Ministry Of Defence Recruitment 2023 : मिनिस्ट्री ऑफ डिफेंसमध्ये वेगवेगळ्या पदांसाठी भरती निघाली आहे. डिफेंस मिनिस्ट्रीने ट्रेडमॅन आणि फायरमॅन पदांसाठी भरती काढली आहे. या भरती अभियानाद्वारे १७९३ जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया जारी करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार ऑफिशियल वेबसाईट aocrecuritment.govt.in वर जाऊन अर्ज करु शकता. या पदांसाठी अर्ज करण्याआधी पहिल्यांदा कॅंडिडेट्स भरती नोटिफिकेशनला नीट समजून घ्या. या भरतीची रजिस्ट्रेशन प्रक्रिया संपण्याची शेवटची तारीख २६ फेब्रुवारी २०२३ आहे. डिफेंस मिनिस्ट्रीत या भरती प्रकियानुसार एकूण १७,९३ पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये ट्रेड्समनच्या एकूण १२४९ पदांसाठी आणि फायरमॅनच्या ५४४ पदांसाठी नियुक्ती केली जाईल.

अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता

मिनिस्ट्री ऑफ डिफेंसच्या या भरतीनुसार ट्रेडमॅन पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे मान्यता प्राप्त संस्थेकडून १० वी पासचं सर्टिफिकेट असलं पाहिजे. याचसोबत संबंधित क्षेत्रात आयटीआयचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. तसेच फायरमन पदांसाठी अप्लाय करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यता प्राप्त संस्थेकडून १० वी पास सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे.

Central Bank of India Manager Recruitment 2024
सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये मॅनेजर पदांसाठी होणार भरती, अर्जाची शेवटची तारीख आणि अर्ज प्रक्रिया जाणून घेऊया…
Success Story Of Sabeer Bhatia In Marathi
Success Story Of Sabeer Bhatia: ईमेल कंपनी विकली…
success story of police constable kavita who had big dreams but her father did not want his daughter to study
वडिलांचा शिक्षणाला विरोध, पण मुलीने मानली नाही हार; वाचा मेहनतीने स्वप्न साकार करणाऱ्या कविताची गोष्ट
Abhinandan Yadav Success Story
Success Story : जिद्दीला सलाम! SSB परीक्षेत मिळाला तब्बल १६ वेळा नकार; अखेर २०२४ मध्ये मिळवलं UPSC परीक्षेत यश
ITBP Recruitment 2024: for 526 seats sub inspector head constable and constable check details career news in marathi
तरुणांसाठी नोकरीची संधी; आयटीपीबीमध्ये ५२६ जागांवर भरती, २१ हजारांपासून १ लाख १२ हजारांपर्यंत मिळणार पगार
worked in Ratan Tata's company Leaving a high-paying job
Success Story: एकेकाळी करायचे रतन टाटा यांच्या कंपनीत काम; मोठ्या पगाराची नोकरी सोडून उभा केला करोडोंचा व्यवसाय
Rahul Rai success story Gamma Point Capital founder Rahul rai career in crypto currency now working at BlockTower Capital
अवघ्या पाच महिन्यांत कमावले २८६ कोटी, आयआयटीचं शिक्षण सोडून धरली ‘ही’ वाट; वाचा राहुल राय याच्या यशाचं सीक्रेट
EIL Recruitment 2024: apply for various posts at recruitment eil co in
तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; इंजीनियर्स इंडिया लिमिटेडमध्ये मोठी भरती; जाणून घ्या कसा कराल अर्ज
Success Story Of Amit Kataria
Success Story Of Amit Kataria : सर्वात कमी मानधन घेणारे श्रीमंत आयएएस ऑफिसर, नरेंद्र मोदींच्या भेटीदरम्यान आले होते चर्चेत; वाचा त्यांची गोष्ट

नक्की वाचा – अॅक्टर व्हायचंय, भारतातील या टॉप इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घ्या, या दिग्गज कलाकारांना इथूनच अॅक्टिंगचा सूर गवसला

वयोमर्यादा किती आहे?

या पदांसाठी अप्लाय करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २५ वर्षामध्ये असलं पाहिजे. तसेच आरक्षण वर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट दिली जाईल. तसंच मिनिस्ट्री ऑफ डिफेंसच्या या निवड प्रक्रियेनुसार उमेदवारांसाठी परीक्षेचं आयोजन केलं जाईल. त्यानुसार त्यांची शॉर्टलिस्टिंग केली जाईल.

वेतन किती मिळणार?

या भरतीनुसार ट्रेडमॅन पदांसाठी निवड केलेल्या उमेदवारांना १८००० ते ५६९०० रुपयांपर्यंत (पे लेवल १ नुसार) वेतन दिले जाईल. तर, फायरमॅन पदासाठी अप्लाय करणाऱ्या उमेदवारांना वेतन म्हणून १९९०० – ६३,२०० रुपये (पे लेवल २ नुसार) देण्यात येतील.