सुहास पाटील
१) एअरपोर्ट्स अॅथॉरिटी ऑफ इंडिया (AAI), नवी दिल्ली (सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम) (Advt. No. ०३/२०२३) पुढील ३४२ पदांची भरती. (१) ज्युनियर असिस्टंट (ऑफिस) – ९ पदे (अजा – १, इमाव – २, खुला – ६) (माजी सैनिकांसाठी १ पद राखीव).
(२) ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (कॉमन कॅडर) – २३७ पदे (अजा – ३५, अज – १७, इमाव – ६३, ईडब्ल्यूएस – २३, खुला – ९९) (१७ पदे दिव्यांग (कॅटेगरी A-५, B-५, C-२, D & E-५) साठी राखीव).
पात्रता – (दि. ४ सप्टेंबर २०२३ रोजी) पद क्र. १ व २ साठी पदवी (कोणत्याही शाखेतील) उत्तीर्ण.
(३) ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (फिनान्स) – ६६ पदे (अजा – ९, अज – ४, इमाव – १७, ईडब्ल्यूएस – ६, खुला – ३०) (६ पदे दिव्यांग (कॅटेगरी ए – ३, बी – २, डी अँड ई – १) साठी राखीव).
हेही वाचा >>> युपीएससीद्वारे ‘या’ पदांसाठी होणार भरती, जाणून घ्या शेवटची तारीख अन् अर्जाची प्रक्रिया
पात्रता – बी.कॉम. आणि एम.बी.ए. (फिनान्स)/ ICWA/CA.
(४) ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (फायर सव्र्हिस) – ३ पदे (खुला).
पात्रता – बी.ई./बी.टेक. (फायर/ मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल इंजिनीअरींग) अर्ज पडताळणीच्या वेळी LMV ड्रायव्हिंग लायसन्स सादर करणे अनिवार्य आहे.
(५) ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (लॉ) – १८ पदे (अजा – २, अज – १, इमाव – ४, ईडब्ल्यूएस – १, खुला – १०) (३ पदे दिव्यांग (कॅटेगरी ए-२, सी-१) साठी राखीव).
पात्रता – कायदा विषयातील पदवी आणि बार काऊन्सिल ऑफ इंडियाकडे नोंदणी.
(६) सिनियर असिस्टंट (अकाऊंट्स) – ९ पदे (अज – १, इमाव – २, खुला – ६) (१ पद माजी सैनिकांसाठी राखीव).
पात्रता – पदवी उत्तीर्ण शक्यतो बी.कॉम. आणि संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव आवश्यक.
अंतिम वर्षांचे उमेदवार अर्ज करण्यास पात्र – त्यांनी अर्ज पडताळणी (verification) च्या वेळी पुरावा सादर करणे अनिवार्य.
वयोमर्यादा – (दि. ४ सप्टेंबर २०२३ रोजी) ज्युनियर असिस्टंट / सिनियर असिस्टंट – ३० वर्षेपर्यंत, ज्युनियर एक्झिक्युटिव्ह – २७ वर्षेपर्यंत. (कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे; अजा/अज – ५ वर्षे; दिव्यांग – १० वर्षे)
पद क्र. १ व ६ साठी विधवा/ घटस्फोटीत/ कायद्याने विभक्त महिला ज्यांनी पुनर्विवाह केलेला नाही – वयोमर्यादा ३५ वर्षेपर्यंत (पुरावा सादर करणे अनिवार्य आहे.)
हेही वाचा >>> UPSC-MPSC : बाजार स्थिरीकरण योजना काय? ती केव्हा सुरू झाली?
वेतन श्रेणी – ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (ग्रुप-बी ए१) (रु. ४०,००० – ३ टक्के – १,४०,०००) अंदाजे वेतन रु. १३ लाख प्रतीवर्ष. सिनियर असिस्टंट (ग्रुप-सी NE६) (रु. ३६,००० – ३ टक्के – १,१०,०००) अंदाजे वेतन रु. ११.५ लाख प्रतीवर्ष. ज्युनियर असिस्टंट (ग्रुप-सी NE४) (रु. ३१,००० – ३ टक्के – ९२,०००) अंदाजे वेतन रु. १० लाख प्रतीवर्ष.
