Alankrita Sakshi success story : जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. जर आपण सातत्याने कठीण परिश्रम घेतले, तर आपण यशाचे शिखर गाठू शकतो, ही गोष्ट सिद्ध करून दाखवली आहे ते बिहारच्या एका तरुणीने. बिहारच्या भागलपूर येथील या तरुणीला गूगलने ६० लाखांचे वार्षिक पॅकेज दिले आहे. सध्या सगळीकडे या तरुणीची एकच चर्चा रंगली आहे.
बिहारच्या अलंकृता साक्षीने असे काही करून दाखवले की, ज्यामुळे प्रत्येकाला तिचा अभिमान वाटतोय. तिने गूगलमध्ये नोकरी मिळवून अनेक मुलींना यशाची दिशा दाखवली. ज्या मुली आयुष्यात मोठं काहीतरी करण्याचं स्वप्न पाहतात, त्या मुलींसाठी अलंकृता साक्षी ही एक प्रेरणादायी उदाहरण ठरली आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, ही अलंकृता साक्षी कोण आहे? त्याच्याच उत्तरासाठी आज आपण तिच्याविषयी सविस्तर जाणून घेऊ या. (Alankrita Sakshi’s Success Story : How She Secured a 60 Lakh Package with BTech and IT Skills)
हेही वाचा : success story : मुंबईत खरेदी केलं ‘सी-फेसिंग अपार्टमेंट! वाचा भारतीय व्यावसायिक ॲशले नागपाल यांची यशोगाथा
अलंकृता साक्षी कोण?
अलंकृता साक्षी ही बिहार राज्यातील भागलपूर जिल्ह्यातल्या सिमरा या गावची तरुणी आहे. अलंकृताचे वडील शंकर मिश्रा झारखंडमध्ये कोडरमा येथे राहतात. तेथे ते एका खासगी कंपनीमध्ये काम करतात. तिची आई रेखा मिश्रा हीसुद्धा एका खासगी शाळेत शिक्षिका आहे. आई-वडील कोडरमामध्ये राहत असल्यामुळे अलंकृताचे बालपणसुद्धा कोडरमामध्येच गेले. अलंकृताने शालेय शिक्षण याच शहरातून घेतले. त्यानंतर हजारीबागमधून तिने बी.टेक.ची पदवी संपादन केली.
अलंकृता साक्षीचे करिअर
बी.टेक. केल्यानंतर अलंकृताला नोकरी मिळाली आणि ती बंगळुरूमध्ये राहायला गेली. येथे तिने यापूर्वी तिने बंगळूरूमध्ये विप्रो, अर्न्स्ट अँड यंग आणि हरमन इंटरनॅशनल सारख्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्यामध्ये काम केले. फिशिंग ईमेल , QRADAR-SIEM, फायरवॉल , Splunk व मालवेअर सारख्या स्कील तिला अवगत आहे.
यादरम्यान तिने गूगलमध्ये नोकरीसाठी अर्ज केला आणि तिची चक्क गूगलमध्ये निवड झाली. तिला आता ६० लाखांचे वार्षिक पॅकेज मिळाले आहे.
हेही वाचा : Best time for Job Hunting : कोणत्या महिन्यांमध्ये नोकरी शोधावी? जाणून घ्या, नोकरी शोधण्याची सर्वोत्तम वेळ
भागलपूर जिल्ह्यातील पोठिया गावातील एका मनीष कुमार नावाच्या तरुणाबरोबर अलंकृताचे लग्न झाले. मनीष बंगळुरूमध्येच एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करतो. अलंकृताची गूगल कंपनीमध्ये निवड झाल्यानंतर तिचे सासरचे व माहेरचे लोक खूप आनंदी झाले आहेत.