एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AI Airport Services Limited) (AIASL) (पूर्वीची एअर इंडिया ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड) (AiATSL) – मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट येथे पुढील ग्राऊंड ड्युटी पदांची भरती. (उमेदवारांना नेमून दिलेल्या दिवशी वॉक-इन भरतीसाठी सकाळी ०९.३० ते १२.३० पर्यंत हजर रहावे.)
एकूण रिक्त पदे मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट – ८२८. (Ref. No. AIASL/ ०५-०३/ ६९९ dt. ०५.१२.२०२३)
(१) कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह – २१७ पदे. एकत्रित वेतन – दरमहा रु. २५,९८०/-.
पात्रता : (दि. १ डिसेंबर २०२३ रोजी) पदवी (१० २ ३ पॅटर्न) आणि एअरलाईन/ GHA/ Cargo/ Airline Ticketing मधील अनुभव किंवा एअरलाईन डिप्लोमा किंवा IATA- UFTAA/ IATA- FIATA/ IATA- DGR/ IATA- CARGO डिप्लोमा. संगणकावरील कौशल्य आवश्यक. हिंदी/ इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व (लिहिणे/ बोलणे).
(२) रँप सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह – १३८ पदे. एकत्रित वेतन – दरमहा रु. २५,९८०/-.
पात्रता : मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ प्रोडक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स/ ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग डिप्लोमा किंवा (हिंदी/ इंग्रजी/ स्थानिय भाषा या विषयांसह) १० वी उत्तीर्ण आणि मोटर वेहिकल ऑटो इलेक्ट्रिकल/ एअर कंडिशनिंग/ डिझेल मेकॅनिक/ बेंच फिटर/ वेल्डर ट्रेडमधील आयटीआय आणि ठउळश्ळ सर्टिफिकेट (एकूण ३ वर्षं कालावधी) आणि HMV ड्रायव्हिंग लायसन्स (ट्रेड टेस्टच्या वेळी सादर करणे.)
हेही वाचा >>> एमपीएससीची तयारी : माहिती अधिकार व लोकसेवा हक्क
(३) युटिलिटी एजंट कम रँप ड्रायव्हर – १६७ पदे. एकत्रित वेतन – दरमहा रु. २३,६४०/-
पात्रता : १० वी उत्तीर्ण (इक्विपमेंट ऑपरेटींग परमिट (EOP) असल्यास प्राधान्य). (ट्रेड टेस्टसाठी येताना टश् ड्रायव्हिंग लायसन्स घेऊन येणे आवश्यक.)
(४) ज्युनियर ऑफिसर – टेक्निकल – २४ पदे. एकत्रित वेतन – दरमहा रु. २८,२००/-
पात्रता : बी.ई. (मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल/ प्रोडक्शन/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल अॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कम्युनिकेशन इंजिनिअरींग)
उमेदवाराकडे हलके वाहन (LMV) चालविण्याचा परवाना असणे आवश्यक. निवड झाल्यास हजर झाल्या दिवसापासून १२ महिन्यांच्या आत अवजड वाहन (HMV) ड्रायव्हिंग लायसन्स मिळविणे आवश्यक. (Aviation experience किंवा जीएस् इक्विपमेंट्स/ वेहिकल/ हेवी अर्थ मुव्हर्स इक्विपमेंट मेंटेनन्समधील अनुभव असल्यास प्राधान्य.)
वरील सर्व पदांची भरती करार पद्धतीने ३ वर्षांच्या मुदतीसाठी (Fixed Term Contract) केली जाईल. प्रतिक्षा यादीसुद्धा बनविली जाईल. उमेदवारांची कामगिरी पाहून कराराचा कालावधी वाढविला जावू शकतो.
मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टमधील पदांसाठी वॉक-इनसाठीचे ठिकाण – जीएसडी काँप्लेक्स, सहार पोलीस स्टेशनजवळ, सीएसएमआय एअरपोर्ट, टर्मिनल-२, गेट नं. ५, सहार, अंधरी (पूर्व), मुंबई – ४०० ०९९.
