कृषी वनिकी एक अशी शाखा आहे, की ज्या शाखेची भारताला तसेच महाराष्ट्राला अत्यंत तातडीची गरज आहे. उच्च शिक्षणाच्या जागा मर्यादित असल्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारी व खासगी नोकरीचा सुवर्णकाळ आहे.
कृषी वनिकीव उद्यानविद्या हे क्षेत्र प्रामुख्याने जंगल किंवा वने लागवड तसेच वनस्पती लागवडीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित आहे यामध्ये वने, भाजीपाला, उद्याने, फळे, फुले, औषधी व सुगंधी वनस्पती आणि शोभेच्या झाडांचा समावेश आहे.
भारत देशाला जगामध्ये जंगलाचा व प्राण्यांचा देश म्हणून उदयोगिक क्रांतीच्या अगोदर ओळखले जात होते. औद्याोगिक क्रांतीनंतर जगामध्ये व भारतामध्ये सर्वात जास्त वेगाने जंगल नष्ट झाले. सध्या भारतामध्ये २५.१७ जंगल भाग आहे. जागतिक निकषांमध्ये ३३ पेक्षा जास्त जंगल असणे अपेक्षित आहे. म्हणून कृषी वनिकी एक अशी शाखा आहे, की ज्या शाखेची भारताला तसेच महाराष्ट्राला अत्यंत तातडीची गरज आहे. यामध्ये करिअर एक सुवर्णसंधी आहे.
शासकीय संधी :-
१. वन्यजीव विभाग
२. वन विभाग
३. राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये
खाजगी संधी :-
१. बहुराष्ट्रीय कंपन्या
२. वनजीव संशोधन संस्था
३. खाजगी उद्याने
४. वनरोपवाटिका
महाराष्ट्र मध्ये कृषी वनिकी शिक्षण देणाऱ्या अत्यंत कमी संस्था आहेत. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला या ठिकाणी हे शिक्षण उपलब्ध आहे. पण या ठिकाणी दोन्ही मिळून फक्त ८२ जागा उपलब्ध आहेत. प्रवेश क्षमता अत्यंत कमी असल्याने यामध्ये करिअर एक उत्तम संधी आहे. तसेच उच्च शिक्षणाच्या जागा मर्यादित असल्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारी व खासगी नोकरीचा सुवर्णकाळ आहे. शासकीय नोकरीमधील काही नामनिर्देशित पदे :-
१. वन परिक्षेत्र अधिकारी
२. वनरक्षक
३. वनपाल
४. वनस्पती प्रजननकर्ता
५. प्राणी संवर्धक
६. वनशेती अधिकारी
७. वनशेती व्यवस्थापक
स्पर्धा परीक्षेमध्ये राष्ट्रीय स्तरावर भारतीय वनसेवा व राज्य स्तरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या मार्फत सुद्धा कृषी वनिकी विद्यार्थ्यांना संधी आहे. खासगी क्षेत्रामध्ये काही नामनिर्देशित पदे :-
१. वनसंरक्षक
२. वनशेती अधिकारी
३. वनशेती समन्वय
४. उद्यान निरीक्षक
५. वनशेती शास्त्रज्ञ
जंगल किंवा वने जागतिक अर्थव्यवस्थेत एक मोलाचे क्षेत्र आहे. वन अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर ४५ दशलक्षाहून अधिक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार देत आहे.
उद्यान विद्या क्षेत्रामध्ये नोकरी एक सुंदर करिअर क्षेत्र आहे. सुंदर हा शब्द जाणून बुजून वापरला आहे कारण या क्षेत्रामध्ये सुंदर फुलझाडे आहेत, फळझाडे, भाजीपाला, औषधी व सुगंधी वनस्पती बागकाम नियोजन आणि मसाले पिके या सर्वांचा समावेश होतो. या क्षेत्रामध्ये बहुविधी नोकरीच्या संधी आहेत. त्यामधील आपण काही पाहूया.
शासकीय संधी:-
१. फलोत्पादन निरीक्षक
२. उद्यान अधीक्षक
३. वरिष्ठ शास्त्रज्ञ (उद्यान)
४. कनिष्ठ शास्त्रज्ञ (उद्यान)
५. सहाय्यक प्राध्यापक
खासगी नोकरीच्या संधी:-
१. फलोत्पादन अधिकारी
२. प्रकल्प व्यवस्थापक
३. फलोत्पादन शास्त्रज्ञ
४. उद्यान अधीक्षक
५. लँडस्केपिंग डिझायनर
६. माळी प्रशिक्षक
७. नर्सरी व्यवस्थापक
उद्यानविद्या क्षेत्राची व्याप्ती इतर विषयांशी निगडित आहे. त्यामुळे यामधील करिअर एकमेकांशी जोडले आहे.
महाराष्ट्रामध्ये चार कृषी विद्यापीठ अंतर्गत उद्यानविद्या पदवी अभ्यासक्रम राबविले जातात.
उद्यानविद्या या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र कृषी विद्यापीठाने सन २०१०-११ वर्षानंतर पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये स्पेशलायझेशन केले आहे. त्यामुळे यामध्ये करिअर करताना विविध पर्यायामधून आपण एक पर्याय निवडू शकतो. खालील प्रमाणे पर्याय उपलब्ध आहेत.
१. फळबाग पदव्युत्तर अभ्यासक्रम
२. भाजीपाला पदव्युत्तर अभ्यासक्रम
३. फुलशेती पदव्युत्तर अभ्यासक्रम
४. औषधी व सुगंधी वनस्पती पदव्युत्तर अभ्यासक्रम
५. लँडस्केप पदव्युत्तर अभ्यासक्रम
६. काढणी पश्चात तंत्रज्ञान पदव्युत्तर अभ्यासक्रम
वरील क्षेत्रामध्ये आपल्या आवडीनिवडीनुसार आपण क्षेत्र निवड करू शकतो. फळे व भाजीपाला या पिकामध्ये काढणी ते ग्राहकापर्यंत पोहोचेपर्यंत ३० ते ४० माल खराब होतो किंवा नाशवंत होत आहे अशावेळी काढणी पश्चात तंत्रज्ञांनामध्ये आपण आपले करिअर निवडून यातील १ ते ५ पर्यंत जरी फळे व भाजीपाला यावर प्रक्रिया करू शकलो तरी आपल्या करिअर बरोबर भारतीय अर्थव्यवस्थेला व पर्यायाने शेतकऱ्यांना लाखो रुपयांची मदत करू शकतो.
(लेखक सातारा येथील लोकनेते बाळासाहेब देसाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत)
sachinhort. shinde@gmail. com