गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या देशात एंटरटेनमेंट इंडस्ट्री अर्थात मनोरंजन क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. यातील चित्रपट, नाटक, जाहिरात, मालिका अशा विविध क्षेत्रात अनेक कलाकार आपलं नशीब आजमवण्यासाठी धडपडतात. यामुळे चित्रपटासह या क्षेत्राशी निगडित अभिनय, दिग्दर्शन, पटकथा लेखन, सिनेमॅटोग्राफी, संकलन, ध्वनी, संगीत, नृत्य दिग्दर्शन, ग्राफिक्स इ. वेगवेगळ्या विभागांमध्ये करियर करण्याच्या उत्तम संधी उपलब्ध झाल्या आहेत. यात अभिनय क्षेत्रात अनेक कलाकार अभिनेत्री आणि अभिनेता बनण्यासाठी मेहनत घेत असतात.

पण ऑडिशनमध्ये अभिनयातील स्वत:च वेगळेपण दाखवत हजारो कलाकारांशी स्पर्धा करत पुढे जावे लागते. या स्पर्धेत नंबर लागला तर स्टार नाही तर एका छोट्या रोलवर समाधान मानावे लागते. त्यामुळे अभिनय हे खूप स्पर्धात्मक क्षेत्र आहे. अनेक नकार पचवत, कमी मानधनात, अवेळी केव्हाही काम करण्याची मानसिकता ठेवावी लागते.

akshay kumar
फक्त एक चित्रपट करणाऱ्या अभिनेत्रीने राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात अक्षय कुमारचा केलेला अपमान? अभिनेत्याचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
varun dhawan plays spy role for the first time in web series citadel honey bunny
गुप्तहेराच्या भूमिकेत वरुण धवन; ‘सिटाडेल’च्या भारतीय आवृत्तीची झलक प्रेक्षकांसमोर
hansika motwani new home gruh pravesh
बॉलीवूड अभिनेत्रीने खरेदी केलं आलिशान घर, पतीबरोबर केला गृहप्रवेश, पाहा घराची झलक
vaastav the reality sanjay narverkar sanjay dutt
‘वास्तव’ सिनेमाला २५ वर्षे पूर्ण! देड फुट्याची भूमिका साकारणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्याने सांगितला संजय दत्तचा किस्सा
mallika sherawat share harassement experience
“त्या हिरोला माझ्या बेडरूममध्ये…”, बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव; म्हणाली, “रात्री १२ वाजता…”
Govinda wanted to marry neelam kothari
‘या’ बॉलीवूड अभिनेत्रीच्या प्रेमात पडलेला गोविंदा, रागात सुनीताशी मोडला होता साखरपुडा अन्…
Mukesh Khanna Rejects Ranveer Singh for Shaktimaa
रणवीर सिंह ‘या’ भूमिकेसाठी माझ्यासमोर बसला होता तीन तास, शक्तिमान फेम अभिनेत्याच वक्तव्य; म्हणाला “त्याच्या चेहर्‍यावर…”

तरीही अनेकांना अभिनय क्षेत्रात अभिनेत्री किंवा अभिनेता म्हणूनचं करियर करण्याची इच्छा असते, परंतु योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने बहुतांश जण खूप धडपड करत राहतात. त्यामुळे सुरुवातीला या क्षेत्रात ऑडिशन देण्यापासून ते कॅमेऱ्यासमोर येईपर्यंत कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते, किती मानधन मिळते आणि यातून पुढे करियरच्या काय संभाव्य संधी असतात जाणून घेऊ…

अभिनेता, अभिनेत्री होण्यासाठी कोणत्या गोष्टींची गरज असते?

या क्षेत्रात इतर क्षेत्राप्रमाणे शिक्षणाची कोणतीही अट नाही, मात्र तुम्हाला या क्षेत्रात योग्य पद्धतीने करियर करायचेच असेल तर मात्र शिक्षण आवश्यक आहे. अनेक लहान मोठ्या अ‍ॅटिंग अकॅडमीमध्ये जाऊन अभिनयाचे शिक्षण घेऊ शकता. तर महाविद्यालयीत जीवनात थिएटर, एकांकिका करत या क्षेत्रात पाऊल ठेवता येते. मात्र तुम्हाला अभिनयाची तितकी आवड पाहिजे. मात्र एक अभिनेत्री, अभिनेता होण्यासाठी आवश्यक कौशल्ये मिळविण्यासाठी खालीलप्रमाणे पाऊलं टाकली पाहिजेत.

१) अभिनयाचे क्लासेस लावा, महाविद्यालयातील ड्रामा क्लबमध्ये सहभागी व्हा. छोट्या-मोठ्या नाटकांमध्ये सहभाग घ्या.
२) बॅचलर पदवी मिळवा, एक चांगला अभिनेत्री, अभिनेता होण्यासाठी शिक्षणाची गरज नसते. पण यात जर औपचारिक शिक्षण घ्यायचे असल्यास बॅचरल डिग्री असावी लागते.
३) ऑडिशन आणि कौशल्ये विकसित करा, सिलेक्शन होणार नाही असे वाटक असले तरी वेगवेगळ्या सिनेमा, नाटक, जाहिरांसाठी ऑडिशन देत रहा. यामुळे तुम्हाला एक आत्मविश्वास येईल, अनुभव मिळेल, ओळखी वाढतील.
४) मास्टर्स प्रोग्रामचा विचार करा, कधी मोठ्या शो किंवा प्रोग्रामध्ये छोटा रोल करण्याची संधी मिळाली तर ती सोडू नका. याच शोमधून कधी नशीब उजळेल सांगता येत नाही.
५) एक चांगला एजंट शोधा, या क्षेत्रात काम करण्यासाठी एजंटची गरजचं असते असे नाही. पण एजंटमुळे अनेक व्यावसायिक संधी मिळतात. किंवा माहित नसलेल्या गोष्टी त्यांच्याकडून चांगल्याप्रकारे समजून घेता येतात.

