Open Book Exams For 9-12th: गेल्या वर्षी प्रसिद्ध झालेल्या नवीन राष्ट्रीय अभ्यासक्रमातील शिफारशींनुसार सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन तर्फे (CBSE) इयत्ता ९ ते १२ वीच्या विद्यार्थ्यांची ओपन बुक परीक्षा (OBE) घेण्याचा विचार करत आहे. इंडियन एक्सस्प्रेसने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, बोर्डाने काही शाळांमध्ये इयत्ता ९ आणि १० च्या इंग्रजी, गणित आणि विज्ञान या विषयांसाठी तर इयत्ता ११ वी व १२ वी च्या इंग्रजी, गणित आणि जीवशास्त्र या विषयांच्या ओपन-बुक परीक्षा घेण्याचा प्रस्ताव दिला आहे. ओपन बुक परीक्षा म्हणजे नावानुसारच अभ्यासाची सामग्री वापरण्याची मुभा असलेली परीक्षा. ही सामग्री म्हणजे नोट्स, पाठयपुस्तके, वह्या असू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ओपन बुक परीक्षा सोप्या असतात का? (Open Book Exams)

एक महत्त्वाची बाब म्हणजे अशा पद्धतीच्या परीक्षा या सामान्य परीक्षांपेक्षा सोप्या आहेत असा याचा अर्थ होत नाही. कारण नियमित पद्धतीच्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्तीचे परीक्षण केले जाते मात्र ओपन बुक परीक्षेत त्या विषयाची समज व संकल्पनेचे विश्लेषण करण्याची क्षमता याची परीक्षा घेतली जाते. पाठयपुस्तकातील माहिती फक्त उत्तर म्हणून पेपरमध्ये उतरवणे हे थांबवून, प्रश्नाचं उत्तर शोधून ओळखणं, हे कसब निर्माण करणं हा या परीक्षांचा हेतू असतो.

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, २०२४ या वर्षीच्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये या ओपन बुक परीक्षेचा प्रयोग आयोजित करण्याचा प्रस्ताव आहे. अनुभवाच्या आधारे, मूल्यांकनाचा प्रकार सर्व शाळांमध्ये इयत्ता ९ ते १२ वीच्या इयत्तांसाठी स्वीकारावा का याविषयी बोर्ड निर्णय घेणार आहे. या प्रयोगात कौशल्य, विश्लेषण,सर्जनशील विचार आणि समस्या सोडवण्याच्या क्षमतांचे मूल्यांकन करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल.

दिल्ली विद्यापीठात ‘OBE’ का लागू झाली?

जूनपर्यंत ओपन बुक परीक्षेच्या प्राथमिक प्रयोगाची रचना केली जाईल, त्यासाठी दिल्ली विद्यापीठाचा (डीयू) सल्ला घेतला जाईल. ऑगस्ट २०२० मध्ये कोविड महामारीच्या काळात वंचित आणि दिव्यांग श्रेणीतील विद्यार्थी, दृष्टीहीन विद्यार्थी, तसेच ज्या विद्यार्थ्यांकडे इंटरनेट किंवा पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत, त्यांनी परीक्षा पद्धत ही भेदभावपूर्ण असल्याचे म्हणत महामारीच्या काळात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने नंतर दिल्ली विद्यापीठाला अंतिम वर्षाच्या पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी ओपन बुक परीक्षा घेण्याची परवानगी दिली होती. विद्यार्थ्यांना परीक्षा पूर्ण करण्यासाठी तीन तास आणि उत्तरपत्रिका स्कॅन करून अपलोड करण्यासाठी अतिरिक्त वेळ देण्यात आला, तर दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी सहा तास देण्यात आले होते.

खुल्या पुस्तकाच्या परीक्षांसाठी काय बदल आवश्यक आहेत?

दरम्यान, सीबीएसईने यापूर्वी २०१४-१५ ते २०१६-१७ या तीन वर्षांसाठी इयत्ता नववी व ११ वी च्या वर्षअखेरीच्या परीक्षांसाठी ओपन टेक्स्ट बेस्ड असेसमेंट किंवा OTBA फॉरमॅटचा प्रयोग केला होता, परंतु विद्यार्थ्यांच्या नकारात्मक अभिप्रायाच्या आधारे हा बदल रद्द करण्यात आला होता. IE ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, सीबीएसई शाळांसाठी ओपन बुक परीक्षा लागू करण्याच्या प्रस्तावावर चर्चा करताना, बोर्डाच्या अभ्यासक्रम समितीने गेल्या वर्षीच्या उत्तरार्धात उच्च-गुणवत्तेची पाठ्यपुस्तके विकसित करण्याच्या गरजेवर चर्चा केली होती जेणेकरून विद्यार्थ्यांना ही नवीन मूल्यांकन पद्धत समजेल आणि स्वीकारताना अडचण येणार नाही.

हे ही वाचा<< BMC Recruitment 2024 : ‘बृहन्मुंबई महानगरपालिकेत’ नोकऱ्यांच्या सुवर्णसंधी! ‘या’ तारखेपर्यंत करू शकतात अर्ज….

अभ्यासक्रम समितीच्या बैठकीदरम्यान, काही सदस्यांनी संकल्पना समजून घेण्यासाठी शिक्षकांनी स्वतः अशा परीक्षा द्याव्यात जेणेकरून त्यांना या परीक्षांसाठी योग्य पुस्तके तयार करण्यास मदत होऊ शकते. युनायटेड स्टेट्समधील महाविद्यालयांसाठी होणाऱ्या प्रवेश यासाठी मानक म्हणून विचारात घेतल्या जाव्यात असेही यावेळी सांगण्यात आले होते.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 9th to 12th standard exams to be open book proposed by cbse pilot in november 2024 will this exam be easier will syllabus change svs
Show comments