Air Force School Pune Recruitment 2024 : पुणे येथील एअरफोर्स स्कुलद्वारे वर्ष २०२४ साठी खालील पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवत आहे नियमित, अर्धवेळ, करारानुसार या पदांसाठी भरती केली जाणार आहे. या भरती मोहिमेंतर्गत विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण पुणे हे आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी त्यांचे अर्ज दिलेल्या ऑनलाइन ई-मेल आयडीवर जमा करू शकतात. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १९ मार्च २०२४ आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Air Force School Pune Recruitment 2024 : वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवराचे वय ०१ जुलै २०२३ रोजी २५ ते ५० दरम्यान असावे.

Air Force School Pune Recruitment 2024 शैक्षणिक पात्रता
भरती प्रक्रियेंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. प्रत्येक पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगळी आहे. उमेदवारकडे पदाच्या आवश्यकतेनुसार संबधीत शाखेतील मान्यप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी घेतलेल असावी. तसेच उमेदवाराला इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असावे. अधिक माहितीसाठी उमेदवार http://www.airforceschoolpune.ac.in ला भेट देऊन सविस्तर माहिती घेऊ शकतात.

Air Force School Pune Recruitment 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया
इच्छूक उमेदवार विविध पदांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवार शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि संपर्क क्रमांक स्पष्टपणे नमूद करणारा त्यांचा बायोडेटा सबमिट करू शकतात. १९ मार्च २०२४ पूर्वी recruitmentatafsvn@gmail.com या इमेल आयडीवर इच्छूक उमेदवार अर्ज करू शकतात. अपूर्ण अर्ज नाकारले जातील. कृपया लक्षात ठेवा रेझ्युमेसाठी आदर्श नुमना खाली दिला आहे. रेझ्युमे फक्त खालील फॉरमॅटमध्ये असावा.

अधिकृत लिंक http://www.airforceschoolpune.ac.in/english-vacancies#

हेही वाचा – SEBI Recruitment 2024: सेबीद्वारे ९७ असिस्टंट मॅनेजरच्या पदांसाठी होणार भरती! ‘या’ तारखेपासून करू शकता अर्ज

Air Force School Pune Recruitment 2024 पगार
निवड झालेल्या उमेदवाराला पदानुसार आणि अभुनवानुसार ३५००० ते ५६०००पर्यंत पगार मिळू शकतो.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Air force school in pune will be recruiting for various posts apply before this date can get salary upto 56000 snk