बारावी परिक्षांचा निकाल जाहीर झाला आहे त्यामुळे विद्यार्थांसमोर करिअरसाठी योग्य पर्याय निवडण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. बारावीनंतर करिअरसाठी अनेक पर्याय आहेत. पण तुम्हाला जर इतरांपेक्षा जास्त पगाराची नोकरी हवी असेल तर कोणते करिअर निवडावे? तुमच्या या प्रश्नाचे उत्तर आम्ही देणार आहोत. तुम्हाला आम्ही या लेखात जास्त पगाराच्या ५ नोकरीबाबत माहिती देणार आहोत जे तुम्ही १२ वी नंतर करिअर म्हणून निवडू शकता.
जास्त पगाराच्या नोकरींसाठी ५ पर्याय
१. कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअर
तंत्रज्ञानाची वाढती मागणी लक्षात घेता कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअर करिअर म्हणून एक चांगला पर्याय आहे. या कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरला सुरुवातीला साधारण वार्षिक पगार ३-४ लाखांपर्यंत मिळू शकतो आणि तुमच्या कामाच्या अनुभवानुसार तुमचा पगार वर्षाला २० लाख रुपयांपर्यंत वाढू शकतो. करिअर म्हणून कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअर हा पर्याय निवडण्यासाठी तुम्हाला कॉप्युटर सायन्समध्ये पदवी शिक्षण पूर्ण करावे लागेल.
२. डेटा सायंटिस्ट
डेटा सायंटिस्ट कोणत्या प्रश्नांची उत्तरे आवश्यक आहेत आणि संबंधित डेटा कोठे शोधायचा याचे परीक्षण करतात. डेटा सायंटिस्टची सध्या मागणी खूप वाढत आहे. त्यांना सरासरी सुरुवातीला वार्षिक पगार 4-5 लाख रुपय असतो आणि अनुभवानुसार, पगार वार्षिक 20 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतो. ही करिअर निवडण्यासाठी तुम्हाला डेटा सायन्स किंवा स्टॅस्टिकची डिग्री पूर्ण करावी लागेल.
३.मॅनेजमेंट कन्सलटंट
मॅनेजमेंट कन्सलटंट कंपन्यांना त्यांची कामगिरी आणि नफा सुधारण्यास मदत करतात. सरासरी प्रतिवर्ष सुरुवातीचा पगार 5-6 लाख रुपयांपर्यंत असतो आणि अनुभवानुसार, दरवर्षी 25 लाख रुपयांपर्यंत पगार वाढू शकतो. हे करिअर करण्यासाठी व्यवसाय व्यवस्थापनाची पदवी आवश्यक आहे.
हेही वाचा – ISROमध्ये ‘या’ पदांसाठी ३०३ जागांची होणार भरती, ५६ हजारांहून अधिक मिळू शकतो पगार, जाणून घ्या प्रकिया
४. चार्टर्ड अकाउंटण्ट्स
कोणतेही चार्टर्ड अकाउंटण्ट्स म्हणजे जो बजेट मॅनेज करतो, ऑडिटिंग, टॅक्सेशन, बिझनेस स्ट्रेटजी आणि फाईनेंशियल रेकॉर्ड बद्दल माहिती प्रदान करतो. चार्टर्ड अकाउंटण्ट्स अनेक कंपन्यांमध्ये देखील नोकरी करू शकतात. करिअरच्या सुरुवातीच्या काळात चॅर्टड अकाउंट सरासरी पगारासह रु. 7-8 लाख प्रति वर्ष आणि त्यापेक्षा जास्त संभाव्य कमाई करु शकतात. काही वर्षांच्या अनुभवानंतर वार्षिक २० लाख रुपयांपर्यंत कमाई करु शकतात. सीएचे करिअर निवडण्यासाठी सीएची पदवी शिक्षण पूर्ण करावे लागेल.
हेही वाचा – इंडियन बँकेत ‘या’ पदांसाठी होणार भरती, मुलाखतीद्वारे होईल निवड, जाणून घ्या पात्रता निकष
५. इनव्हेस्टमेंट बँकर
इनव्हेस्टमेंट बँकर्स कंपन्यांना आणि सरकारांना सिक्युरिटीज अंडरराइटिंग विकून भांडवल उभारण्यात मदत करतात. सरासरी सुरुवातीचा वार्षिक पगार 8-10 लाख रुपयांपर्यंत असतो आणि अनुभवासह, वार्षिक पगार 50 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतो. या करिअर निवडण्यासाठी तुम्हाला फायनान्स, इकोनॉमिक्स, आणि बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदवी शिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे.
या जास्त पगाराच्या करिअर निवडणे तसे सोपे काम नाही, परंतु कठोर परिश्रम आणि समर्पणासह, ते एक चांगले करियर बनवू शकतात.