AIR India Bharti 2023: पायलट म्हणून काम करण्याची इच्छा असणाऱ्या आणि हवाई वाहतुकीशी संबंधित क्षेत्रात काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे सध्या टाटा उद्योगसमुहाकडून त्यांच्या एअर इंडिया कंपनीमध्ये हजारो जागांसाठीची लवकरच भरती जाहीर करण्यात येणार आहे. काही अहवालांनुसार, कंपनीला ६ हजार ५०० पेक्षा जास्त पायलट, अभियंते आणि क्रू मेंबर्सची गरज असून AIR India Bharti 2023 लवकरच सुरू होणार आहे.

टाटा उद्योगसमूहाने मागील वर्षी जानेवारी महिन्यात तोट्यात असलेली एअर इंडिया कंपनी आपल्या ताब्यात घेतली, तेव्हापासून या कंपनीच्या कार्यपद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आला आहे. नुकतेच एअर इंडियाने आपल्या पाच वर्षांच्या परिवर्तन योजनेअंतर्गत, मागील सहा महिन्यांमध्ये ३ हजार ८०० नवीन कर्मचाऱ्यांची भरती केली असून कर्मचाऱ्यांसाठी विविध २९ धोरणेही लागू केली असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.

Eknath Shinde, Vijay Shivtare, Purandar Haveli,
पुरंदर विमानतळ ‘असा’ उभारणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा ! विजय शिवतारे यांच्या प्रचारार्थ घेतली सभा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Mumbai airport international travelers
Mumbai Airport International Passengers: मुंबई विमानतळावरून १२ लाख प्रवाशांची आंतरराष्ट्रीय वारी
Nagpur Kolkata bomb threat
आकाशात झेपावलेल्या विमानात बॉम्ब ठेवल्याचा फोन अन्…
expansion of air india service after merger of vistara
विस्तारा’च्या विलीनीकरणातून एअर इंडियाच्या सेवेत विस्तार; विमानांचा ताफा ३०० वर, तर साप्ताहिक उड्डाणे ८,५०० वर
Vistara Completes Merger With Air India
‘विस्तारा’ नाममुद्रा इतिहासजमा; एअर इंडियामध्ये विलीनीकरण पूर्ण
mumbai weather updates city records moderate air quality
मुंबईतील हवेचा दर्जा मध्यम श्रेणीतच

हेही वाचा- MPSC Recruitment 2023: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ‘या’ १४६ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु

कंपनीकडून माहिती तंत्रज्ञानासाठी २० कोटी अमेरिकी डॉलरची गुंतवणूक करण्यात येत आहे. तर कंपनीने ४७० विमानांच्या खरेदीसाठी मागणी नोंदवली आहे. एअर इंडियाच्या परिवर्तनासाठी टाटा समूहाने ‘विहान डॉट एआय’ योजना लागू केली आहे. सुरुवातीच्या सहा महिन्यांमध्ये अनेक आघाड्यांवर प्रगती झाली असून वाढीसाठी मजबूत पाया तयार करण्याच्या दृष्टीने मोठा प्रवास पूर्ण करण्यात आला आहे, असे एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक कॅम्पबेल विल्सन यांनी सांगितले आहे.

अशातच आता कंपनीकडून विविध पदासांठीची मोठी भरती जाहीर करण्यात येणार आहे. या भरती अंतर्गत एअर इंडियामध्ये ९०० वैमानिक आणि ४,२०० कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. कंपनीने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सेवेचा विस्तार करण्याची योजना आखली असून त्याचाच भाग म्हणून ही भरती केली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

हेही वाचा- केंद्रीय मंत्रालयाकडून CRPF च्या १ लाखांहून अधिक जागांसाठीची बंपर भरती जाहीर; १० वी पास तरुणांसाठी मोठी बातमी!

या भरतीमध्ये पायलटसह देखभाल इंजिनिअर्सची मोठय़ा प्रमाणात भरती केली जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच एअर इंडियाने बोईंग आणि एअरबस या कंपन्यांकडून ७० मोठय़ा विमानांसह ४७० विमाने खरेदी करण्याचे जाहीर केले होते. त्याशिवाय ३६ विमाने भाडय़ाने घेतली जाणार आहेत. त्यामुळे कंपनीला सध्या मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची गरज असल्याने ही भरती केली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

निवडलेल्या उमेदवारांना प्रशिक्षण –

भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना १५ आठवडय़ांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या मध्ये त्यांना सुरक्षा आणि सेवा कौशल्ये शिकवण्यात येणार आहेत. तसेच त्यांना भारतीय आदरातिथ्य आणि टाटा समूहाची संस्कृती यांचा सर्वोत्तम मिलाफ घडवण्याचे प्रशिक्षण दिलं जाणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.

मनुष्यबळाची गरज का?

‘एअर इंडिया’ आणि ‘विस्तारा’ तसेच ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ आणि ‘एअरएशिया इंडिया’च्या विलीनीकरणानंतर एअर इंडिया समूहाला आपल्या विस्तारित विमान ताफ्यासाठी हजारो वैमानिकांची आवश्यकता आहे. काही वृत्तांनुसार कंपनीला ६५०० हून अधिक वैमानिकांची आवश्यकता असल्याचं सांगितलं आहे. भरतीसाठीची अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी कंपनीच्या अधिकृत बेवसाईटला अवश्य भेट द्या.