AAI Recruitment 2023 Vacancy: एअरपोर्ट ऑथरिटी ऑफ इंडियाने ज्युनिअर असिस्टंट सिनिअर असिस्टंट आणि ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह पदासाठी भरती काढली आहे. या भरतीसाठी जर पात्र उमेवदरांनी लवकरात लवकर अर्ज भरावा. अर्जाची प्रक्रिया ५ ऑगस्टपासून सुरु होईल आणि अर्ज करण्यासाठी ४ सप्टेंबर २०२३ आहे. उमेदवारांकडे नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी अजून वेळ आहे. या भरतीसाठी कोण अर्ज करू शकते याची माहिती दिली आहे. उमेदवारांना सविस्तर माहिती वाचा.
पात्रता काय असावी
या रिक्त पदांमध्ये त्यानुसार विविध पदांसाठी पात्रता निश्चित केलीआहे
- ज्युनिअर असिस्टंटसाठी, उमेदवाराने कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे.
- सिनियर असिस्टंटसाठी (अकाउंट्स) उमेदवाराने कोणत्याही शाखेतील बी.कॉम पदवीधर असावे तसेच तसेच दोन वर्षांचा अनुभव असावा.
- ज्युनिअर एक्झिक्युटिव्हसाठी (कॉमन कॅडर) साठी, उमेदवाराने कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक आहे.
- ज्युनिअर एक्झिक्युटिव्हसाठी उमेदवाराने B.Com सह ICWA/CA/MBA फायनान्स स्पेशलायझेन केलेले असावे.
- ज्युनिअर एक्झिक्युटिव्हसाठी (फायर सर्व्हिस) उमेदवाराकडे इंजिनिअरिंग किंवा फायर इंजिनिअरिंग किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये बॅचलर डिग्री असणे आवश्यक आहे.
- ज्युनिअर एक्झिक्युटिव्हसाठी (लॉ)उमेदवाकडे कायद्यातील व्यावसायिक पदवी (पदवीनंतर ३ वर्षांचा नियमित अभ्यासक्रम किंवा ५ वर्षे’
- १०+२नंतर एकात्मिक नियमित अभ्यासक्रम) असावी आणि भारतीय न्यायालयांमध्ये प्रॅक्टिस करण्यासाठी बार कौन्सिल ऑफ इंडियामध्ये वकील म्हणून नोंदणी करण्यासाठी उमेदवार स्वत: पात्र असावा.
हेही वाचा- UPSC Recruitment 2023: यूपीएससीच्या ७१ पदांवर होणार भरती, किती असेल पगार? जाणून घ्या
भरतीचे तपशील
- ज्युनिअर असिस्टंट (ऑफिस) – ०९ पद
- सीनिअर असिस्टंट ( (अकाउंट्स) – ०९ पद
- ज्युनिअरएक्झिक्युटिव्ह (कॉमन कॅडर) – २३७पद
- ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह(फाइनेंस)-६६ पद
- ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (फायर सर्विसेज) – ०३ पद
- ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (लॉ) – १८ पद
वयोमर्यादा
- ज्युनिअर असिस्टंट – ३० वर्ष (अधिकतम)
- सीनिअर असिस्टंट – ३० वर्ष (अधिकतम)
- ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह – २७ वर्ष
अधिसुचना – https://www.aai.aero/sites/default/files/examdashboard_advertisement/Detailed%20Advertisement%20No.%2003-2023.pdf
किती मिळेल पगार
- ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (ग्रुप-बी: ई-१] :- रु.४०,०००-३%- १,४०,०००
- सिनिअर असिस्टंट (ग्रुप-सी: एनई-६) :- रु. ३६,०००-३%- १,१०,०००
- ज्युनिअर असिस्टंट (ग्रुप-सी: एनई-४) :- रु. ३१,०००-३%- ९२,०००