Success Story: आपल्यातील अनेक जण शिक्षण आणि नोकरीसाठी परदेशात जातात. कारण अनेक परदेशी विद्यापीठांमध्ये उद्योग आणि नोकरीसाठी लागणारे कौशल्याधारित शिक्षण, उच्च प्रतीच्या प्रयोगशाळा, संशोधनात रुची आदी अनेक गोष्टी असतात. तसेच परदेशात मिळणाऱ्या पोझिशन्सद्वारे ऑफर केलेला पगार, आर्थिक सुरक्षा, आराम, भारतातील नोकऱ्यांशी सहसा जुळून येत नाही. त्यामुळे अनेक जण परदेशात स्थायिक होण्याचा निर्णय घेतात. तर युएसए कंपनीतील चांगल्या पगाराची नोकरी सोडणे हा अनेक भारतीयांसाठी एक कठीण निर्णय ठरू शकतो. पण, काही जण याला अपवाद असतात, जे परदेशातील नोकरी सोडून भारतात त्यांचा व्यवसाय उभा करण्याचा विचार करतात.

म्हणजेच काही जण त्यांच्या देशासाठी योगदान देण्याच्या इच्छेने प्रेरित असतात. करिअर मोझॅक (Career Mosaic ) या संस्थेचे संस्थापक अभिजीत झवेरी याची गोष्टसुद्धा अशीच आहे. अभिजीत झवेरी यांना युनायटेड स्टेट्समधील इंटिग्रेटेड सिस्टम्स मॅनेजमेंटमध्ये उच्च पगाराची नोकरी मिळाली होती. काही वर्षे परदेशात उच्च पगाराची नोकरी केल्यानंतर त्यांनी आपली नोकरी सोडण्याचा आणि आपल्या भारत देशात काही तरी चांगलं करण्याचा निर्णय घेतला. तर अभिजीत झवेरी यांच्या प्रवासाबद्दल सविस्तर जाणून घेऊ.

हेही वाचा…Success Story: दुखापतीमुळे अर्धवट राहिलं क्रिकेटपटू बनण्याचं स्वप्न; UPSC परीक्षा देण्यासाठी सोडली नोकरी अन्… पाहा IPS अधिकाऱ्याचा हा अनोखा प्रवास

२००२ मध्ये अभिजीत झवेरी यांनी करिअर मोझॅक कंपनीची स्थापना केली, जी गुजरातमध्ये आहे. परदेशात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना खरा आणि पारदर्शक सल्ला देण्याचे या कंपनीचे उद्दिष्ट आहे. पण, जेव्हा अभिजीत झवेरी यांनी त्यांच्या प्रवासाला सुरुवात केली, तेव्हा अनेक आव्हानांना त्यांना सामोरे जावे लागले. त्यांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. विशेषत: भारतातील व्हिसा, नंतर कोविड-१९ महामारीचा काळ आदी अनेक आव्हाने त्यांच्यासमोर आली. पण, त्यांनी ती स्वीकारली, त्यांच्यावर मात केला आणि पुढे जात राहिले.

आज अभिजीत झवेरी यांची करिअर मोझॅक कंपनी दक्षिण आशिया, मध्य पूर्व आणि आफ्रिकेतील त्यांच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी संघटनेच्या बाजारपेठेतील प्रवेश, विस्तार आणि विविधता पहात असलेल्या आघाडीच्या विद्यापीठांबरोबर काम करते आहे. तसेच कंपनीने २०२२ ते २०२३ या आर्थिक वर्षात १५० कोटी रुपयांची उल्लेखनीय उलाढाल केली आहे. तर असा आहे अभिजीत झवेरी यांचा प्रेरणादायी प्रवास.