AIATSL recruitment 2024 : एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये सध्या विविध पदांवर भरती होत आहे. तुम्ही नोकरीच्या शोधात असाल किंवा नोकरी करण्यास इच्छुक असाल तर एकूण किती रिक्त जागा भरल्या जाणार आहेत ते पाहा. तसेच अर्ज भरायची अंतिम प्रक्रिया आणि अंतिम तारीख काय असेल ते जाणून घ्या.
AIATSL recruitment 2024 : पदे आणि पदसंख्या
ड्युटी मॅनेजर – २
ज्युनियर ऑफिसर – टेक्निकल – १
कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह – १७
ज्युनियर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह – १०
युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर – ६
रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह – ३
हँडीमॅन – ५
हँडीवूमन – ८
एकूण ७४ रिक्त पदे उपलब्ध आहेत.
हेही वाचा : बारावीची परीक्षा तर संपली, ‘मग आता पुढे काय?’ करिअर निवडण्याआधी ‘या’ गोष्टी पाहा…
AIATSL recruitment 2024 : वयोमार्यादा
वरील कोणत्याही पदांसाठी नोकरीचा अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा ही २८ वर्षे आहे.
AIATSL recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता
ड्युटी मॅनेजर – कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी आणि किमान १६ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.
ज्युनियर ऑफिसर – टेक्निकल – कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/उत्पादन/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये पदवी
कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह – कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून [१०+२+३] पद्धतीने पदवी असणे अवश्यक.
ज्युनियर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह – कोणत्याही बोर्डातून दहावी + २ असे शिक्षण असावे.
युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर – एसएससी / १० वी पास
रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह – राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/उत्पादन/इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईलमध्ये ३ वर्षांचा डिप्लोमा.
हँडीमॅन – एसएससी / १० वी पास
हँडीवूमन – एसएससी / १०वी पास
AIATSL recruitment 2024 – एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड अधिकृत वेबसाईट –
https://www.aiasl.in/index
AIATSL recruitment 2024 – अधिसूचना –
https://www.aiasl.in/resources/Recruitment%20Advertisement%20for%20Dehradun%20&%20Chandigarh%20Station..pdf
https://www.aiasl.in/resources/Recruitment%20Advertisement%20for%20Pune%20Station.pdf
AIATSL recruitment 2024 : अर्ज आणि अर्जप्रक्रिया
एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडच्या वर नमूद केलेल्या रिक्त पदांवर मुलाखतींद्वारे भरती होणार आहे.
मुलाखतीसाठी उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीच्या स्थळावर उपस्थित राहावे.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीकरिता हजर राहावे.
सदर पदांकरिता मुलाखत १६, १७, १८ आणि १९ एप्रिल २०२४ या तारखेला दिलेल्या पत्यावर घेण्यात येणार आहे.
नोकरीसंदर्भात इच्छुक उमेदवारांना कोणतीही अधिक माहिती हवी असल्यास एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी अथवा नोकरीची अधिसूचना वाचावी. वेबसाइट तसेच अधिसूचना वर नमूद केले आहे.