CBSE 11th 12th Exam Pattern Changed: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) इयत्ता ११ वी व १२ वी च्या परीक्षेच्या पद्धतीमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. CBSE परीक्षा पॅटर्नचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सर्वांगीण विकास आणि सर्जनशील विचारांना प्रोत्साहन देणे असं आहे. येत्या काळात हे नवे बदल परीक्षेत अवलंबले जातील. हे बदल नेमके काय आहेत व त्याचा नेमका कसा फायदा होऊ शकतो हे आज आपण जाणून घेणार आहोत. मानव रचना शैक्षणिक संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी व प्राध्यापिका गौरी भसीन यांनी इंडियन एक्सस्प्रेससाठी लिहिलेल्या लेखात याविषयी तपशीलवार माहिती दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सीबीएसई परीक्षेत काय बदलणार?

एक महत्त्वाचा बदल म्हणजे बोर्ड परीक्षेच्या निकालाची टक्केवारी १०० वरून कमी करून ८० अशी करण्यात आली आहे. २० टक्के महत्त्व हे प्रकल्प, तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा अशा पद्धतीने विभागले जातील. असा बदल करण्याचे मुख्य कारण म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान देण्यापेक्षा, शिकलेल्या गोष्टींचा उपयोग कसा करावा याचे प्रशिक्षण देण्यावर भर दिला जावा असा बोर्डाचा हेतू आहे. २१ व्या शतकातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी सज्ज असेल याचा बंदोबस्त करण्याच्या हेतूने या निर्णयाची अंमलबाजवणी करण्यात येणार आहे.

बहुपर्यायी प्रश्न (MCQ), केस-स्टडी आणि स्त्रोत-आधारित प्रश्नांच्या स्वरूपातील प्रश्न हे ५० टक्के गुण देणारे असतील. तर थोडक्यात आणि दीर्घ दोन्ही उत्तरांचा समावेश असलेल्या प्रश्नांची टक्केवारी ३० टक्क्यांपर्यंत असेल. यापूर्वी हे प्रमाण दोन्ही बाबतील ४० टक्के होते.

CBSE चा नवीन परीक्षा पॅटर्नचे अपेक्षित परिणाम

  • CBSE परीक्षा पद्धतीत लागू केलेल्या बदलांचा विद्यार्थ्यांवर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे विद्यार्थ्यांना खऱ्या आयुष्यात रोज येणाऱ्या प्रश्नांना कसे सोडवावे याचे मार्गदर्शन केले जाईल. विषयाचा सखोल अभ्यास वाढेल
  • प्रकल्प व प्रात्यक्षिकांचे प्रमाण वाढल्याने विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलतेला वाव मिळेल.
  • ॲप्लिकेशन-ओरिएंटेड प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रवासाच्या पुढील टप्प्यासाठी म्हणजेच नोकरीसाठी आवश्यक असलेला पाया प्राप्त होईल.
  • नवीन मूल्यांकन पद्धतींशी जुळवून घेणे आणि ॲप्लिकेशन-ओरिएंटेड मानसिकता निर्माण करणे हे पारंपरिक अभ्यासाच्या पद्धतीपेक्षा वेगळे असू शकते.

हे ही वाचा<< Maharashtra Board 12th Results 2024: ठरलं! १२ वीचा निकाल उद्या! मूळ गुणपत्रिका कधी मिळणार?

CBSE चा नवीन परीक्षा पॅटर्न: फायदे आणि आव्हाने

मूल्यांकन पद्धतीतील बदलांचे फायदे आहेत हे खरं असलं तरी यामध्ये अनेक आव्हाने सुद्धा आहेत. मुख्य समस्या म्हणजे अंमलबजावणी कधी करायची. शाळांमधील अंतर्गत मूल्यांकनांमध्ये एकसमानता, पारदर्शकता याची खात्री करून घेणे गरजेचे असेल. तसेच प्रकल्पात गुणवत्ता तपासताना विद्यार्थ्यांची वैचारिक समज, सर्जनशीलता समजून घेणं सुद्धा आवश्यक असेल. यासाठी सर्वात आधी शिक्षकांचं प्रशिक्षण आवश्यक असेल. तसेच अंमलबजावणी सुरु झाल्यावर सुद्धा नियमित फीडबॅक घेतल्याने आणि सतत देखरेख केल्याने या बदलांचा योग्य अवलंब करता येईल.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 12th 11th exam pattern to change by cbse questions and practical percentage marks to be changed how it will impact school students svs