AIIMS Delhi Recruitment 2023: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान दिल्ली(AIIMS) दिल्लीमध्ये नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी खुशखबर आहे. एम्स दिल्ली आणि एनएसीआईद्वारे (NCI) गट ए, बी आणि सी शिक्षकेत्तर पदांसाठी एम्स दिल्ली भरती २०२३ साठी अधिसुचना जाहीर केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया २४ एप्रिल २०२३ पासून सुरू होत आहे. या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र असलेले उमेदवार एम्स दिल्लीच्या aiims.edu या अधिकृत वेबसाइटला १२ मे २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत भेट देऊन अर्ज करू शकतात.
जाहीर केलेल्या दिल्ली एम्सच्या अधिकृत अधिसूचनेनुसार, एम्स दिल्ली भरती अंतर्गत एकूण २८१ शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी रिक्त जागा भरल्या जातील. याशिवाय उमेदवार पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि एम्स भरतीबद्दल इतर माहिती येथे जाणून घेऊ शकता.
एम्स दिल्ली शिक्षकेत्तर कर्मचारी भरती २०२३ बद्दल तपशील
एम्स दिल्ली भरती २०२३ शिक्षकेत्तर कर्मचारी भरती अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. एम्स दिल्ली भरतीबद्दल उमेदवार खाली अधिक तपशील मिळवू शकतात.
संस्थेचे नाव –ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स), नवी दिल्ली
पदाचे नाव – शिक्षकेत्तर कर्मचारी
रिक्त पदांची संख्या – २८१
अर्ज कसा करायचा – ऑनलाइन
नोकरी स्थान – दिल्ली/हरियाणा
अधिकृत संकेतस्थळ – aiimsexams.ac.in
हेही वाचा : आयुर्वेद विभागात सरकारी अधिकारी होण्याची संधी, ६३९ पदांसाठी होणार भरती, मिळेल चांगला पगार
एम्स दिल्ली शिक्षकेत्तर कर्मचारी भरती २०२३ साठी महत्त्वाच्या तारखा
सरकारी नोकरी इच्छूक उमेदवार AIIMS दिल्ली भरती २०२३च्या सर्व महत्त्वाच्या तारखा खाली दिलेल्या माहितीवरून जाणून घेऊ शकतात.
एम्स दिल्ली भरती २०२३ अर्ज प्रक्रियेस सुरू झाल्याची तारीख – २४ एप्रिल २०२३
एम्स दिल्ली भरती २०२३ची शेवटची तारीख – १३ मे २०२३ (सांयकाळी ५ वाजेपर्यंत)
एम्स दिल्ली भरती २०२३ परीक्षेची तारीख – जाहीर होईल
हेही वाचा – MPPSC Recruitment 2023: एमपीपीएससीने ग्रंथपाल पदासाठी काढली भरती, कोण अर्ज करु शकते, जाणून घ्या
एम्स दिल्ली भरती२०२३ ऑनलाइन अर्ज करा लिंक: येथून अर्ज करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवार खाली नमूद केलेल्या थेट लिंकला देखील भेट देऊ शकतात. – https://recruitgrpabc2022.aiimsexams.ac.in/
एम्स दिल्ली भरती २०२३ नोंदणी: कसे अर्ज करावे?
- पात्र उमेदवार एम्स दिल्ली भरती २०२३ साठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली क्रमाने पालन करून सहजपणे अप्लाई करू शकता.
- एम्सच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या, aiimsexams.ac.in.
- मुख्यपृष्ठावरील भरती विभागावर क्लिक करा.
- पुढील पानावर, “रिक्रूटमेंट ग्रुप-ए (नॉन-फॅकल्टी), ग्रुप-बी आणि ग्रुप सी” लिंकवर क्लिक करा.
- नवीन पृष्ठावर, अर्जावरील सर्व आवश्यक तपशील भरा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि फी भरा.
- शेवटी एम्स दिल्ली भरती २०२३ अर्ज सबमिट करा आणि प्रिंट करा.
दिल्ली एम्स भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना सूचना काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला दिला जातो. त्यानंतर ऑनलाइन अर्ज करा.