Amazon Bharti 2023: सध्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे जगभरातल्या अनेक प्रमुख कंपन्यांनी कर्मचारी कपात सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वीच ट्विटर, मेटा यासह अ‍ॅमेझॉननेदेखील हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं होतेय अ‍ॅमेझॉन ही एक अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी आहे. जगातल्या सर्वांत प्रभावशाली कंपन्यांमध्ये अ‍ॅमेझॉनचा समावेश होतो. आता कंपनीने भारतात नवीन कर्मचारी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय ही भरती एक दोन हजार जागांसाठी नव्हे तर जवळपास दीड लाख जागांसाठी केली जाणार आहे. त्यामुळे नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही एक समाधानकारक बातमी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हिस (AWS) २०२३ पर्यंत भारतात क्लाउड-संबंधित पायाभूत सुविधांमध्ये जवळपास १ लाख ५ हजार ६०० कोटींची गुंतवणूक करणार आहे. क्लाउड सेवांसाठी ग्राहकांच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी कंपनी ही गुंतवणूक करणार असल्याची मोठी घोषणा कंपनीने केली आहे. अ‍ॅमेझॉनच्या या गुंतवणुकीमुळे देशात दरवर्षी अंदाजे सरासरी १ लाख ३१ हजार ७०० नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा- १२ वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! कर्मचारी निवड आयोगात ‘या’ पदांसाठी भरती, ९२ हजारांहून अधिक पगार मिळणार

अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हिस (AWS) २०३० पर्यंत भारतात क्लाउड संबंधित पायाभूत सुविधांमध्ये १ लाख ५ हजार ६०० कोटींची (१२.७ अब्ज डॉलर) गुंतवणूक करणार आहे. क्लाउड सेवांसाठी ग्राहकांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी कंपनी ही गुंतवणूक करत आहे. Amazon.com Inc च्या क्लाउड कंप्युटिंग विभागाने ही माहिती दिली आहे.

AWS ने २०१६ आणि २०२२ दरम्यान भारतात ३ अब्ज पेक्षा जास्त गुंतवणूक केली, ज्यामुळे भारतीय व्यवसायांमध्ये वार्षिक ३९,५०० नोकऱ्या निर्माण होण्यास मदत झाली. AWS चे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), अ‍ॅडम सेलिपस्की म्हणाले, “AWS एक डिजिटल पॉवरहाऊस म्हणून भारताच्या वाढीसाठी दीर्घकाळापासून काम करत आहे. २०१६ पासून आमच्या पायाभूत सुविधांमुळे मोठी प्रगती झाली आहे.”

हेही वाचा- पॉवरग्रीड कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; ‘या’ पदांसाठी भरती सुरु, महिना २७,५०० पगार मिळणार, आजच करा अर्ज

इकॉनॉमिक टाईम्सच्या अहवालानुसार, जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारत एक “उज्ज्वल स्थान” राहिले आहे, जेथे व्यवसाय मोठ्या प्रमाणात प्रगती करत आहेत. मला माहित आहे की सरकार २०२५ पर्यंत ट्रिलियन-डॉलरची डिजिटल अर्थव्यवस्था तयार करण्याचा प्रयत्न करत आहे, पुढील काही वर्षांत भारत ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या मार्गावर आहे. ह्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी भारतासाठी क्लाउड तंत्रज्ञान स्वीकारणे महत्त्वाचे आहे, असे अ‍ॅडम सेलिपस्की यांनी म्हटलं आहे. दरम्यान, ही भरती कधी सुरु केली जाणार आहे याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही. मात्र ती लवकरच सुरु केली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.