निवड पद्धती – ऑनलाइन परीक्षा (कॉम्प्युटर बेस्ड् टेस्ट). चुकीच्या उत्तरांसाठी कोणतेही गुण वजा केले जाणार नाहीत. परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम ‘Press Notel of Advt. No. ०३/२०२३ मधून अपलोड केला जाईल.
ऑनलाइन परीक्षेतील गुणवत्तेनुसार उमेदवार अर्ज पडताळणी/ कॉम्प्युटर लिटरसी टेस्ट/ शारीरिक मापदंड आणि शारीरिक क्षमता चाचणी, ड्रायव्हिंग टेस्टसाठी शॉर्ट लिस्ट केले जातील.
अर्जाचे शुल्क – रु. १,०००/-. (अजा/ अज/ दिव्यांग/ महिला/ अअक मध्ये अॅप्रेंटिसशिप केलेले उमेदवार यांना फी माफ आहे.)
ऑनलाइन अर्ज http://www.aai.aero वरील CAREER टॅबमध्ये दिलेल्या लिंकमधून दि. ४ सप्टेंबर २०२३ पर्यंत करावेत. ऑनलाइन अर्जासोबत फोटोग्राफ ईमेज (४.५ सें.मी. बाय ३.५ सें.मी.) (२०-५० kb), सिग्नेचर (१०-२० kb) लेखी घोषणापत्र (५०-१०० kb),
डाव्या अंगठय़ाचा ठसा (२०-५० kb) स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक.
एअरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी (ADA), बंगळूरु (संरक्षण मंत्रालय, भारत सरकार) इंजिनीअरींग पदवी/ पदव्युत्तर पदवीधारक उमेदवारांची ठराविक मुदतीकरिता ‘प्रोजेक्ट असिस्टंट’ पदावर भरती. वॉक-इन-इंटरह्यू/ लेखी परीक्षा पद्धतीने होणार. (Advt.No. ADA- ADV -२२) डिसिल्पिननुसार प्रोजेक्ट असिस्टंटच्या रिक्त पदांचा तपशील –
(१) मेकॅनिकल/ प्रोडक्शन इंजिनीअरींग/ मेटॅलर्जी/ मटेरियल सायन्स अॅण्ड इंजिनीअरींग – २३ पदे. इंटरह्यू/लेखी परीक्षेची तारीख – ४ सप्टेंबर २०२३.
(२) एअरोनॉटिकल/ एअरोस्पेस इंजिनीअरींग – २ पदे.
(३) सिव्हील इंजिनीअरींग – २ पदे. पद क्र. २ व ३ साठी इंटरह्यू/लेखी परीक्षेची तारीख – ७ सप्टेंबर २०२३.
(४) कॉम्प्युटर सायन्स/ इन्फो. टेक्नॉलॉजी/ इन्फो. सायन्स – २५ पदे. इंटरह्यू/लेखी परीक्षेची तारीख – ११ सप्टेंबर २०२३.
(५) इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कम्युनिकेशन/ टेली कम्युनिकेशन/ इलेक्ट्रिकल अॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड इन्स्ट्रमेंटेशन – ४८ पदे. इंटरह्यू/ लेखी परीक्षेची तारीख – १४ सप्टेंबर २०२३.
पात्रता – सर्व पदांसाठी (पद क्र. १ ते ५) संबंधित विषयातील फर्स्ट क्लास B.E./B.Tech./ M.E./M.Tech.
निकष क्र. १ – पद क्र. १ ते ५ साठी संबंधित विषयातील फर्स्ट क्लासमधील B.E./ B.Tech. आणि व्हॅलिड GATE स्कोअर किंवा B.E./B.Tech आणि M.E./M.Tech.. (दोन्ही फर्स्ट क्लाससह) उत्तीर्ण किंवा B.E./ B.Tech. फर्स्ट क्लाससह उत्तीर्ण आणि दोन वर्षांचा संबंधित कामाचा अनुभव.
