Northern Railway Bharti 2023: रेल्वे विभागात काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे उत्तर रेल्वेने काही जागांसाठीची भरती जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत “ज्येष्ठ रहिवासी” पदांच्या एकूण ३४ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. भरतीसाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि मुलाखतीची तारीख याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पदाचे नाव – ज्येष्ठ रहिवासी

एकूण पदे – ३४ पदे

निवड प्रक्रिया – मुलाखती

मुलाखतीचा पत्ता – सभागृह, पहिला मजला, शैक्षणिक ब्लॉक, उत्तर रेल्वे सेंट्रल हॉस्पिटल, नवी दिल्ली

मुलाखतीची तारीख – १२ आणि १३ जुलै २०२३

अधिकृत वेबसाईट – nr.indianrailways.gov.in

हेही वाचा- महापारेषणमध्ये नोकरीची मोठी संधी! ३ हजारांहून अधिक पदांसाठी लवकरच होणार भरती, जाणून घ्या सविस्तर

शैक्षणिक पात्रता –

  • संबंधित स्पेशॅलिटमध्ये MCI/NBE द्वारे मान्यताप्राप्त पदव्युत्तर पदवी.
  • MCI/NBE द्वारे मान्यताप्राप्त पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा.
  • SR-ऑन्कॉलॉजी – उमेदवार MD/DNB (सामान्य औषध) किंवा MS/DNB (सामान्य शस्त्रक्रिया) असावेत आणि ऑन्कोलॉजी/ऑनको-सर्जरीमध्ये एक वर्षाचा अनुभव असावा.
  • उमेदवाराने मुलाखतीच्या तारखेपूर्वी PG पदवी/डिप्लोमाचा कार्यकाळ पूर्ण केलेला असावा.

शैक्षणिक पात्रतेच्या सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात अवश्य पाहा.

पगार

मॅट्रिक्स लेव्हल -११ नुसार पगार ६७ हजार ७०० ते २ लाख ८७ हजारांपर्यंत मिळू शकतो.

वयोमर्यादा – खुला प्रवर्ग – ३७ ते ४० वर्षे.

ओबीसी – ४० ते ४३ वर्षे.

SC/ST – ४२ ते ४५ वर्षे.

भरतीसंबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती पाहण्यासाठी (https://drive.google.com/file/d/1XZLMB2qhCxa-6iFqdTCLPRbSydVLJKBA/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ailway bharti 2023 job opportunity in northern railway recruitment for senior resident post is open know the interview date jap
Show comments