Panvel Municipal Corporation Recruitment 2023 : पनवेल महानगरपालिकेत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. पालिकेने स्टाफ नर्स (महिला, पुरुष), आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि LHV पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पनवेल महानगरपालिका भरती २०२३ साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पदाचे नाव – स्टाफ नर्स (महिला, पुरुष), आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि LHV.

शैक्षणिक पात्रता –

  • स्टाफ नर्स : B.Sc (नर्सिंग)/ GNM + MNC रेजिस्ट्रेशन.
  • आरोग्य सेविका : ANM + MNC रेजिस्ट्रेशन.
  • LHV : B.Sc (नर्सिंग)/ GNM + MNC रेजिस्ट्रेशन.
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ : १२ वी पास + डिप्लोमा + महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिल रेजिस्ट्रेशन.

वयोमर्यादा – २१ ते ६५ वर्षे.

अधिकृत बेवसाईट – https://www.panvelcorporation.com/

अर्ज फी –

  • खुला प्रवर्ग – १५० रुपये.
  • मागासवर्गीय – १०० रुपये.

नोकरी ठिकाण – पनवेल.

महत्वाच्या तारखा –

  • अर्ज करण्याची सुरवात तारीख – २० ऑक्टोबर २०२३
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ नोव्हेंबर २०२३

अर्ज करण्याचा पत्ता – पनवेल महानगरपालिका, आरोग्य विभाग, देवाळे तलावाच्या समोर, गोखले हॉलच्या शेजारी, पनवेल – ४१०२०६

भरती संबंधित अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी या (https://drive.google.com/file/d/12h-Jadt9ql22FBfRL2D250boSavPvypy/view) लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 12th diploma and bsc candidates get golden job in panvel municipal corporation recruitment for these posts has started jap
Show comments