AIIMS Nagpur Recruitment 2024 : नागपूर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेंतर्गत सध्या ‘प्रोजेक्ट स्टाफ नर्स’ [Project Staff Nurse] या पदासाठी भरती करण्यात येणार आहे. या पदासाठी नेमक्या किती जागा उपलब्ध आहेत ते अर्ज करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी पाहावे. तसेस, या पदासाठी अर्ज करण्यासाठी पात्रता निकष, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख या सर्व महत्त्वाच्या गोष्टींबद्दल जाणून घ्यावे.

AIIMS Nagpur Recruitment 2024 : पद आणि पदसंख्या

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमध्ये प्रोजेक्ट स्टाफ नर्स या पदासाठी एकूण एका रिक्त जागेवर भरती करण्यात येणार आहे.

TET, AI Technology TET, TET candidates,
टीईटी परीक्षेत एआय तंत्रज्ञान वापरल्याचा परिणाम काय? किती उमेदवारांनी दिली परीक्षा?
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन
Crime against MNS candidate in Nashik East Constituency
नाशिक पूर्व मतदार संघातील मनसे उमेदवाराविरुध्द गुन्हा, पक्ष सचिवाच्या घरात लूट
success story of utham gowda started his own startup owner of captain fresh company
जास्त पगाराची नोकरी सोडली अन् घेतली ‘ही’ जोखीम, आता आहेत कोटींचे मालक; वाचा उथम गौडा यांचा प्रेरणादायी प्रवास
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
PM Vidyalakshmi Scheme
उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज; काय आहे ‘पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना’?
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ

AIIMS Nagpur Recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता

प्रोजेक्ट स्टाफ नर्स या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे खालीलप्रमाणे शिक्षण असणे आवश्यक आहे –

उमेदवाराचे तीन वर्षांचे जनरल नर्सिंग आणि मिडवाइफ (GNM) कोर्समधील किमान द्वितीय श्रेणीतील किंवा समतुल्य CGPA असणारे शिक्षण पूर्ण असावे.

तसेच त्यांनी नोंदणीकृत परिचारिका अथवा ANM रजिस्टर्ड कोणत्याही राज्यातील नोंदणीकृत परिचारिका असणे आवश्यक आहे.

हेही वाचा : MRVC Recruitment 2024 : मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन अंतर्गत नोकरीची संधी! पाहा माहिती

AIIMS Nagpur Recruitment 2024 : वेतन

प्रोजेक्ट स्टाफ नर्स या पदावर निवड झालेल्या उमेदवारास, दरमहा २३,६००/- रुपये इतके वेतन देण्यात येईल.

AIIMS Nagpur Recruitment 2024 – अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अधिकृत वेबसाईट लिंक –
https://aiimsnagpur.edu.in/

AIIMS Nagpur Recruitment 2024 – अधिसूचना –
https://aiimsnagpur.edu.in/writereaddata/AIIMS/files/1717225669665ac8c5278eaAdvertisement_IR_PTC.pdf

AIIMS Nagpur Recruitment 2024 : अर्ज आणि अर्ज प्रक्रिया

या पदासाठी नोकरीचा अर्ज पाठविण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
त्यासाठी अर्जाचा फॉर्म स्कॅन करून, idmodellingdhr@gmail.com या ई-मेल अॅड्रेसवर पाठवायचा आहे.
तसेच, अधिसूचनेमध्ये दिलेला गूगल फॉर्मदेखील भरायचा आहे.
या नोकरीसाठी अर्ज पाठविणाऱ्या उमेदवारांसाठी ३० वर्षे अशी वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे.
अर्ज पाठविल्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.
मुलाखतीवरून उमेदवारांची निवड करण्यात येईल.
वरील प्रोजेक्ट स्टाफ नर्स या पदासाठी नोकरीचा अर्ज उमेदवारांनी अंतिम तारखेआधी भरणे अनिवार्य आहे.
अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख ही १५ जून २०२४ अशी आहे.
अर्जाचा फॉर्म पाठविण्याआधी उमेदवारांनी सर्व माहिती अचूक आणि योग्य पद्धतीने भरली गेली असल्याची खात्री करावी. नंतरच अर्ज पाठवावा.

वरील नोकरीसंबंधी उमेदवारांना अधिक माहिती हवी असल्यास त्यांनी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. अथवा नोकरीची अधिसूचना वाचावी. वेबसाईट आणि अधिसूचना वर नमूद केलेली आहे.