‘ही’ कौशल्य करा विकसित

कोणताही कलाकार एका रात्री यशस्वी होत नाही. क्वचितच एखाद्या छोट्या प्रॉडक्शनमध्ये गेल्यानंतर एखादा स्टार बनतो. परंतु या क्षेत्रात येण्यासाठी ही कौशल्य विकसित केली पाहिजेत.

१) वाचन क्षमता वाढवा
२) कोणतेही पात्राच्या प्रेरणा आणि भावना अस्सल आणि मनोरंजक पद्धतीने चित्रित करणे आवश्यक आहे.
३) अभिनय तंत्राच्या श्रेणीची समजून घ्या.
४) दिलेल्या सुचनांचे पालन करत इतरांसह काम करण्याची क्षमता ठेवा.
५) भूमिकेला जिवंत करण्यासाठी पात्राचे व्यक्तिमत्व आणि परिस्थिती यांचे संशोधन करा.
६) कलाकाराने एखादे वाद्य कसे वाजवायचे किंवा एखाद्या भागासाठी स्टेज फायटिंग सिक्वेन्स कसे करावे हे शिकले पाहिजे.
७) अभिनेत्याला ऑडिशनसाठी एकदं स्किट लगेल सुचलं पाहिजे.

अभिनेता आणि अभिनेत्रींना उपलब्ध कामाच्या संधी आणि मानधन

बीएलएसनुसार, २६ टक्के अभिनेते स्व:नियोजित आहेत आणि १३ टक्के थिएटर कंपनीसाठी काम करतात. तर अनेक जण वेगवेगळ्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये काम करतात. तर काही छोट्या असाइनमेंटवर काम करतात. पण अभिनेत्याने सतत त्यांची पुढचं काम शोधत राहिलं पाहिजे. कारण एक असाइनमेंट एक दिवस असू शकेत , तर दुसरी काही महिने असू शकते. तुम्ही सातत्याने कोणत्या जाहिराती, मालिकांमध्ये दिसत राहिलात तर तुम्हाला मोठी ऑफर मिळण्याची शक्यता जास्त असते. पण केव्हाही काम करण्याची आणि प्रवासाची सवय ठेवा. मानधन घेत असलेल्या कामाव्यतिरिक्त अभिनेत्याने ऑडिशन, नेटवर्किंग आणि कौशल्ये विकसित करण्यासाठी वेळ दिला पाहिजे.

अभिनेता/अभिनेत्री पगार

अभिनेता किंवा अभिनेत्रीला करियरच्या सुरुवातीच्या टप्प्यात ४१२५७०० रुपये मानधन मिळण्याचा अंदाज असतो. तर करियरच्या मध्यावर ४२०८२१४ रुपये आणि करियरच्या एक अनुभवी टप्प्यावर तब्बल १५८४२६८८ रुपयांपर्यंत मानधन मिळण्याची शक्यता असते.

Indian Army Recruitment 2023 : भारतीय सेनेत नोकरीची संधी! ‘या’ ७१ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु

संभाव्य करियरच्या संधी

अनेकांचे अभिनेता किंवा अभिनेत्री बनण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. त्यामुळे रुपेरी पडद्याापासून दूर होत, नामांकित नाटकामध्ये भूमिका साकारण्याचे स्वप्न बाजूला ठेवले तर इतरही करियरच्या संधी शोधल्या पाहिजेत. नवोदित कलाकार कदाचित क्रूझ लाइनवर किंवा थीम पार्कमध्ये, प्रादेशिक जाहिरातींमध्ये किंवा ऐतिहासिक री-एनेक्टर म्हणून काम करू शकतात. जाणून घेऊन करियरच्या संभाव्य संधी…

व्हॉईस अ‍ॅक्टर:
जाहिराती, व्हिडिओ गेम्स, अ‍ॅनिमेटेड सीरिज किंवा फीचर फिल्म्ससाठी व्हॉइस अ‍ॅक्टर म्हणून काम करु शकता.

दिग्दर्शक:
लिहिलेली स्क्रिप्ट पडद्यावर जिवंत करण्याची जबाबदारी दिग्दर्शकाची असते. या क्षेत्रातील योग्य कौशल्य तुमच्याकडे असल्यास त्यात करियरची संधी आहे. कास्टिंग, स्क्रिप्ट सर्व गोष्टी व्यवस्थितरित्या हाताळाव्या लागतात. तसेच बजेटमध्ये सर्व गोष्टी बसवाव्या लागतात.

निर्माता:
निर्माता कोणताही चित्रपट, टेलिव्हिजन शो, जाहिराती आणि स्टेज प्रॉडक्शनमधील सर्जनशील प्रक्रियेचे व्यवस्थापन आणि देखरेख करतात. अनेकदा निर्माते नेटवर्क किंवा प्रोडक्शन कंपनीसाठी काम करतात, परंतु बरेच जण फ्रीलान्स किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसवरही काम करतात. निर्मात्यावर बजेट सेट करण्यापासून ते क्रू मेंबर्स सांभळण्याची जबाबदारी असते.

एस्क्ट्रा:
केवळ फिल्म, मालिकांमध्येच नाही तर जाहिरात, रिअ‍ॅलिटी शो, आणि काही मोठ्या शोमध्ये गेस्ट म्हणूनही कामाच्या संधी असतात. यातूनही वेगळी इनकम मिळवता येते.