Air India Airport Authority Customer Service Recruitment 2024 : एअर इंडिया एअरपोर्ट अॅथोरिटी कस्टरमर सर्व्हिसेसमध्ये (AIASL) कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह पदासाठी भरती करणार आहे. या पदासाठी इच्छूक उमेदवार (पुरुष आणि महिला भारतीय नागरिक) AIASL च्या अधिकृत वेबसाइट aiasl.in वर भेट देऊन अर्ज करू शकतात. निश्चित मुदतीच्या कराराच्या आधारावर (तीन वर्षे) मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विविध पदांसाठी इच्छूक उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ जुलौ २०२४ आहे.

यावर्षी, या भरतीच्या प्रयत्नातून एकूण १०४९ जागांची भरती केली जाईल यापैकी सिनिअर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह पदासाठी ३४३ जागांची भरती केली जाणार आहे तर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह पदासाछी ७०६ पदांची भरती केली जाणार आहे.

AI Airport Authority Customer Service Recruitment 2024 : पात्रता निकष

सिनिअर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह : या पदासाठी अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवार १०+२+३ पद्धतीनुसार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर झालेला असावा तसेच उमेदवराकडे भाडे, आरक्षण, संगणकीकृत प्रवासी चेक-इन, तिकीट आणि कार्गो हाताळणी यासह खालीलपैकी कोणत्याही किंवा सर्व क्षेत्रात पाच वर्षांचा अनुभव असावा. उमेदवार हा कॉप्युटर वापरण्यामध्ये तज्ज्ञ असावा. तसेच उमेदवाराची इंग्रजी आणि हिंदी भाषेवर प्रभुत्व असायला हवी. सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवार ३३ पेक्षा जास्त वयाचा नसावा.

IOCL Apprentice Recruitment 2025:
IOCL Recruitment 2025: इंडियन ऑइलमध्ये ४५६ अप्रेंटिस पदांसाठी होणार भरती, जाणून घ्या भरती प्रक्रिया
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
EPFO Recruitment 2025 EPFO hiring young professionals in law salary Rs 65000 no written test
EPFO Recruitment 2025 : कोणतीही परीक्षा न देता मिळवा नोकरी! EPFO मध्ये Young Professionalsची सुरु आहे भरती, मिळेल ६५,००० रुपये पगार
Central Bank of India Credit Officer Recruitment 2025:
बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; १ हजार जागांसाठी होतेय भरती; कसा करायचा अर्ज? जाणून घ्या
Bank Of Maharashtra Recruitment 2025: Application Begins For 172 Posts, No Written Exam how to apply know details
BOM Recruitment: बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; कोणत्याही परिक्षेशिवाय मिळणार नोकरी, अर्ज कसा करायचा जाणून घ्या
The application deadline for 25 percent reserved seats in private schools under rte has been extended
‘आरटीई’अंतर्गत प्रवेश अर्जांसाठी मुदतवाढ, आतापर्यंत किती अर्ज दाखल?
rrb group d level 1 exam syllabus pattern 2025 full details here
रेल्वेत तब्बल ३२ हजार पदांची भरती; हा घ्या परिक्षेचा पॅटर्न आणि लागा तयारीला; सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी
Rohit Pawar , Davos , Industries offices Maharashtra,
उद्योगांची कार्यालये महाराष्ट्रात, मग करारासाठी दावोसला जाण्याची काय गरज – रोहित पवार यांचा प्रश्न

कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह : या पदासाठी अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवार १०+२+३ पद्धतीनुसार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर झालेला असावा. या पदासाठी A, कार्गो, किंवा एअरलाइन तिकीट, तसेच एअरलाइन डिप्लोमा किंवा IATA-UFTAA, IATA-FIATA, IATA-DGR, किंवा IATA कार्गो डिप्लोमा यांसारखे प्रमाणित अभ्यासक्रम असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. सामान्य श्रेणीतील उमेदवार २८ क्षा जास्त वयाचे नसावेत.

हेही वाचा – IAF Agniveer Recruitment 2024: १२ वी पास उमेदवारांना नोकरीची संधी! भारतीय हवाई दलात भरती सुरू; पाहा कसा करायचा अर्ज

अधिसुचना – https://www.aiasl.in/resources/Recruitment%20Advertisement%20for%20Mumbai%20Station%20-%20Sr.Customer%20Service%20Executive%20&%20Customer%20Service%20Executive%20Category.pdf

अर्ज करण्याची थेट लिंक – https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScA4WF8Ej8bKu7VwMMOzRhSoYuQSVjD9CFWYZynC_1llrUZVQ/viewform?pli=1

AI Airport Service Recruitment 2024 अर्ज कसा करावा?

  • स्टेप १ -SL च्या अधिकृत वेबसाइटवर प्रवेश करण्यासाठी aiasl.in भेट द्या
  • स्टेप २ – पेजवर दिसणाऱ्या Recruitment लिंकवर क्लिक करा
  • स्टेप ३ – पेज वर दिसणारी “Customer Service Executive” ” लेबल असलेली लिंक निवडा.
  • स्टेप ४- : नवीन पेजवर सुरु झाल्यानंतर उमेदवारांना त्यांचे लॉगिन क्रेडेन्शियल्स टाकावे लागतील.
  • स्टेप ५ – अर्ज पूर्ण भरा आणि आवश्यक शुल्काची रक्कम जमा करा.
  • स्टेप ६ – सबमिट बटणावर क्लिक करा आणि अर्ज डाउनलोड करा.
  • स्टेप ७ – भविष्यातील वापरासाठी त्याची हार्ड कॉपी प्रिंट करा.

हेही वाचा – Success Story : करोना काळात गमावली नोकरी आणि सुरू केला स्वतःचा व्यवसाय; महिन्याला कमावतात दोन लाख रुपये

AI Airport Authority Customer Service Recruitment 2024 :अर्ज शुल्क

अर्जासह मुंबईतील “AI AIRPORT SERVICES LIMITED” ला देय असलेला डिमांड ड्राफ्ट, रु.५००/- (रुपये फक्त पाचशे) परत न करण्यायोग्य अर्ज शुल्कासह असणे आवश्यक आहे. SC/ST समुदायातील उमेदवार आणि माजी सैनिकांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

Story img Loader