AIESL Recruitment 2023: एयर इंडियामध्ये लवकरच एयरक्राफ्ट टेक्निशिअन्सच्या रिक्त पदांसाठीची मेगा भरती सुरु होणार आहे. एयर इंडिया इंजिनीअरिंग सर्व्हिसेस लिमिटेडद्वारे या ठराविक जागांसाठी नव्या उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या निवडप्रक्रियेची सुरुवात २० फेब्रुवारी रोजी झाली आहे. इच्छुक उमेदवारांना एआयईएसएलच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या वेबसाइटवर संबंधित माहिती सविस्तरपणे देण्यात आली आहे.

एआयईएसएलने आयोजित केलेल्या या भरतीमध्ये एकूण रिक्त पदांची संख्या ही ३७१ आहे. एयर इंडियाच्या या विभागाने मेगाभरतीबद्दल घोषणापत्रक देखील काढले आहे. त्यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, एयरक्राफ्ट टेक्निशिअनच्या जागेसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे एसएससी/एनसीव्हिटी/डिप्लोमा इन इंजिनिअरिंग यांपैकी किमान एक पदवी असायला हवी. तसेच त्यांचे शिक्षण एखाद्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून झालेले असणे आवश्यक आहे. जनरल आणि अनुभवी एक्स-सर्व्हिसमॅन यांच्यासाठी वयोमर्यादा वयवर्ष ३५ इतकी आहे. ओबीसी वर्गातील उमेदवारांसाठी ३८ वयवर्ष, तर एससी/एसटी वर्गातील उमेदवारांसाठी ४० वयवर्ष अशी वयाची अट आहे.

rte registration process starting from Tuesday January 14
आरटीई प्रवेशांसाठी अर्ज प्रक्रिया उद्यापासून, किती जागा उपलब्ध?
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Investiture Ceremony Indian Army , Indian Army,
व्यावसायिकतेत लष्कर शिखरावर
Nagpur airport loksatta news
नागपूर विमानतळ विस्तार, प्रशासन मिशन मोडवर
Sub Registrar Office, Registration , Devendra Fadnavis,
कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात दस्तनोंदणी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Chief Minister Devendra Fadnavis orders to complete airport works at the earliest Mumbai news
विमानतळांची कामे वेगाने पूर्ण करा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश
bmc has taken strict steps on constructions due air quality
वायुप्रदूषण नियंत्रणात येईपर्यंत बांधकामावरील निर्बंध कायम, भायखळा परिसराच्या पाहणीअंती भूषण गगराणी यांची स्पष्टोक्ती
Image of Air India plane or in-flight Wi-Fi logo
३५ हजार फुटांवरही वापरता येणार मोफत इंटरनेट, Air India पुरवणार खास सुविधा

डिजिटल मार्केटमध्ये टिकून राहायचे असल्यास शिका ‘या’ गोष्टी; एक्सपर्ट बनून कमवाल बक्कळ पैसे

पात्रता आणि इच्छा असणारे उमेदवार aiesl.in. या एयर इंडिया इंजिनीअरिंग सर्व्हिसेस लिमिटेडच्या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया २० फेब्रुवारी २०२३ रोजी झाली आहे. उमेदवार २० मार्च २०२३ पर्यंत ऑनलाइन अर्ज करु शकतात. या एका महिन्याच्या कालावधीनंतर अर्ज केल्यास तो स्विकारला जाणार नाही.

ITBP Recruitment 2023: कॉन्स्टेबल GD पदासाठी मोठी भरती; जाणून घ्या अर्ज भरण्याची शेवटची तारीख

जनरल (खुला वर्ग), ओबीसी आणि ईडब्लूएस वर्गातील उमेदवारांना रिक्त जागांसाठी अर्ज करताना १००० रुपये भरावे लागतील. तर एससी, एसटी आणि एक्स-सर्व्हिसमॅन यांच्याकडून अर्ज करण्यासाठी ५०० रुपये आकारले जातील. भरतीसंबंधित अपडेट्स जाणून घेण्यासाठी वेबसाइट सतत चेक करत राहणे आवश्यक आहे.

Story img Loader