शेती हे असे क्षेत्र आहे. ज्यामध्ये करिअर करण्यासाठी अनेक पर्याय आहेत. आज आपण कृषी व्यवसाय व्यवस्थापन याबाबत माहिती घेणार आहेत. शेती प्रामुख्याने तीन भागांमध्ये विभाजित केली आहे.

● उत्पादन

● प्रक्रिया

● व्यवस्थापन करणे

शेती उत्पादन प्रक्रिया करिअर या संदर्भात आपण याआधी माहिती घेतली आहे. आता व्यवसाय व्यवस्थापनातील करियर पाहूया. शेती क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे छोटे मोठे उद्याोग तसेच आता नाविन्यपूर्ण तयार होणारे बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी, खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या या सर्वांना उद्याोग आधारित स्पर्धांना तोंड द्यावे लागते. अशावेळी व्यवस्थापन कौशल्य असणाऱ्या विद्यार्थ्यांस नोकरीत प्राधान्य मिळते.

कृषी व्यवसाय व्यवस्थापन यामधील काही खासगी संस्थेतील संधी

● कृषी व्यवस्थापक

● कृषी उद्याोजक

● मार्केटिंग तज्ञ

● व्यवसाय विश्लेषक

● सप्लाय मॅनेजर

● खरेदी-विक्री अधिकारी

कृषी व्यवसाय व्यवस्थापन यामध्ये कृषी सहकार्य, कृषि विपणन व्यवस्थापन, उत्पादन व्यवस्थापन, टिकाऊपणा आणि खर्च- नफा व्यवस्थापन या बाबींचा समावेश होतो.

वरील सर्व क्षेत्रांमध्ये व्यवस्थापन करणे व व्यवसाय आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे या गोष्टी समाविष्ट आहेत.

कृषी व्यवसाय व्यवस्थापन ही पदवी महाराष्ट्रातील सर्व शासकीय विद्यापीठे व खाजगी शिक्षण संस्था यामध्ये उपलब्ध आहे. हा चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम आहे.

सरकारी नोकरीमध्ये संधी

● कृषी व्यवस्थापक

● सर्व बँकेमध्ये शेती अधिकारी

● सरकारी कंपन्यांमध्ये व्यवस्थापन मॅनेजर

● शेती व्यवसाय अधिकारी

● कृषी विज्ञान केंद्र इ.

● जनसंपर्क अधिकारी

● क्रेडिट मॅनेजर

कृषि व्यवसाय व्यवस्थापन हा एक अभ्यासपूर्ण विषय आहे. यामध्ये पदवी नंतर एमबीएसुद्धा आपण करू शकतो. व पदवित्तर पदवी धारण करू शकतो.

आधुनिक शेतीमध्ये व पारंपरिक शेती पद्धतीत आता पीक मूल्यांकन करण्यासाठी इंटरनेट उपलब्ध झाले आहे. यामध्ये इंटरनेट ऑफ थिंग्ज हा पर्याय उपलब्ध आहे. यामध्ये पाणी,खते, औषधे व व्यवसाय व्यवस्थापन या बाबी समाविष्ट करून आपण कृषी व्यवस्थापनाची नवीन वाक्य निर्माण करत आहेत. यासाठी व्यवस्थापन कौशल्य आवश्यक आहे.

कृषी व्यवसाय हा शेती निगडित उत्पादनावर आधारित आहे. यामध्ये शेती ही आपल्या भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून आहे. शेतकरी हाच मुळात शेती व्यवस्थापनातील महागुरू आहे. परंतु शेतकऱ्याचे व्यवस्थापन हे अनुभव आधारित आहे. आणि त्यामुळे आता नविन तंत्रज्ञानाची जोड शेतीला देत असताना शेती कौशल्य व व्यवस्थापन या दोन्ही क्षेत्रातील समतोल राखणे गरजेचे आहे.

व्यवस्थापनातील इतर काही करिअरच्या संधी

● लॉजिस्टिक व्यवस्थापन

● स्टार्ट- अप्स व्यवस्थापक

● प्रकल्प व्यवस्थापक

● अन्न ई- व्यवसाय व्यवस्थापक

● ई-कॉमर्स मॅनेजर

● विमा व्यवस्थापक

शेतीमध्ये नवीन स्टार्ट-अप्स झपाट्याने आपली वाढ नोंदवत आहेत. यामध्ये लागवडीपासून काढणीपर्यंत तसेच प्रक्रियेपासून ते व्यवस्थापनापर्यंत या सर्वांना व्यवस्थापन कौशल्य, बाजारपेठेचा अभ्यास, आर्थिक ज्ञान, संवाद कौशल्य, तंत्रज्ञानाचा वापर, शैक्षणिक सल्ला, संशोधन बाबी या गोष्टींची आवश्यकता मोठ्या प्रमाणात आहे. अशावेळी कृषी व्यवस्थापन हा करिअर साठी एक महत्त्वाचा विकल्प म्हणून आपण आत्मसात करू शकतो.

sachinhort.shinde@gmail.com