वयोमर्यादा : (दि. १ डिसेंबर २०२३ रोजी) पद क्र. १ ते ४ पदांसाठी २८ वर्षे. पद क्र. ५ सिनियर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह पदासाठी ३० वर्षे.
वयोमर्यादेत सूट इमाव – ३ वर्षे, अजा/ अज – ५ वर्षे).
निवड पद्धती : पद क्र. २ व ३ साठी (अ) ट्रेड टेस्ट (ट्रेड नॉलेज आणि HMV ड्रायव्हिंग टेस्ट), (ब) इंटरव्ह्यू.
पद क्र. १ (कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह), पद क्र. ५ सिनियर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, (अ) पर्सोनल/ Virtual इंटरव्ह्यू आणि/ किंवा (ब) ग्रुप डिस्कशन.
निवड प्रक्रिया : एकाच दिवशी किंवा पुढील दिवशी घेतली जाईल.
अर्जाचे शुल्क : रु. ५००/-. (डिमांड ड्राफ्ट ‘AI Airport Services Limited’ यांचे नावे मुंबई येथे देय असावा.) (अजा/ अज/ माजी सैनिक यांना फी माफ आहे.) (डिमांड ड्राफ्टच्या मागे उमेदवाराने आपले पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर लिहावा.)
रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटो अर्जावर चिकटवावा. (फोटो ३ महिन्यांपूर्वी काढलेला नसावा.)
अर्जाच्या फॉर्मवरील अनु.क्र. ३, ४, ८, ११ ते १४, १६, १७ व १८ शी संबंधित स्वयंसाक्षांकीत प्रती जोडाव्यात आणि अनु.क्र. २० वरील Declaration उमेदवाराने सही करून.
अर्जाचा विहीत नमुना www. aiasl. in या संकेतस्थळावरील जाहिरातीमध्ये उपलब्ध आहे.
पात्र उमेदवारांनी वर नमूद केलेल्या वॉक-इन दिनांकास सकाळी ९.३० ते १२.३० वाजे दरम्यान विहीत नमुन्यातील पूर्ण भरलेल्या अर्जासोबत इतर मूळ कागदपत्रे व स्वयंसाक्षांकीत प्रती घेऊन उपस्थित रहावे.
(५) सिनियर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह – १७८ पदे. एकत्रित वेतन – दरमहा रु. २६,९८०/-.
पात्रता : पदवी उत्तीर्ण. (१०+२+३ पॅटर्न) (पुढील पात्रता असल्यास प्राधान्य देण्यात येईल. एअरलाईन Ticketing भाडी, आरक्षण, कॉम्प्युटराईज्ड पॅसेंजर चेकींगमधील किमान ५ वर्षांचा अनुभव) संगणकावरील कौशल्य आवश्यक. हिंदी/ इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व (लिहिणे / बोलणे)
आणि इतर सारी पदे जेथे १२/१६/१८ वर्षे अनुभव आवश्यक आहे जसे की, (६) ड्युटी मॅनेजर रँप, (७) डेप्युटी मॅनेजर रँप (मेंटेनन्स), (८) ड्युटी मॅनेजर पॅसेंजर, (९) ड्युटी ऑफिसर कार्गो, (१०) ड्युटी ऑफिसर – पॅसेंजर, (११) ड्युटी मॅनेजर – कार्गो, (१२) ज्युनियर ऑफिसर कार्गो, माहिती AIASL च्या वेबसाईटवरील जाहिरातीमध्ये उपलब्ध आहे.
वॉक-इन-सिलेक्शन दि. २१/२२/२३ डिसेंबर २०२३ – (२) सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह – १३८ पदे आणि पद क्र. (३) युटिलिटी एजंट कम रँप ड्रायव्हर – १६७ पदे. (४) ज्युनियर ऑफिसर – टेक्निकल – २४ पदे व इतर ६ ते १२ अनुक्रमांकावरील पदांसाठी
वॉक-इन-सिलेक्शन दि. १८/१९/२० डिसेंबर २०२३ – पद क्र. (१) कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह – २१७ पदे, (५) सिनियर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह – १७८ पदे.
इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL), हैदराबाद (भारत सरकार, डिपार्टमेंट ऑफ अॅटॉमिक एनर्जी) (Advt. No. २२/२०२३). ‘ग्रॅज्युएट इंजिनिअर/ टेक्निशियन डिप्लोमा अॅप्रेंटिसेस’ च्या एकूण ३६३ पदांची अॅप्रेंटिसेस अॅक्ट, १९६१ अंतर्गत भरती. पुढील बँचेसमधील इंजिनीअर्सना अॅप्रेंटिसशिप करण्याची संधी.
(I) ग्रॅज्युएट इंजिनीअर अॅप्रेंटिसेस (GEA) – एकूण २५० पदे. स्टायपेंड – दरमहा रु. ९,०००/-.
(१) इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग (ECE)
(२) कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंग (CSE)
(३) मेकॅनिकल इंजिनीअरिंग (MECH)
(४) इलेक्ट्रिकल अॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग (EEE)
(५) सिव्हील इंजिनीअरिंग
(६) इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड इन्स्ट्रूमेंटेशन इंजिनीअरिंग (EIE)
पात्रता : ग्रॅज्युएट इंजिनिअर अॅप्रेंटिसेस (GEA) साठी संबंधित विषयातील इंजिनीअरिंग पदवी १ एप्रिल २०२१ किंवा त्यानंतर उत्तीर्ण.
(II) टेक्निशियन (डिप्लोमा) अॅप्रेंटिसेस (TA) – एकूण ११३ पदे. स्टायपेंड – दरमहा रु. ८,०००/-.
पात्रता : संबंधित विषयातील इंजिनीअरिंग डिप्लोमा १ एप्रिल २०२१ किंवा त्यानंतर उत्तीर्ण.
वयोमर्यादा : दि. ३१ डिसेंबर २०२३ रोजी २५ वर्षेपर्यंत. (इमाव – २८ वर्षे, अजा/ अज/ दिव्यांग – ३० वर्षेपर्यंत).
निवड पद्धती : इंजिनीअरिंग पदवी/ पदविका परीक्षेतील गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड केली जाईल.
२१/२२ डिसेंबर २०२३ रोजी कागदपत्र पडताळणीसाठी उमेदवारांना बोलाविले जाईल. यातून यशस्वी ठरलेल्या उमेदवारांची निवड यादी ECIL च्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल.
उमेदवारांनी जॉईन करण्याची प्रक्रिया दिनांक ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण केली जाईल.
अॅप्रेंटिसशिप ट्रेनिंग सुरू होण्याचा दिनांक – १ जानेवारी २०२४.
ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी ठअळर ऑनलाइन पोर्टल https://nats.education.gov.in वर रजिस्ट्रेशन करावे.
ऑनलाइन अर्ज ECIL ची वेबसाईट आहे https://www.ecil.co.in वर दि. १५ डिसेंबर २०२३ (१६.०० वाजे)पर्यंत करावा. निवडलेल्या उमेदवारांनी ECIL जॉईन करताना पुढील सर्टिफिकेट्स सादर करणे आवश्यक. (१) पात्रता परीक्षा ज्या इन्स्टिट्यूटमधून उत्तीर्ण केली, त्यांचेकडील Character/ Conduct Certificate, (२) संबंधित जिल्ह्याचे सुपरिटेंडंट ऑफ पोलीस यांनी जारी केलेले पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट, (३) फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट सिव्हील असिस्टंट सर्जन यांनी जारी केलेले.