निकष क्र. २ए – पद क्र. ४ कॉम्प्युटर सायन्स/ इन्फो. टेक्नॉलॉजी/ इन्फो. सायन्ससाठी – फर्स्ट क्लाससह B. Sc. U M. Sc. (कॉम्प्युटर सायन्स/आयटी/इन्फो सायन्स) उत्तीर्ण केली आहे आणि दोन वर्षांचा संबंधित कामाचा अनुभव आहे किंवा ज्यांनी GATE/ UGC- CSIR यांची JRF/ लेक्चररशिपसाठीची पात्रता परीक्षा NET उत्तीर्ण केली आहे असे उमेदवार पात्र आहेत.
निकष क्र. २बी – पद क्र. ५ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कम्युनिकेशन इ. पदांसाठी फर्स्ट क्लाससह B. Sc. U M. Sc.. (इलेक्ट्रॉनिक्स/ टेलीकॉम) परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि दोन वर्षांचा संबंधित कामाचा अनुभव आहे. किंवा ज्यांनी GATE/ UGC- CSIR यांची
JRF /लेक्चररशिपसाठीची पात्रता परीक्षा NET उत्तीर्ण केली आहे असे उमेदवार पात्र आहेत.
निकष क्र. ३ – पद क्र. १ ते ५ साठी – संबंधित विषयातील B.E./ B.Tech. फर्स्ट क्लाससह उत्तीर्ण.
वयोमर्यादा – २८ वर्षे (इमाव – ३१ वर्षे, अजा/ अज – ३३ वर्षे).
स्टायपेंड – (i) फक्त फर्स्ट क्लाससह B. E./ B.Tech. परीक्षा उत्तीर्ण केलेल्या उमेदवारांसाठी (अनअनुभवी/ GATE / NET स्कोअर नसलेले) रु. ३१,०००/-. दरमहा स्टायपेंड २७ टक्के HRA दिला जाईल. एकूण रु. ३९,३७०/- दरमहा.
(ii) अनुभवी/ GATE/ NET स्कोअर असलेले उमेदवारांसाठी रु. ३७,०००/-, दरमहा स्टायपेंड २७ टक्के HRA मिळून दरमहा रु. ४६,९९०/-.
नेमणुकीचा कालावधी – सुरुवातीला दोन वर्षांसाठी नेमणूक केली जाईल. जी ४ वर्षांपर्यंत वाढविली जाऊ शकते.
निवड पद्धती – जर जास्त उमेदवार वॉक-इन्सच्या दिवशी हजर झाल्यास सर्व उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल. ज्यातून इंटरह्यूकरिता उमेदवार निवडले जातील. इंटरह्यू कदाचित दुसऱ्या दिवशीपर्यंत घेतले जातील.
अनअनुभवी/ GATE/ NET पात्रता नसलेले फर्स्ट क्लाससह उत्तीर्ण B.E./B.Tech. उमेदवारांसाठी (निकष ३ नुसार) लेखी परीक्षा अनिवार्य आहे. यातून उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांचा इंटरह्यू घेतला जाईल.
https://www.ada.gov.in या अऊअ वेबसाईटवर दिलेल्या विहीत नमुन्यातील नीट टाईप केलेला अॅप्लिकेशन फॉर्म पूर्ण भरून त्यावर हलक्या पार्श्वभूमीवरील पासपोर्ट आकाराचा फोटो चिकटवून, ओरिजिनल सर्टिफिकेट्स (मार्कशिट्स) यांचा स्वयंसाक्षांकीत केलेला एक संच घेऊन वॉक-इन-इंटरह्यूकरिता हजर रहावे.
अजा/ अज/ इमाव/ दिव्यांग/ ईडब्ल्यूएस कॅटेगरीतील उमेदवारांनी तसा पुरावा अर्जासह सादर करणे आवश्यक.
वॉक-इन-इंटरह्यूचे ठिकाण आणि वेळ – ADA Campus-s, Surajandas Road, New Thippasandra Post, Bengal ४१४ – ५६० ०७५ येथे सकाळी ८.३० ते ११.०० वाजे दरम्यान रजिस्ट्रेशन आणि कागदपत्र पडताळणीसाठी हजर रहावे. सकाळी ११.०० वाजेनंतर उमेदवारांना प्रवेश नाकारला जाईल. शंकासमाधानासाठी admin- hr. ada@gov. in या ई-मेलवर संपर्क साधावा.