे आहेत. त्यामार्फत जागतिक स्तराचे विविध पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम या संस्थेत उपलब्ध आहेत. त्याशिवाय एम.फिल आणि पीएच.डी करण्याचीही सोय संस्थेतर्फे उपलब्ध करून देण्यात येते.
या संस्थेमार्फत पुढील अभ्यासक्रम करता येतात –
६ पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्रॅम इन सोशल वर्क
६ पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्रॅम इन सोशल वर्क इन डिसअॅबिलिटी स्टडीज अँड अॅक्शन
६ पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्रॅम इन डेव्हलपमेंट स्टडीज
६ पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्रॅम इन एज्युकेशन- एलिमेंट्री
६ पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्रॅम इन वुमन्स स्टडीज
६ पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्रॅम इनह्य़ुमन रिसोर्स मॅनेजमेंट अँड लेबर स्टडीज
६ पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्रॅम इन सोशल एन्टरप्रिन्युरशिप
६ पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्रॅम इन ग्लोबलायझेशन अँड लेबर
६ पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्रॅम इन हेल्थ अॅडमिनिस्ट्रेशन
६ पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्रॅम इन हॉस्पिटल अॅडमिनिस्ट्रेशन
६ पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्रॅम इन पब्लिक हेल्थ इन, हेल्थ पॉलिसी, इकानॉमिक्स अँड फायनान्स
६ पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्रॅम इन पब्लिक हेल्थ इन सोशल एपिडेमिलॉजी
६ पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्रॅम इन हॅबिटॅट अँड प्रॅक्टिस
६ पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्रॅम इन डिझास्टर मॅनेजमेंट
६ पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्रॅम इन मीडिआ अँड कल्चर
या सर्व अभ्यासक्रमांना राष्ट्रीय स्तरावरील लेखी परीक्षेद्वारे प्रवेश दिला जातो. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी.
पत्ता- टाटा इन्स्टिटय़ूट ऑॅफ सोशल सायन्स, व्ही. एन. पुरव मार्ग, देवनार, मुंबई- ४०००८८
ईमेल- pgadmission@tiss.edu
वेबसाईट- www.tiss.edu
राजीव गांधी नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ युथ डेव्हलपमेंट
राजीव गांधी नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ युथ डेव्हलपमेंट या संस्थेची स्थापना केंद्र सरकारने केली असून सध्या ही संस्था केंद्रीय युवक कल्याण आणि खेळ मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे. या संस्थेला केंद्र सरकारने ‘इन्स्टिटय़ूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स’चा दर्जा दिला आहे. युवकांचा सर्वागीण विकास हे या संस्थेचं मूळ ध्येय आहे.
त्याअनुषंगाने संस्थेने काही अभ्यासक्रम सुरू केले आहेत. ते पुढीलप्रमाणे आहेत –
६ मास्टर ऑफ आर्ट्स इन यूथ एम्पॉवरमेंट.
६ मास्टर ऑफ आर्ट्स इन लाइफ स्कील एज्युकेशन.
६ मास्टर ऑफ आर्ट्स इन लोकल गव्हर्नन्स
६ मास्टर ऑफ आर्ट इन करिअर कौन्सेिलग.
६ मास्टर ऑफ आर्ट्स इन जेन्डर स्टडीज
मास्टर ऑफ आर्ट्स इन डेव्हलपमेन्ट प्रॅक्टिस.
स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने हे अभ्यासक्रम उपयुक्त ठरू शकतात. अशा प्रकारचे अभ्यासक्रम पहिल्यांदाच आपल्या देशात सुरू करण्यात आले आहेत. या संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाला आहे.
ही संस्था चेन्नईपासून ४० किलोमीटरवर श्रीपेरम्बदूर येथे वसली आहे. या संस्थेत सर्व अत्याधुनिक शैक्षणिक सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र होस्टेलची व्यवस्थासुद्धा आहे. शहरामध्ये जाण्या-येण्यासाठी संस्थेची स्वत:ची बस आहे.
अर्हता- संस्थेच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही विद्याशाखेतील पदवी घेतलेली असावी. उमेदवारांनी या परीक्षेत किमान ४५ टक्के गुण संपादन करणं आवश्यक आहे.
या अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांचे प्रवेश हे प्रवेशपरीक्षा आणि मुलाखतीद्वारे केले जातात. तसेच पदवी परीक्षेत मिळालेले गुणही विचारात घेतले जातात. शासकीय नियमानुसार राखीव जागा ठेवण्यात येतात. मुंबईस्थित टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्स या संस्थेच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या संस्थेच्या अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेशासाठीची प्रवेशपरीक्षा द्यावी लागत नाही. असे विद्यार्थी थेट मुलाखतीसाठी पात्र समजले जातात.
अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या काही विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार शिष्यवृत्ती दिली जाते. आंतरराष्ट्रीय युवा विकास कार्यक्रमांमध्ये संस्थेच्या विद्यार्थ्यांना पाठवण्यात येते. व्यावसायिक क्षमता आणि कौशल्याचा विकास करण्यावर या अभ्यासक्रमांमध्ये भर दिला जातो. ‘प्लेसमेन्ट सेल’द्वारे संस्थेच्या विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम करिअरच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सर्व प्रकारचे साहाय्य केले जाते. विषयानुरूप विविध कार्यशाळा सातत्याने आयोजित केल्या जातात. प्रयोगात्मक शिक्षण, विश्लेषणात्मक दूरदृष्टी या बाबींचा विकास होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात.
प्रत्येक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी स्वतंत्र अर्ज भरावा लागतो. प्रवेशपरीक्षेत चालू घडामोडी, सामान्य इंग्रजी, युवक विकास या विषयांवर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातात. कालावधी- दोन तास.
परीक्षेची केंद्रे- नवी दिल्ली, पुणे, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू.
पत्ता- द रजिस्ट्रार, राजीव गांधी नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ युथ डेव्हलपमेंट, मिनिस्ट्री ऑफ यूथ अफेअर्स अॅॅण्ड स्पोर्ट्स गव्हर्नमेन्ट ऑफ इंडिया, श्रीपेरम्बदूर- ६०२१०५, तामिळनाडू.
ईमेल- app@rgniyd gov.in
वेबसाइट- www.rgniyd.gov.in
इंदिरा गांधी इन्स्टिटय़ूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च
मुंबई येथील इंदिरा गांधी इन्स्टिटय़ूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च ही संस्था अर्थकारण आणि विकास या विषयातील उच्च अभ्यासक्रम आणि संशोधनाची संधी देणारी आपल्या देशातील महत्त्वाची संस्था आहे. या संस्थेमार्फत पुढील अभ्यासक्रम चालविण्यात येतात-
६ मास्टर ऑफ सायन्स इन इकॉनॉमिक्स (एम.एस्सी- इकॉनॉमिक्स).
अर्हता : बी.ए/ बी.एस्सी (इकॉनॉमिक्स) बी.कॉम/ बी.स्टॅट/ बी.एस्सी (भौतिकशास्त्र किंवा गणित)/ बी.टेक, बी.ई. यापकी कोणताही पदवी प्राप्त केलेली असावी. अर्थशास्त्र हा विषय घेऊन पदवी घेतलेल्या उमेदवारांना ५५ टक्के आणि इतरांना ६० टक्के गुण मिळायला हवेत. पदवीप्राप्त उमेदवारांनी किमान बारावीपर्यंत गणिताचा अभ्यास केलेला असणे अपेक्षित आहे.
६ एम.फिल/ पी.एच.डी. इन डेव्हलपमेंट स्टडीज : विकास ही संकल्पना अंतर्भूत असलेल्या अर्थशास्त्रातील संशोधन करण्याची संधी या अभ्यासक्रमाद्वारे प्राप्त होते. हा आंतरशाखीय (इंटर डिसिप्लनरी) अभ्यासक्रम आहे. कालावधी दोन वर्षे / पी.एच.डी.चा कालावधी चार वर्षे.
अर्हता : एम.ए./ एम.एस्सी (इकॉनॉमिक्स)/ एम.स्टॅट. दोन्ही अभ्यासक्रमांच्या निवडीसाठी लेखी परीक्षा व मुलाखत घेतल्या जातील. ही परीक्षा भोपाळ, बंगळुरू, अहमदाबाद, नवी दिल्ली, कोलकता, रायपूर, जयपूर आणि मुंबई या केंद्रांवर घेतली जाईल. मुलाखती मुंबई येथे घेतल्या जातील. मुलाखतीसाठी बोलवण्यात आलेल्या उमेदवारांना रेल्वेचे जाण्या-येण्याचे दुसऱ्या वर्गाचे भाडे देण्यात येईल.
