UPSC Success Story केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देशात सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. दरवर्षी लाखो उमेदवार ही परीक्षा देतात, पण मोजकेच पास होतात. यूपीएससी परीक्षेचे तीन टप्पे असतात. आधी प्रिलिम्स, मग मेन आणि शेवटी मुलाखत. अनेक जण वर्षानुवर्षे कोचिंग घेतात, पण ही परीक्षा पास होऊ शकत नाहीत. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा ही केवळ देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. दरम्यान, आज आपण बिहारची राजधानी पाटणा येथील बिशुनपूर पाकडी या गावातून आलेला अतिशय खोडकर असा मुलगा कसा आयएएस होतो हे जाणून घेणार आहोत. शाळेतून शिक्षकांच्या वारंवार तक्रारी ते आज आयएएस अधिकारी कसा झाला, आदित्य पांडेचा प्रवास जाणून घेऊयात.

“…तर मी माझ्या मिशा काढून टाकेन”

heart-touching video | a young man shares the harsh reality of the world
“जेव्हा सर्व साथ सोडतात तेव्हा…” तरुणाने सांगितली खरी दुनियादारी; पाटी होतेय व्हायरल, VIDEO एकदा पाहाच
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Anshula Kapoor talks about parents Boney Kapoor Mona Kapoor divorce
“माझे आई-वडील वेगळे झाल्यावर…”, पालकांच्या घटस्फोटाबाबत पहिल्यांदाच बोलली जान्हवी कपूरची सावत्र बहीण
rishi kapoor was scared of raj kapoor
वडील घरी आले की घाबरून लपायचो, ऋषी कपूर कारण सांगत म्हणालेले, “ते खोलीत…”
Sanju Samson father Viswanath video viral
Sanju Samson : ‘३-४ लोकांमुळे माझ्या मुलाची १० वर्षें वाया गेली…’, संजू सॅमसनच्या वडिलांचे धोनी-विराटसह रोहित शर्मावर गंभीर आरोप, VIDEO व्हायरल
Who will understand the pain of parents
“आई वडिलांचे दु:ख कोण समजून घेणार” चिमुकल्याने सांगितले आई बाबांना वेळ देण्याचे दोन फायदे, VIDEO होतोय व्हायरल
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
Lakhat Ek Aamcha Dada
चांगले वागण्याचे नाटक करून डॅडींचा सूर्याला फसविण्याचा प्लॅन; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “तुमचं पोरगं आणि तुम्ही…”

यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊन आदित्य आयएएस अधिकारी झाला. त्याला ओळखणाऱ्यांसाठी हा क्षण जितका आनंदाचा होता तितकाच धक्कादायक होता. त्याच्या खोडसाळपणाच्या कहाण्या गावभर प्रसिद्ध होत्या. त्याचे शिक्षक तक्रारींचा गठ्ठा घेऊन त्यांच्या घरी येत असत. स्वत: आदित्य पांडेला त्याच्या खोडसाळपणाचे किस्से आठवतात. एकदा त्याच्या शिक्षिकाने त्याच्या वडिलांकडे तक्रार केली आणि सांगितले, ‘जर आदित्य त्याच्या अभ्यासात गंभीर झाला तर मी माझ्या मिशा काढून टाकेन.’ हा प्रसंग आठवून तो खूप हसतो. यावरून त्याच्या बालपणीच्या दिवसांची कल्पना येऊ शकते. त्यानंतर आदित्य पांडेने खूप मेहनत घेतली. आधी इंजिनीअर झाला आणि नंतर एमबीएची पदवी घेतली. याने त्याचे समाधान झाले नाही तेव्हा त्याने यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची तयारी सुरू केली आणि शेवटी तो आयएएस अधिकारी बनला.

UPSC इच्छुकांनी परीक्षेत किमान ८४ प्रश्न सोडवले पाहिजेत

१२वी उत्तीर्ण झाल्यानंतर आदित्य पांडेने पंजाबमधील लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमधून बीटेक केले. त्याने इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगची पदवी घेतली होती. त्यानंतर आदित्य पांडेने आयआयटी रुरकीमधून एमबीए केले. दोन वर्षे एका खाजगी बँकेत काम केल्यानंतर २०२० मध्ये UPSC परीक्षेच्या तयारीसाठी त्याने नोकरी सोडली. यूपीएससी परीक्षेत दोन वेळा तो नापास झाला होता. मात्र, त्याने पराभव स्वीकारला नाही. आपल्या मेहनतीच्या जोरावर आदित्य पांडेने २०२२ मध्ये झालेल्या यूपीएससी परीक्षेत यश संपादन केले. UPSC CSE 2022 मध्ये ऑल इंडिया ४८ वा रँक मिळवून तो आयएएस अधिकारी झाला. त्याला यावेळी झारखंड केडर देण्यात आले. सध्या तो झारखंडची राजधानी रांचीमध्ये असिस्टंट कलेक्टर पदावर आहे. नागरी सेवा परीक्षेच्या दुसऱ्या प्रयत्नात तो फक्त २.५ गुणांनी कटऑफ लिस्ट चुकला, म्हणून तो सल्ला देतो की UPSC इच्छुकांनी परीक्षेत किमान ८४ प्रश्न सोडवले पाहिजेत.

हेही वाचा >> Success Story: युपीएससीसाठी सोडली २८ लाख रुपयांची नोकरी; ‘या’ पॅटर्नने अभ्यास करत पहिल्याच प्रयत्नात मारली बाजी

आदित्य पांडे सांगतो की, यूपीएससी मुलाखतीची तयारी करणाऱ्या इच्छुकांनी त्यांचा DAF अतिशय काळजीपूर्वक वाचावा. यूपीएससी मुलाखतीत DAF कडून प्रश्न नक्कीच विचारले जातात. यूपीएससी मॉक इंटरव्ह्यू या प्रत्यक्ष मुलाखतीपेक्षा खूप वेगळ्या असतात. एवढेच नाही तर यूट्यूबवर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंवर जास्त विश्वास ठेवू नका, असाही सल्ला त्याने दिला.