एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेड येथे ड्युटी ऑफिसर, कनिष्ठ अधिकारी, ग्राहक सेवा कार्यकारी, रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर आणि हँडीमन पदांसाठीच्या १४५ जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. या भरतीसाठीची मुलाखत ३ ते ७ एप्रिल २०२३ या कालावधीत घेतली जाणार आहे. जाईल. एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेड भरती २०२३ बाबतची अधिक माहिती जाणून घेऊया.
पदाचे नाव आणि त्यासाठी भरल्या जाणाऱ्या जागा पुढीलप्रमाणे –
पदाचे नाव | रिक्त पदे |
ड्यूटी ऑफिसर | ०४ |
ज्युनियर ऑफिसर – पॅसेंजर | ०१ |
ज्युनियर ऑफिसर – टेक्निकल | ०२ |
कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव | १६ |
रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव | १८ |
यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर | ०६ |
हँडीमन | ९८ |
शैक्षणिक पात्रता –
ड्यूटी ऑफिसर – कोणत्याही शाखेतील पदवी आणि १२ वर्षांचा अनुभव.
ज्युनियर ऑफिसर (पॅसेंजर) – कोणत्याही शाखेतील पदवी ९ वर्षे अनुभव किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + MBA + ६ वर्षे अनुभव.
ज्युनियर ऑफिसर (टेक्निकल) – मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल/ प्रोडक्शन/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि
कम्युनिकेशन विषयात इंजिनिअरिंग पदवी + हलके वाहन चालक परवाना (LMV).
कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव – कोणत्याही शाखेतील पदवी.
हेही वाचा- सारस्वत बँकेत १५० पदांसाठी होणार भरती, ८ एप्रिलपर्यंत करा अर्ज
रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव – मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल/ प्रोडक्शन/ इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा मोटर व्हेईकल/ ऑटो इलेक्ट्रिकल/ एअर कंडिशनिंग/ डिझेल मेकॅनिक/ बेंच फिटर/ वेल्डर विषयात ITI/ NCVT + अवजड वाहन चालक परवाना (HMV) + १ वर्ष अनुभव.
यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर – १० वी उत्तीर्ण + अवजड वाहन चालक परवाना (HMV).
हँडीमन – या पदासाठी उमेदवार १० वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
वयोमर्यादा –
हेही वाचा- १० वी पास असणाऱ्यांना RBI मध्ये नोकरीची मोठी संधी; ‘या’ पदासाठी भरती, आजच अर्ज करा
खुला प्रवर्ग – प्रत्येक पदानुसार वेगवेगळी वयोमर्यादा आहे त्यासाठी कृपया जाहिरात बघा.
ओबीसी – ३ वर्षे सूट.
मागासवर्गीय – ५ वर्षे सूट.
अर्ज शुल्क –
खुला प्रवर्ग – ५०० रुपये
मागासवर्गीय / माजी सैनिक – अर्ज शुल्क नाही.
नोकरी ठिकाण – नागपूर</strong>
मुलाखतीचे ठिकाण – हॉटेल आदी प्लॉट नंबर ०५ इंडीयन ऑईल पेट्रोल पंपाजवळ एअरपोर्ट रोड नागपूर – ४४००२५
महत्वाच्या तारखा –
मुलाखतीची सुरवात – ३ एप्रिल २०२३ सकाळी ९.३० मिनिटांनी
मुलाखतीचा शेवट – ७ एप्रिल २०२३ १२.३० मिनिटांनी
जाहिरात व अर्ज पाहण्यासाठी https://drive.google.com/file/d/1XO7PBhK5jiQhpNn_kfF7N6KsDaZqfdpj/view या बेवसाईला भेट द्या.
भरतीसंबंधीत अधिकच्या माहितीसाठी http://www.aiasl.in/ या बेवसाईटला अवश्य भेट द्या.