ICSE, ISC Result 2024 Out: भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषदेने (CISCE) आज ICSE, ISC चे निकाल जाहीर केले आहे. इयत्ता १० वी आणि १२ वीचे विद्यार्थी त्यांचे निकाल अधिकृत वेबसाइट – cisce.org, results.cisce.org वर पाहू शकतात. प्राप्त माहितीनुसार, इयत्ता १० वीच्या निकालात ९९. ४७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर १२वीच्या परीक्षेत ९८.१९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ६ मे म्हणजेच आज निकाल जाहीर झाल्यानंतर १० मे पर्यंत पुनर्तपासणीसाठी अर्ज करता येणार आहे.

CISCE च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आयसीएसई बोर्डाच्या परीक्षेत मुलींनी यंदा बाजी मारली आहे. मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९९. ६५ इतकी असून मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९९. ३१ इतकी आहे. आयएससी बोर्डात सुद्धा मुलीच मुलांच्या पुढे आहेत. ९८. ९२ टक्के मुली तर ९७. ५३ टक्के मुलं आयएससी बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.

mpsc exam latest news in marathi
MPSC Exam 2025: ‘एमपीएससी’ परीक्षेसाठी मोबाईल जॅमर, सीसीटीव्ही, पोलीस आणि…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
UGC NET 2024 How To Download Answer Key 2024
UGC NET 2024 : युजीसी नेट परीक्षेची ‘उत्तरसुची’ जाहीर! कशी कराल डाउनलोड? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
tet conducted by Maharashtra State Examination Council has been declared final result
टीईटीचा अंतरिम निकाल जाहीर
Why is there a delay in the appointment of candidates who have passed MPSC
कोलमडलेले वेळापत्रक, न्यायालयीन विलंब, लालफीतशाही… ‘एमपीएससी’ उत्तीर्ण उमेदवारांच्या नियुक्तीस विलंब का होतो?
This years Maharashtra State Board exams include changes in grace marks awarding process
बोर्डाच्या दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या ‘ग्रेस’ गुणांबाबत मोठा निर्णय…
strict action against students if found with a mobile phone in an exam
खबरदार ! परीक्षेत विद्यार्थ्याकडे मोबाईल आढळल्यास आता इतके वर्ष…
SET Examination Scheduled For 15th June Via Offline Mode
सेट परीक्षा लांबणीवर, आता कधी होणार परीक्षा?

दहावीच्या निकालामध्ये पश्चिम विभागाची उत्तीर्णतेची टक्केवारी सर्वाधिक म्हणजेच ९९.९१ इतकी आहे. यापाठोपाठ दक्षिण क्षेत्रातील उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९९. ८८ इतकी आहे. १३६६ शाळांपैकी सुमारे ६६.१८% (९०४ ) शाळांची उत्तीर्णतेची टक्केवारी १०० इतकी आहे.

निकालाचे अपडेट मिळवण्यासाठी क्लिक करा

CISCE 10th 12th Result 2024: आयसीएसई दहावी, बारावी परीक्षांचे निकाल कसे व कुठे पाहाल?

  • ICSE बोर्डाच्या cisce.org वेबसाइटला भेट द्या.
  • होम पेजवरील रिजल्ट्स टॅबवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला ICSE निकाल वेबसाईट results.cisce.org पेज दिसेल.
  • दहावीचा निकाल पाहण्यासाठी येथे ICSE Result 2024 Link वर क्लिक करा.
  • इयत्ता बारावीचा निकाल पाहण्यासाठी, ISC Result 2024 Link वर क्लिक करा.
  • वेगळ्या लिंक्स न मिळाल्यास कोर्स पर्यायातून ICSE किंवा ISC निवडा.
  • CISCE लॉग इन पेज समोर दिसेल. युनिक आयडी, इंडेक्स नंबर आणि कॅप्चा कोड इथे टाका.
  • प्रिंटवर क्लिक करा. तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.

आयसीएसई किंवा आयएससी निकालांमध्ये महाराष्ट्र व गोवा या दोन्ही राज्यात ९९. ७१ टक्के इतका निकाल लागला आहे. गत वर्षी महाराष्ट्र ISC (९८.६९) आणि ICSE (९९.८३) या दोन्हींमध्ये अव्वल होता.

दुसरीकडे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) लवकरच उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (12वी) आणि माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (१०वी ) चे निकाल जाहीर करणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर, उमेदवार mahresult.nic.in आणि mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइटवरून महाराष्ट्र बोर्ड निकाल मधील आपली गुणपत्रिका तपासू व डाउनलोड करू शकतात.

Story img Loader