भारतीय सैन्य दलात काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी नोकरीची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. ती म्हणजे भारतीय हवाई दल अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीर वायु पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीसाठी आवश्यक वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
पदाचे नाव – अग्निवीर वायु.
शैक्षणिक पात्रता –
५० टक्के गुणांसह १२ वी पास किंवा मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ ऑटोमोबाईल/ कॉम्प्युटर सायन्स/ इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजि विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा इंग्लिश, भौतिकशास्त्र आणि गणित विषयासह गैर-व्यावसायिक विषयासह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम.
शारीरिक पात्रता –
उंची –
- पुरुष १२.५ से.मी.
- महिला १५२ से.मी.
छाती –
- पुरुष – फुगवुन 5 से.मी. जास्त.
वयोमर्यादा –
उमेदवाराचा जन्म २७ जून २०२३ ते २७ डिसेंबर २००६ दरम्यानचा असावा.
अर्ज फी – २५० रुपये.
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारतात कुठेही.
अधिकृत बेवसाईट – https://indianairforce.nic.in/
हेही वाचा- मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदांकरिता निघाली भरती, लवकर करा अर्ज
महत्वाच्या तारखा –
- ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात २७ जुलै २०२३
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ ऑगस्ट २०२३
भरतीसाठीची आवश्यक आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी (https://drive.google.com/file/d/1pkqFr1g00VW59s2EHprstQtHQXEcLzMV/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.