पत्ता- द रजिस्ट्रार, इंदिरा गांधी इन्स्टिटय़ूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च, जनरल ए. के. वैद्य मार्ग, गोरेगाव पूर्व, मुंबई-४०००६५.
मेल- registrar@igidr.ac.in
वेबसाइट- www.igidr. ac.in
जिंदाल स्कूल ऑफ इंटरनॅशनल अफेअर्स
जिंदाल स्कूल ऑफ इंटरनॅशनल अफेअर्स या संस्थेच्या
ओ. पी. जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटीने मास्टर ऑफ आर्ट्स इन डिप्लोमॅसी, लॉ अँड बिझनेस हा दोन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. अर्हता- कोणत्याही
विषयातील पदवी. या अभ्यासक्रमाला ऑनलॉइन परीक्षेद्वारे प्रवेश दिला जातो.
या अभ्यासक्रमामध्ये आंतरराष्ट्रीय संघर्ष, मानवी हक्क, मानवीय साहाय्यता, आíथक विकास, आंतरराष्ट्रीय न्याय प्रणाली, राजकीय आणि आíथक धोक्यांचं विश्लेषण यांसारख्या विषयांचं ज्ञान उमेदवारांना मिळू शकतं. हा अभ्यासक्रम करणाऱ्या उमेदवारांना संयुक्त राष्ट्रसंघ, आंतरशासकीय संस्था, परराष्ट्र व्यवहार आणि व्यूहनीती विचार प्रक्रिया केंद्र, बहुराष्ट्रीय महामंडळे, आंतरराष्ट्रीय सहाय्यता संस्था, जगातील प्रमुख स्वंयसेवी संस्था यामध्ये काम करण्याची संधी मिळू शकते.
पत्ता- अॅडमिशन अँड स्टुडंट आऊटरिच सेल, सोनिपत- नरेला रोड, जगदीशपूर व्हिलेज, सोनपत, हरयाणा- १३१००१
ईमेल-admissions.jsia@gmail.com
वेबसाइट- www.jug.edu.in
अझिम प्रेमजी युनिव्हसिर्टी
अझिम प्रेमजी युनिव्हर्सिटीने मास्टर ऑफ आर्ट्स इन डेव्हलपमेंट हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. सामाजिक क्षेत्राशी निगडित उद्योजकता निर्मितीसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरणारा आहे. विकास प्रक्रियेच्या परस्परसंबंधित विविध बाजू समजूनउमजून घेण्याच्या दृष्टीने हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरणारा आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी- दोन वष्रे. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. या क्षेत्रातील अनुभव असल्यास प्रवेशाच्या वेळी प्राधान्य दिले जाते.
वेबसाइट : http://www.azimpremjiuniversity.edu.in/student-admission.html
मेल- admissions@apu.edu.in
मास्टर ऑफ आर्ट इन साऊथ अँड सेंट्रल एशियन स्टडीज
सेंट्रल युनिव्हर्सटिी पंजाबने पुढील पदव्युत्तर पदवी आणि पीएच.डी अभ्यासक्रम सुरू केले आहेत-
मास्टर ऑफ आर्ट्स इन साऊथ अँड सेंट्रल एशियन स्टडीज, इंटिग्रेटेड प्रोग्रॅम फॉर मास्टर ऑफ फिलॉसॉफी अँड पीएच.डी इन साऊथ अँड सेंट्रल एशियन स्टडीज, मास्टर ऑफ आर्ट्स इन डेव्हलपमेंट स्टडीज, इंटिग्रेटेड प्रोग्रॅम फॉर मास्टर ऑफ फिलासॉफी अँड पीएच.डी इन डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स, इंटिग्रेटेड प्रोग्रॅम फॉर मास्टर ऑफ फिलासॉफी अँड पीएच.डी इन कम्पॅरिटिव्ह स्टडीज, मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्पॅरिटिव्ह स्टडीज.
या अभ्यासक्रमांना प्रवेशपरीक्षेद्वारे प्रवेश दिला जातो. महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रे – मुंबई आणि नागपूर.
पत्ता- सिटी कॅम्पस, मन्सा रोड, भटिंडा- १५१००१.
मेल- cu.punjab.info@gmail.com
वेबसाईट- www.centralunpunjab.com