अतुल कहाते
‘एआय’ (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) हा आजचा परवलीचा शब्द बनला आहे. कुठल्याही क्षेत्राला किंवा कामाला एआयचा स्पर्श झाला नाही, असं आपण म्हणूच शकत नाही. या नव्या जगामध्ये एआयकडे आपण कसं बघायचं आणि त्याचा वापर आपली रोजगारक्षमता वाढवण्यासाठी कसा करायचा, यावर लेखक या दर मंगळवारी प्रसिद्ध होणाऱ्या या नव्या सदरात भर देणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
एआय म्हणजे नेमकं काय याची मुळात नीटशी व्याख्या करायला हवी. अनेकदा संगणक आणि एआय यांच्यामध्ये लोक गल्लत करतात. संगणकाचं मुख्य आणि खरं म्हणजे एकमेव काम हे त्याला आपण दिलेल्या सूचनांचं इमानइतबारे पालन करणं आणि त्यानुसार आपलं काम पूर्ण करून देणं, हे असतं. आपण दिलेल्या सूचना बरोबर आहेत का, किंवा त्यात काही चुका शिल्लक राहिलेल्या आहेत का; याच्याशी संगणकाला काही देणंघेणं नसतं. याचं मुख्य कारण म्हणजे चूक किंवा बरोबर म्हणजे काय, याची व्याख्याच त्याला करता येत नाही. साहजिकच आपण त्याला जे सांगू, तेच ब्रह्मवाक्य या धारणेवर आधारित असं संगणकाचं काम चालतं. एआयमध्ये मात्र तसं होत नाही. एआयमध्ये संगणक स्वत: बरंच काही शिकून घेतो आणि त्या शिक्षणाच्या आधारे तो आपलं काम करत राहतो. साहजिकच इथे आंधळेपणानं काम करण्याऐवजी योग्य-अयोग्य, बरोबर-चूक अशा गोष्टींच्या बाबतीत संगणक स्वत:च निर्णयक्षम असतो. म्हणूनच संगणक म्हणजे एआय नव्हे, हे आधी मनाशी पक्कं केलं पाहिजे.
जर संगणक स्वत: सगळं शिकून घेऊ शकत असेल तर त्याला हे शिक्षण मिळतं तरी कुठून? यासाठी माणसालाच हे काम करावं लागतं. म्हणजेच संगणकानं कसं शिकलं पाहिजे, हे माणूसच आधी ठरवतो. त्यानुसार संगणकाला सगळं शिकून घ्यायला तो मदत करतो. त्यानंतर एकदा संगणक ते शिकला, की त्यानंतर संगणक स्वत:च सगळी कामं आपोआप करायला लागतो. त्याला आपण त्यानंतर खास सूचना देऊन काम करून घेण्याची गरज उरत नाही. हीच एआयची खासियत आहे.
एआयचं क्षेत्र म्हणूनच एकदम भन्नाट आहे. आजवर आपल्याला अशक्यप्राय वाटत असलेल्या गोष्टी एआयमुळे सहजसाध्य झालेल्या आहेत. साहजिकच जगातल्या जवळपास सगळ्या कामांवर आणि कामांच्या क्षेत्रांवर एआयचा मोठा परिणाम झालेला आहे. अनेक लोकांचे रोजगार धोक्यात येण्यापासून नव्या संधी उपलब्ध होईपर्यंत असंख्य शक्यता या क्षेत्राच्या बाबतीत आपल्याला बघायला मिळतात. तसंच अक्षरश: दररोज या क्षेत्रात नवं काहीतरी घडत राहतं. यामुळे अगदी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करत असलेल्या लोकांनाही अवाक व्हायला होतं आणि आपण जर स्वत:ला अद्यायावत ठेवलं नाही तर आपण काळाच्या वेगासमोर टिकून राहू शकणार नाही, अशी भावना त्यांच्या मनात वाढीला लागते.
अशा ‘एआय-मय’ काळात सतत शिकणं आणि जुनं अनावश्यक असलेलं विसरून जाणं हे आता इथून पुढे सगळ्यांना करत राहणं भाग आहे. या लेखमालेचा मुख्य उद्देश तोच आहे. एआयशी संबंधित असलेली काही मूलभूत तत्त्वं, या क्षेत्रामध्ये सतत घडत असलेल्या नवनव्या घडामोडी, त्यांचा रोजगार आणि भविष्यातल्या संधी यांच्याशी असलेला संबंध असे अनेक पदर उलगडण्याचा हा प्रयत्न आहे. सर्वसामान्यपणे आपल्या आकलनाबाहेर किंवा वाचनाच्या परिघाबाहेर असलेल्या गोष्टी समाविष्ट करण्याचा आपला प्रयत्न राहील. आपलं कार्यक्षेत्र कुठलंही असो; त्यात एआयची भूमिका नेमकी काय असेल आणि आपण त्यात प्रावीण्य मिळवण्यासाठी काय करायला हवं, हा त्यामागचा मुख्य हेतू असेल.
सुमारे १९५० च्या दशकात एआयच्या संकल्पनेची पाळंमुळं रचली गेली असली तरी खऱ्या अर्थानं त्यानं झेप घेतली आहे ती अगदी अलीकडच्या काळात. यामागची मुख्य कारणं म्हणजे एआयमध्ये काय शक्य आहे/नाही हे तज्ज्ञांना हळूहळू उमगत गेलं. शिवाय एआयचा सगळा डोलारा ज्या ‘डेटा’वर उभा आहे त्याची साठवणूक, निगा, त्याचं कामकाज यासंबंधीचं तंत्रज्ञानही उभं राहण्यासाठी अनेक दशकांचा अवधी जावा लागला. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एआयचं कामकाज चालवण्यासाठी संगणकांची क्षमता आणि त्यांचा वेग ज्या पातळीवर जाणं आवश्यक होतं तो काळ आता उगवला आहे. साहजिकच एआयचा प्रवास आता विलक्षण वेगानं सुरू आहे. आपणही तो वेग पकडण्याचा प्रयत्न करू!
(लेखक गेली ३० वर्षे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत आहेत.)
akahate@gmail. com