SSB Bharti 2023 : सशस्त्र सीमा दल अंतर्गत उपनिरीक्षक (पायनियर), उपनिरीक्षक (ड्राफ्ट्समन), उपनिरीक्षक (कम्युनिकेशन), उपनिरीक्षक (स्टाफ नर्स/महिला) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहिर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकूण १११ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीसाठी उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहेत. तर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि पगार याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
सशस्त्र सीमा दल भरती २०२३ –
पदाचे नाव – उपनिरीक्षक (पायनियर), उपनिरीक्षक (ड्राफ्ट्समन), उपनिरीक्षक (कम्युनिकेशन), उपनिरीक्षक (स्टाफ नर्स/महिला).
एकूण पद संख्या – १११
शैक्षणिक पात्रता –
मान्यताप्राप्त संस्था/बोर्ड/विद्यापीठातून १०वी/१२वी/पदवी/डिप्लोमा/इंजीनियरिंग किंवा समकक्ष. शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असून सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात अवश्य पाहा.
अर्जाची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत.
अधिकृत वेबसाईट – http://www.ssbrectt.gov.in
पगार –
उपनिरीक्षक पदानुसार पगार ३५ हजार ४०० रुपये ते १ लाख १२ हजार ४०० रुपयांपर्यंत.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक – https://applyssb.com/SSBACCommCadre_2023/applicationIndex
असा करा अर्ज –
- उमेदवारांना भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- उमेदवार खालील वरती लिंक वरून थेट अर्ज सदर करू शकतात.
- इतर कोणत्याही पद्धतीद्वारे आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख लवकरच अपडेट केली जाईल.
अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी (https://drive.google.com/file/d/10mktYSdPh1xJmHwy7ePnUKxCws23JlrP/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.