विवेक वेलणकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
दहावीनंतर शास्त्र शाखेतून पुढे जाणाऱ्या अधिकतर विद्यार्थ्यांचा ओढा बारावीनंतर इंजिनीअरिंग किंवा फार्मसी / फार्म डी मध्ये करिअर करण्याकडे असतो. यासाठी एक सीईटी परीक्षा घेतली जाते. इंजिनीअरिंगमध्ये करिअर करण्याकडे कल असलेल्या विद्यार्थ्यांना फिजिक्स, केमिस्ट्री व मॅथेमॅटिक्स या विषयांची सीईटी देणे आवश्यक आहे तर फार्मसीमध्ये करिअर करण्याकडे कल असलेल्या विद्यार्थ्यांना फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी किंवा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स यापैकी कोणत्याही ग्रूपची सीईटी दिलेली चालते. दोन्ही ग्रूपची सीईटी तीन तासांची व दोनशे गुणांची असते. परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड असून प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे असतात. इंजिनीअरिंग तसेच फार्मसी सीईटी (पीसीएम ग्रूप) मध्ये फिजिक्स व केमिस्ट्री विषयांवर प्रत्येकी एक गुणांचे पन्नास पन्नास प्रश्न असतात. यासाठी एकूण ९० मिनिटांचा वेळ मिळतो , त्यानंतरच्या ९० मिनिटांत मॅथेमॅटिक्सचे प्रत्येकी दोन गुणांचे पन्नास प्रश्न असतात. या तीनही विषयांच्या प्रश्नांपैकी २० टक्के प्रश्न इयत्ता अकरावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असतात तर उर्वरित ८० टक्के प्रश्न इयत्ता बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असतात.
फार्मसी सीईटी (पीसीबी ग्रूप) मध्ये फिजिक्स व केमिस्ट्री विषयांवर प्रत्येकी एक गुणांचे पन्नास पन्नास प्रश्न असतात. यासाठी एकूण ९० मिनिटांचा वेळ मिळतो, त्यानंतरच्या ९० मिनिटांत बायोलॉजीचे प्रत्येकी एक गुणांचे शंभर प्रश्न असतात. या तीनही विषयांच्या प्रश्नांपैकी २० टक्के प्रश्न इयत्ता अकरावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असतात तर उर्वरित ८० टक्के प्रश्न इयत्ता बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असतात. परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग नसते. परीक्षा महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत घेतली जाते आणि ती मराठी, इंग्रजी व ऊर्दू या तिन्ही भाषांत उपलब्ध असते. दोन्ही ग्रूपची परीक्षा १६ ते ३० एप्रिल दरम्यान सकाळ व दुपार अशा दोन सत्रांत घेतली जाईल. यासाठी १ मार्च पर्यंत ऑनलाइन पद्धतीने cetcell. mahacet. org या संकेतस्थळावर अर्ज भरता येतील. या परीक्षेतील मार्काचे आधारे इंजिनीअरिंग व फार्मसी साठीची प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. दोन्ही प्रवेश प्रक्रिया स्वतंत्र पणे राबविण्यात येत असल्याने विद्यार्थी दोन्ही प्रवेश प्रक्रियांमध्ये एकाच वेळी भाग घेऊ शकतात. इंजिनीअरिंग प्रवेशासाठी पात्र होण्यासाठी विद्यार्थ्यांना फिजिक्स, मॅथेमॅटिक्स या दोन आणि केमिस्ट्री/ बायोलॉजी/ व्होकेशनल यापैकी एक अशा तीन विषयांत मिळून किमान ४५ टक्के गुण ( अनुसूचित जाती जमाती च्या विद्यार्थ्यांना किमान ४० टक्के) गुण मिळवणे अनिवार्य आहे. फार्मसी / फार्म डी प्रवेशासाठी पात्र होण्यासाठी विद्यार्थ्यांना फिजिक्स, केमिस्ट्री या दोन आणि मॅथेमॅटिक्स/ बायोलॉजी यापैकी एक अशा तीन विषयांत मिळून किमान ४५ टक्के गुण ( अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना किमान ४० टक्के ) गुण मिळवणे अनिवार्य आहे.
इंजिनीअरिंगला जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना फिजिक्स या विषयाची खूप आवड असणे गरजेचे आहे तर फार्मसीला जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना केमिस्ट्री या विषयाची खूप आवड असणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात आज रोजी ३५० हून अधिक इंजिनीअरिंग महाविद्यालये असून दीड लाखांहून अधिक जागा आहेत तर साडेतीनशे फार्मसी महाविद्यालयांमध्ये तीस हजारांहून अधिक जागा आहेत. इंजिनीअरिंग शाखा निवडीसाठी विद्यार्थ्यांना ७५ प्रकारच्या शाखा उपलब्ध आहेत हे विद्यार्थ्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे.